News

भारताने आयर्लंडविरूद्धची २-० ने टी२०आय मालिका खिशात टाकली

By Mumbai Indians

भारताने मलाहिदे क्रिकेट क्लब मैदानात झालेल्या टी२०आय सामन्यात अत्यंत कसून उतरलेल्या आयर्लंडच्या संघावर चार धावांनी विजय प्राप्त केला आहे.

दीपक हूडाने केलेली शतकी खेळी (१०४) आणि संजू सॅम्सनचे पहिले अर्धशतक (७७) यांच्यामुळे भारताला २० ओव्हर्समध्ये २२७/७ अशी कामगिरी करून विजय प्राप्त करून दिला.

कर्णधार अँडी बलबर्नी (६०), पॉल स्टर्लिंग (४०) यांच्या आणि जॉर्ज डॉकरेल (३४) आणि मार्क अडेर (२३) यांच्या दिमाखदार खेळीमुळे २२६ धावांच्या लक्ष्यापर्यंत आयर्लंड पोहोचले. परंतु त्यांना टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावांचे लक्ष्य साध्य ककरता आले नाही. 

भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेन इन ब्लूनी खेळणाऱ्या ११ च्या संघात तीन बदल केले. ऋतुराज गायकवाडच्या जागी संजू सॅम्सनला आणण्यात आले तर हर्षल पटेल आणि रवी बिष्णोई अवेश खान आणि युजवेंद्र चहल यांच्या जागी खेळण्यासाठी आले.

त्याचवेळी आयर्लंडने सोमवारच्या पहिल्या सामन्यातील आपल्या ११ खेळाडूंच्या संघालाच खेळवण्याचा निर्णय घेतला.

संजू सॅम्सनने भारताला एक चांगली सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या दोन ओव्हर्समध्ये १० चेंडूंवर १३ धावा काढल्या. परंतु त्याचा ओपनिंग जोडीदार ईशान किशन तीन धावांवर बाद झाला. हा डावखुरा खेळाडू लेग साइडला स्लॉग शॉट देण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मार्क एडेरची गोलंदाजी- तीन ओव्हरमधला पहिला चेंडू अनपेक्षितपणे वळून बाहेर गेला आणि विकेट कीपर कॉर्लन टकरच्या हातात जाऊन विसावला.

भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत असताना संजू सॅम्सन- दीपक हूडा यांच्या जोडीने ५.५ ओव्हर्समध्ये भारताचे अर्धशतक पूर्ण केले. पाहुण्या संघाने सहा ओव्हर्समध्ये ५४/१ ची धावसंख्या उभारून पॉवरप्ले समाप्त केला. हुडाने या टप्प्यात दोन चौकार आणि दोन षटकार मारल्यामुळे हे शक्य झाले.

दहाव्या ओव्हरच्या शेवटी दीपक हूडाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने टी२०आयच्या आपल्या करियरमधील पहिले अर्धशतक फक्त २७ चेंडूंवर पूर्ण केले. संजू सॅम्सननेही त्याचा कित्ता गिरवून फक्त ३१ चेंडूंवर आपले पहिले टी२०आय अर्धशतक पूर्ण केले.

भारताची टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सर्वोत्तम भागीदारी १७ व्या ओव्हरमध्ये संपली. मार्क एडेरच्या खाली राहिलेल्या चेंडूने मधला स्टंप उडवला आणि संजू सॅम्सन ४२ चेंडूंवर ७७ धावा काढून परतला. तिसऱ्या विकेटसाठी १७६ धावांच्या भागीदारीमुळे रोहित शर्मा आणि के एल राहुल यांच्या २०१७ मधील श्रीलंकेविरूद्धच्या १६५ धावांच्या सलामीच्या भागीदारीला मागे टाकले.

हूडा सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यानंतर टी२०आंतरराष्ट्री सामन्यांमध्ये शतक पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. त्याने हा टप्पा फक्त ५४ चेंडूंमध्ये पूर्ण केला.

चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या सूर्यकुमार यादवने लॉर्कन टकरच्या गोलंदाजीवर चेंडू टोलवायच्या नादात विकेट कीपरच्या हातात सोपवला आणि १५ धावांवर बाद झाला.

स्काय यादवची विकेट घेणाऱ्या जोशुआ लिटिल या गोलंदाजाने दीपक हूडाची महत्त्वाची विकेट घेऊन चार ओव्हरचा आपला कोटा पूर्ण केला. या २७ वर्षीय खेळाडूने डीप पॉइंटच्या दिशेने पूर्णपणे आऊटसाईड चेंडू टोलवल्यानंतर अँडी मॅकब्रायनने कॅच घेतली. हूडाने फक्त ५७ चेंडूंवर आपली १०४ धावांची खेळी पूर्ण केली.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यजमानांसाठी ५० वा सामना खेळणाऱ्या क्रेग यंगने आपला कोटा दिनेश कार्तिक आणि अक्झर पटेल यांच्या एकामागून एक विकेट्स घेऊन पूर्ण केला.

कार्तिक एका चांगल्या चेंडूवर बाद झाला. त्याच्या बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि तो टकरच्या हातात जाऊन थांबला. यंगच्या चेंडूवर अक्झर पटेलने षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू डीप मिड विकेटवर जॉर्ज डॉकरेलकडे गेला.

हर्षल पटेल हा या सामन्यातील मार्क एडेरचा तिसरा बळी ठरला. परंतु भारताने आपली पहिली इनिंग २२५/७ या धावसंख्येवर संपवली. ही भारतीय संघाची आयर्लंडविरूद्ध टी२०आय मालिकेतील सर्वाधिक धावसंख्या आहे.

आयर्लंडने पहिल्याच ओव्हरमध्ये १८ धावा टोलवून २२६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण तयार आहोत हे दाखवून दिले. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पहिल्या टी२०आय सामन्यात चार धावांवर बाद झालेल्या पॉल स्टर्लिंगने एक षटकार आणि तीन सलग चौकार मारले. त्यापूर्वीचे दोन चेंडू शून्य धावा देणारे होते.

यजमान संघाने फक्त ३.५ ओव्हर्समध्ये ५०/० चा स्कोअर केला आणि त्यांनी ५.४ ओव्हर्समध्ये आपली पहिली विकेट गमावली. एलबीडब्ल्यूने बाद झाल्याबाबत अपील नाकारण्यात आल्यानंतर रवी बिष्णोईने गुगली टाकली आणि या आयरिश खेळाडू स्टंप्सवर चेंडू आदळल्यामुळे बाद झाला. पॉवरप्लेनंतर आयर्लंडचा संघ ७३/१ या धावसंख्येवर होता.

भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने स्टंप्सवर थेट चेंडू टाकून गॅरेथ डेलनीला शून्यावर बाद केले.

दहा ओव्हर्स संपत असताना आयर्लंडचा स्कोअर १०७/२ वर होता. कर्णधार अँडी बलबर्नीने आपल्या टी२०आय करियरचे सहावे अर्धशतक फक्त ३४ धावांमध्ये पूर्ण केले. तथापि, त्यांच्या इनिंग्स १०.२ ओव्हर्समध्ये संपल्या. त्यांनी हर्षल पटेलचा चेंडू डीप पॉइंटवर रवी बिष्णोईच्या हातात दिला. आयर्लंडचा कर्णधार ३४ चेंडूंवर ६० धावा काढून बाद झाला.

उमरान मलिकच्या चेंडूला लॉर्कन टकरने लाँग ऑफवर टोलवले आणि त्याला आंतरराष्ट्रीय करियरमधली पहिली विकेट दिली. परंतु बदली आलेल्या फील्डर युजवेंद्र चहलने डावीकडे धाव घेऊन कॅच घेतली.

आयर्लंडने रवी बिष्णोईच्या शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढल्या. पंधराव्या ओव्हरमध्ये या भारतीय स्पिनरच्या गोलंदाजीवर १७ धावा कुटल्या गेल्या. जॉर्ज डॉकरेलने एक षटकार आणि दोन चौकार ठोकले.

यजमानांसाठी सामना त्यांच्या दिशेने कलत असताना भुवनेश्वर कुमारने हॅरी टेक्टरची विकेट अत्यंत सहजपणे घेतली. त्यांने डॉकरेलसोबत पाचव्या विकेटसाठी ४७ धावा काढल्या.

शेवटच्या ओव्हरमध्ये १७ धावांची गरज असताना मार्क एडेरने यजमान संघाला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. परंतु उमरान मलिककडून आलेले दोन शून्य धावांचे चेंडू निर्णायक ठरले. भारताने आपला आयर्लंडचा दौरा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली १०० टक्के यशस्वी केला.