यास्तिका
यास्तिका
भाटिया
भाटिया
जन्मतारीख
नोव्हेंबर 1, 2000
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
यास्तिका बाबत

एक शक्तिशाली आणि संयमी वरच्या फळीतील फलंदाज असलेल्या यास्तिका भाटिया हिने २०२१ मध्ये अत्यंत कठीण ठरलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर ती थेट ओडीआयमध्ये गेली. आपल्या तिसऱ्या सामन्यात तिच्या ६४ धावांनी भारताला ऑस्ट्रेलियाच्या २६ सामन्यांच्या विजयाचा प्रवास थांबवता आला.


तिचा जन्म बडोद्यात झाला. देशांतर्गत वर्तुळात तिने बडोदा विमेन्स टीमचे नेतृत्व केले. तिच्या उत्तम विकेट कीपिंग कौशल्यांसह सातत्यपूर्ण धावांमुळे तिला २०१८ मध्ये नॅशनल क्रिकेट एकेडमीमध्ये २५ खेळाडूंच्या शिबिरात स्थान मिळाले. त्यानंतर लवकरच तिला वेस्ट झोनची कर्णधार होण्याचा मान मिळाला, मग इंडिया ए आणि तिथे तिने आपला प्रभाव टाकून राष्ट्रीय दर्जा प्राप्त केला. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलेले नाही आणि डब्ल्यूपीएलमध्ये तिच्या रूपाने वादळ आले असे म्हणता येईल.


कसले वादळ होते ते! हायली मॅथ्यूजसोबत तिने जबरदस्त ओपनिंग भागीदारी केली. त्यांनी एमआयला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आता भारतीय संघातही नियमित खेळाडू असल्यामुळे तिच्यासाठी आणखी एक सीझन वाट पाहतोय.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता