News

INDvSA, तिसरा ओडीआय: मालिका स्टाइलमध्ये २-१ ने विजयी

By Mumbai Indians

मालिका निश्चित करणारा सामना. वैजग. शनिवार. कधीकधी पटकथा स्वतःच एक रोमांच निर्माण करते आणि हा सामना तसाच काहीसा होता.

त्या दिवशी पहिला चेंडू पडण्यापूर्वीच चांगलाच जल्लोष झाला. केएल राहुल मैदानात आला. त्याने नाणेफेक केली आणि मोठ्या कालावधीनंतर प्रथमच भारताने नाणेफेक जिंकली. वीस पराभवांची परंपरा खंडित झाली. सुटकेचा निःश्वास स्पष्टच ऐकू आला.

केएल थांबलाच नाही. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सामन्याचा रंगच पालटला.

अर्शने दाराला खिंडार पाडले. प्रसिद्ध आणि कुलदीपने माघार घेतली नाही. 🔓

अर्शदीप सिंगने आपली दुसरी ओव्हर टाकली. त्याचा तो खास डावखुरा अंदाज, त्याचा नेहमीचा जल्लोष. भारताने एक विकेट घेतली आणि चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले.

त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव या जोडगोळीने नौका हातात घेतली. त्यांनी जोरदार पाडकामाला सुरूवात केली. या दोघांनी प्रत्येकी चार विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला टिकूच दिले नाही. क्यूडीकेने सुंदर शतक केले परंतु त्या शतकाचा फायदाही त्यांना झाला नाही. पाहुणा संघ २७० वर थांबला. 

मालिकेत विजयी होण्यासाठी २७१ धावा हव्या होत्या. त्यामुळे पाठलागाला मजा येणार होती.

रो - दि हिटमॅनने वैजागवर वर्चस्व गाजवले 🎥🔥

रोहित शर्मा आपल्या खास मूडमध्ये होता. तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकून घेतले सारे.

त्याचे पुल्स, ड्राइव्ह्स बघत राहावे असे होते. त्याने ७३ चेंडूंमध्ये सुंदर ७५ धावा धावा फटावल्या. त्याने या दरम्यान २०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रमही रचला.

मुंबईचा राजा केव्हाच जागतिक राजा झालाय. त्याच्या मुकुटात आणखी एक हिरा रोवला गेला.

दुसरीकडे एक तरूण वादळ घोंघावत होते.

जैस्वालचे पहिले ओडीआय शतक 🌟

यशस्वी जैस्वालने चांगलीच फटकेबाजी केली. तो अजिबात घाबरला नाही. त्याने घाई केली नाही. अत्यंत देखणा सुंदर खेळ केला.

आपली सलामी धावसंख्या किती होती माहित्ये का? आपण तब्बल १५५ धावा केल्या. त्यामुळे पाठलाग खूप सोपा झाला. रोहित बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू लगेचच रूळला. कारण तो होता विराट कोहली. त्याने जैस्वालच्या जोडीने हा पाठलाग अत्यंत सहजपणे पूर्ण होईल याची काळजी घेतली. या दोघांनी संयमाने चांगली धावसंख्या रचली.

अप्रतिम धावा, कव्हरमधून विराटची खास फटकेबाजी आणि जैस्वालचे शतक यांच्यामुळे नऊ विकेट्स शिल्लक असताना भारताने विजय मिळवला.

भारताचा ९ विकेट्सनी विजय. मालिका २-१ ने खिशात.

आता? आता आपण गिअर बदलणार आहोत. सर्वांत लहान स्वरूपात खेळणार आहोत. टी२०आयसाठी तयार आहोत.

 

थोडक्यात धावसंख्या: भारत २७१/१ (यशस्वी जैस्वाल ११६*, केशव महाराज १/४४) कडून दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनी पराभव २७०/१० (क्विंटन दे कॉक १०६, कुलदीप यादव ४/४१).