News

इंग्लंड विरूद्ध भारत, पाचवा कसोटी दिवस ४- ऐतिहासिक विजयापासून भारत सात विकेट्स दूर

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध भारताच्या पाचव्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस ३३८/७ अशा धावसंख्येवर संपवला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ६.२ ओव्हर्समध्ये पहिली विकेट घेतली. जेम्स अँडरसनने ओपनर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या विकेट्स घेतल्या. दुपारच्या जेवणापूर्वी पावसामुळे सामन्याचे फक्त २०.१ ओव्हर्स झाले. भारताने पहिले सत्र ५३/२ वर संपवले.

दुसऱ्या सत्रात १२१ धावा काढण्यात आल्या आणि तीन फलंदाज- हनुमा विहारी, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर एकामागून एक बाद झाले. परंतु ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी भारताचा डाव सावरून धरत चहाच्या वेळेपर्यंत १७४/५ असा स्कोअर केला.

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताने ६३.१ ओव्हर्समध्ये ३०० पेक्षा अधिक धावा केल्या. पंतने ८९ चेंडूंमध्ये आपले पाचवे शतक पूर्ण केले. त्याने भारतीय विकेट कीपरकडून कसोटी सामन्यातील सर्वाधिक वेगवान शतकाचा एमएस धोनीचा विक्रम मोडीत काढला.

याशिवाय हा २४ वर्षीय खेळाडू इंग्लंडमध्ये दोन कसोटी शतके काढणारा पहिला पाहुणा विकेट कीपर ठरला आहे. पंतची इनिंग १४६ वर संपली. आपला दुसरा १५० पेक्षा अधिक धावांचा स्कोअर पूर्ण करण्यापासून तो फक्त ४ धावा मागे राहिला.

ऋषभ पंतची रवींद्र जाडेजासोबतची २२२ धावांची भागीदारी इंग्लंडविरूद्ध सहाव्या विकेटसाठी सर्वोच्च होती आणि केपटाऊनमध्ये १९९७ साली सचिन तेंडुलकरने मोहम्मद अझरूद्दीनसोबत केलेल्या धावसंख्येइतकीच ती झाली.

रवींद्र जाडेजानेही भारताला दुसऱ्या सत्रात पुनरागमनासाठी योगदान दिले. त्याने एजबस्टन टेस्टचा पहिला दिवस मोहम्मद शामीसोबत १६३ चेंडूंमध्ये ८३ धावा करून संपवला.

भारत सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी टीव्ही वाहिन्यांवर आणि लाइव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी सोनीलिव्हवर भारतात दुपारी ३ वाजता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करेल.

Day 2:

बदली कर्णधार जसप्रीत बुमराची अप्रतिम अष्टपैलू खेळी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या कामगिरीमुळे भारताला शनिवारी एजबस्टन येथे आयोजित बदललेल्या वेळापत्रकानुसार खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरूद्ध पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व ठेवता आले आहे.

पावसाने खेळाची लय बिघडवली. त्यामुळे संपूर्ण दिवसभरात फक्त ३८.५ ओव्हर्स टाकल्या गेल्या. भारतासाठी बुमराने तीन विकेट्स घेतल्या तर मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ८४/५ वर समाधान मानावे लागले.

भारतीय कर्णधाराने ओपनर्स एलेक्स लीस (६), झॅक क्रॉली (९) आणि ऑली पोप (१०) यांना बाद केले तर सिराजने इंग्लंडची आशा असलेल्या जो रूटला (३१) बाद केले.

दरम्यानच्या काळात शामीने नाइट वॉचमन जॅक लीचला बाद करून आपल्या बळींच्या संख्येत भर घातली. पण लीचने धावा केल्या नाहीत.

दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (०) आणि फॉर्ममध्ये असलेला जॉनी बेरस्टॉ (१२) हे क्रीझवर होते.

या दिवसाच्या सुरूवातीला जडेजाने आपले कसोटीतील तिसरे शतक झळकवले (१९४ चेंडूंमध्ये १०४ धावा) आणि बुमराने १६ चेंडूंमध्ये नाबाद ३१ धावा करून पाहुण्या संघाला पहिल्या इनिंगमध्ये ४१६ धावांचा टप्पा पार करायला मदत केली. त्यामुळे भारताला सामन्यावर वर्चस्व गाजवता आले.

भारताच्या इनिंगदरम्यान बुमराने जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला एका ओव्हरमध्ये ३५ धावा करून त्याचा धुव्वा उडवला. आता या इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजाचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा रेकॉर्ड आहे.

भारताने ३३८/७ वर खेळ पुन्हा सुरू केल्यानंतर ११.५ ओव्हर्समध्ये ७८ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने इनिंग गुंडाळली.

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने १११ चेंडूमध्ये १४६ धावा केल्यामुळे शुक्रवारी पहिल्या दिवसाच्या शेवटी भारताचे स्थान चांगले झाले होते.

सध्या पाहुणा संघ या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर असून ते २००७ पासून आपल्या पहिल्या कसोटी मालिकेच्या विजयासाठी उत्सुक आहेत.

भारत एजबस्टनवर तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता खेळ सुरू झाल्यावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल.

Day 3:

भारतीय क्रिकेट संघाने आज इंग्लंड विरूद्ध भारत या पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसात प्रवेश करताना १२५/३ अशी कामगिरी करून २५७ धावांची आघाडी घेतली.

तिसऱ्या दिवसाची सुरूवात मोहम्मद शामीने इंग्लंडच्या पहिल्या इनिंगसाठी २८ वी ओव्हर टाकून झाली. ही ओव्हर शून्य धावा देणारी ठरली. त्यानंतर इंग्लंडची विकेट घ्यायला भारताला पुढचे दहा ओव्हर्स लागले. शार्दुल ठाकूरने बेन स्टोक्सला बाद केले. कर्णधार जसप्रीत बुमराने ३७.३ ओव्हरमध्ये स्टोकचा झेल सोडला. पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने यजमान संघाच्या कर्णधाराला बाद केले.

पावसाने अडथळा आणल्यनंतरही जॉनी बेरस्टॉने १४० चेंडूंवर १०६ धावा काढून पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला २८४ धावांचा टप्पा पार करून दिला. सुरूवातीला ६४ चेंडूंवर १६ धावा काढताना चाचपडत असलेल्या या इंग्लिश फलंदाजाने नंतर ११९ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या.

बेरस्टोने आपल्या सलग तिसऱ्या कसोटी शतकी खेळीमुळे पाचव्या किंवा त्या खालील क्रमाच्या फलंदाजाने कॅलेंडर  वर्षात पाच किंवा जास्त शतके काढण्याचा मायकल क्लार्क (२०१२) चा विक्रम मोडीत काढला.

भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शुभमन गिल जेम्स अँडरसनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. अँडरसनच्या कमी लांबीच्या चेंडूला टोलवण्याच्या प्रयत्नात त्याचा झेल झॅक क्रॉवलीकडे गेला. 

चहाच्या वेळी १३ ओव्हर्समध्ये ३७/१ इतकी धावसंख्या केल्यानंतर भारताने १७.४ ओव्हर्समध्ये ५० धावा पूर्ण केल्या आणि ३५.४ ओव्हर्समध्ये १०० धावा फटकावल्या.

चेतेश्वर पुजाराने कसोटी मालिकेतील आपले ३३ वे अर्धशतक पूर्ण केले. जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ८६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्यानंतरचे हे त्याचे २०२२ सालातील दुसरे अर्धशतक आहे. त्याला ऋषभ पंतची मोलाची साथ मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये शंभरी पूर्ण करणारा पंत ३० धावांवर नाबाद राहिला.

भारत पुजारा आणि पंत यांच्यादरम्यान ५० धावांच्या भागीदारीसोबत इंग्लंड विरूद्ध भारत या पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसात प्रवेश करत आहे. कसोटीमधील या जोडीची ही ५० पेक्षा अधिक भागीदारी आहे. (५०*, ११९, ६१, १४८, ५३).

सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरूद्ध भारत या ५ व्या कसोटी सामन्याच्या पेनल्टी टाइम डे साठी तयार राहा. सामना सोमवार दिनांक ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुरू होईल. 

Day 4:

भारतीय क्रिकेट संघ २००७ सालापासूनचा इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील विजय नोंदवण्यापासून सात विकेट्स दूर आहे. 

पाहुण्या संघाने चौथा दिवस २५७ धावांच्या आघाडीने सुरूव केला. त्यांनी दुसऱ्या इनिंगची धावसंख्या ८१.५ ओव्हर्समध्ये २४५ वर नेली. भारतासाठी चेतेश्वर पुजारा (८६) खेरीज अर्धशतकी खेळी करणारा ऋषभ पंत (५७) हा एकमेव खेळाडू ठरला. 

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ११.५ ओव्हर्सच्या खेळीत चार विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे त्याच्या टीमसमोर ३७८ एवढ्या धावांचे लक्ष्य राहिले. 

इंग्लिश टीमने ओपनर्स एलेक्स लीस आणि झॅक क्राऊली या दोघांच्या आत्मविश्वासू भागीदारीद्वारे खेळ सुरू केला. त्यांनी सलामीतच १७० धावा कुटल्या. भारतीय कर्मधार जसप्रीत बुमराच्या इन स्विंगरमुळे स्टंप उडाला आणि ही भागीदारी संपुष्टात आली. 

बुमराने चहाच्या सुटीनंतर पहिल्याच चेंडूवर ऑली पोपला बाद करून आणखी एक विकेट घेतली. ऑली पोपच्या बॅटच्या कडेला त्याने टाकलेला चेंडू आदळला आणि तो सरळ ऋषभ पंतच्या हातात जाऊन विसावला. 

झॅक क्राऊलीने अर्धशतक केल्यानंतर तो रवींद्र जडेजाच्या ओव्हरमध्ये बाद झाला. स्क्वेअर लेगकडे चेंडू फटकावल्यानंतर जो रूटकडून आलेल्या एका धावेसाठीच्या हाकेला उत्तर द्यायला त्याला उशीर झाला. त्यामुळे रूटने रेषा ओलांडली परंतु मोहम्मद शामीने स्टंपवर थेट चेंडू टाकल्यामुळे क्राऊली बाद झाला. 

रूट आणि त्यानंतरचा लगेचचा फलंदाद जॉनी बेरस्टो यांनी चौथ्या दिवसाच्या अंतिम सत्रात अर्धशतके फटकावली आणि त्यांच्या १५० धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला ५७ ओव्हर्समध्ये २६०/३ धावा पूर्ण करणे शक्य झाले. 

हे दोन्ही संघ आता इंग्लंड विरूद्ध भारताच्या पाचव्या कसोटी सामन्यात अटीतटीच्या खेळासाठी शेवटच्या दिवशी उतरणार आहेत. इंग्लिश टीम कसोटी मालिकेतील त्यांच्या सर्वाधिक धावांच्या यशस्वी पाठलागापासून फक्त ११९ धावांवर आहे तर भारताला इंग्लिश भूमीवर पहिला कसोटी विजय नोंदवण्यासाठी सात विकेट्सची गरज आहे. 

इंग्लंड विरूद्ध भारताचा पाचव्या कसोटीतील पाचव्या दिवसाचा खेळ मंगळवार दिनांक ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुरू होईल.