हॅपी बूम डे: आमच्या लीडरचा बड्डे... आमच्या लाडक्याचा बड्डे
२०१३: एक तरूण खेळाडू मैदानात आला.
२०२५: तोच खेळाडू आता आपला सुपरस्टार झालाय.
हो, तुम्ही बरोबर म्हणताय. त्याचं नाव आहे जसप्रीत ‘बुम’राह. 😎
ब्लू अँड गोल्ड परिधान केल्याच्या क्षणापासून त्याने स्वतःच्या क्षमतेची चुणूक दाखवली आहे. त्याच्या या एक्शनने प्रशिक्षणाची पद्धत बदलली. त्याने अनेक वर्षे अथक मेहनत केली.
त्याच्या प्रत्येक गोलंदाजीमध्ये आलेला भेदकपणा या मेहनतीचेच फलित आहे. एक नवीन खेळाडू ते जागतिक दर्जाचा ब्रिलियन्सपर्यंतचा हा प्रवास अद्भुत आहे.
तो आज फक्त मुंबईचा मुख्य गोलंदाज नाहीये. तो आयपीएलमध्ये गोल्ड अँड ब्लूसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आणि भारतासाठी राष्ट्रीय खजिना आहे. या गोलंदाजाने आशा टिकवून ठेवल्या, अनेक भीतीदायक भागीदारींना गायब केले आणि सामने आपल्याकडे फिरवून घेतले आहेत.
पांढरा चेंडू असो वा लाल चेंडू असो, डेथ ओव्हर्स असो किंवा पॉवर प्ले असो. बुमराहने प्रत्येकाला स्वतःच्या तालावर नाचवले. अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने, पापणी लवायच्या आत त्याने विकेट्स घेतल्या आहेत.
त्याच्या सर्व स्वरूपातल्या क्रिकेटमधील विकेट्सची आकडेवारी आपल्याला बरेच काही सांगतेः कसोटी: २३४ | ओडीआय: १४९ | टी२०आय: ९९ | आयपीएल: १८३
त्याचा शिस्तबद्ध खेळ, सर्वोत्तम कामगिरी आणि अत्यंत कठीण ओव्हर्स सोप्या करून दाखवण्याची पद्धत यामुळे तो आपला जादूगार आहे. त्याचा चेंडू खेळणं कठीणच नाही तर अशक्य आहे. तो खेळायला उतरतो तेव्हा फलंदाजांना धडकी भरते ते उगाच नाही.
त्याचा सर्वांत स्ट्राँग पॉइंट म्हणजे त्याचा यॉर्कर आहे. तो कुठल्या क्षणी यॉर्कर टाकून घोटा फोडेल याचा नेम नसतो. जगातल्या कोणत्याही घातक फलंदाजाला बाद करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे.
त्यामुळे आपल्या लाडक्या जसप्रीत बुमराहला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🥳💙
हे पुढील वर्ष त्याला आनंद, उत्साह, फिटनेस आणि अर्थात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी२०आय मालिकेत आणि त्याहीपलीकडे जाऊन प्रचंड विकेट्स घेऊन येईल, अशा शुभेच्छा.