News

MI vs SRH प्रीव्ह्यू: वानखेडेवर मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनो, पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर आपल्या आवडत्या खेळाडूंचा उत्साह वाढवायला तयार व्हा. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम सोमवारी सनरायझर्स हैदराबदविरूद्ध आव्हान समोर ठेवेल. 

मुंबईच्या टीमला आयपीएल २०२४ मध्ये आपल्या चौथ्या विजयाची अपेक्षा आहे. पाच वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स आपली प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी खेळतेय. टीमने आतापर्यंत सहा गुण मिळवले आहेत.

सनरायझर्स हैदराबादची टीम आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. पॅट कमिन्सच्या या टीमने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत करून दोन गुण मिळवले आहेत.

या सीझनमध्ये मागच्या वेळी या दोन्ही टीम्स समोरासमोर आल्या तेव्हाही आपल्या टीमला निराशा मिळाली होती. त्या सामन्यात आपल्या टीमने हैदराबादविरूद्ध २७७ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना २४६ धावा केल्या होत्या.

हैदराबादमध्ये झालेल्या या सामन्यात आपला तरूण फलंदाज तिलक वर्माने टीमसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ३४ चेंडूंमध्ये ६४ धावा करताना सहा षटकार मारले होते.

याशिवाय टीममध्ये फिनिशर असलेल्या टिम डेव्हिडनेदेखील उत्तम खेळ केला होता. त्याने १९० च्या स्ट्राइक रेटने २२ चेंडूंमध्ये नाबाद ४२ धावा केल्या.

आता पुन्हा एकदा या दोन्ही टीम्स समोरासमोर असतील आणि आपल्याला एक रोमांचक सामना पाहायला मिळेल.

या वेळ हैदराबादच्या फलंदाजांसमोर पर्पल कप मिळालेल्या जसप्रीत बुमराचे आव्हान असेल.

बुमराने १६ च्या सरासरीने गोलंदाजी करत आतापर्यंत १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या अप्रतिम फॉर्मसमोर हैदराबादच्या फलंदाजांना सतर्क राहावे लागेल. आपला स्पिन गोलंदाज पियूष चावलादेखील हैदराबादच्या फलंदाजांसमोर आपल्या फिरकीची कमाल दाखवायला तयार आहे.

लेग स्पिनर पियूष चावलाने आयपीएलमध्ये १८४ विकेट्स घेऊन ड्वेन ब्राव्होला मागे टाकले आहे आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध आपल्या टीमला मागच्या सामन्यात निराशा मिळाली होती. परंतु त्यानंतरही मुंबईची टीम प्रचंड मजबूत इरादे ठेवून मैदानात उतरणार आहे.

हेड-टू-हेड आकडे

दोन्ही टीम्स आतापर्यंत २२ सामन्यांमध्ये समोरासमोर आल्या आहेत. यात आपल्या टीमचे पारडे जड आहे. मुंबईने १२ सामन्यांमध्ये विजय मिळवलाय तर हैदराबादच्या टीमनेहीह १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मागच्या चार सामन्यांचा विचार केला तर दोन्ही टीम्सनी प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत.

काय: आयपीएल २०२४ चा ५५ वा सामना. मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद

कधी: सोमवार, ६ मे २०२४ | सायंकाळी ७.३० वाजता.

कुठे: वानखेडे स्टेडियम, मुंबई

काय अपेक्षा आहे: वानखेडेवर पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवचे सुपला शॉट्स बघायला तयार राहा. बूम बूम बुमराच्या अचूक यॉर्कर्स विकेट घेण्यासाठी आतूर आहेत. थोडक्यात सांगायचे तर आपली टीम आपल्या घरच्या खेळपट्टीवर नवीन सुरूवात करायला तयार आहे.

आपण काय करायचे आहे: पलटन, मागचे काही सामने आपल्याला कठीण गेले आहेत यात काहीच शंका नाही. पण आपल्याला पुन्हा मैदानात उतरणं येतं. पलटन, आपल्या घरी- वानखेडेवर ब्लू अँड गोल्ड जर्सीला चिअर अप करत राहा.