पालघर एक्स्प्रेस ऊर्फ लॉर्ड शार्दुल, #AalaRe
पलटन, आज खूश असाल ना तुम्ही!
मुंबईचा पोरगा शार्दुल ठाकूर आता आयपीएल २०२६ पूर्वीच्या ट्रेड विंडोमध्ये #OneFamily मध्ये आलाय.
आपल्या मुंबईकरासोबत रोहितचं शाणा वागणं आठवतं का? शार्दुलने खूपच सीरियसली घेतलं वाटतं ते … 😉
When बोरीवली meets पालघर 😂💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvLSG pic.twitter.com/pQQMFplNHl
— Mumbai Indians (@mipaltan) April 25, 2025
आता त्याच्या खेळाबद्दल बोलायचं झालं तर हा अष्टपैलू खेळाडू आपल्यासोबत प्रचंड अनुभव आणि त्याचा खास कधीही न हार मानण्याचा एटिट्यूड घेऊन आलाय जो ब्लू अँड गोल्ड स्पिरिटशी जुळणाराच आहे.
त्याने १०५ आयपीएल सामन्यांमद्ये १०७ विकेट्स घेऊन पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की तो पापणी लवायच्या आत भागीदारी तोडू शकतो, कमबॅक करू शकतो आणि सामने पालटू शकतो. त्याच्या हातात बॅट असते तेव्हा तर सगळ्यांनी फक्त श्वास रोखून धरायचे असतात. 🔥
टीम इंडियाचे गब्बा आणि ओव्हलमधले २०२१ मधले सामने आठवतात का? या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अविस्मरणीय होती. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला त्यांच्याच घरी हरवण्यात महत्त्वाचा भाग घेतला होता.
The Gabba, 2021. pic.twitter.com/PgeldAOAjw
— Mumbai Indians (@mipaltan) January 19, 2021
तर आता पालघर एक्स्प्रेस वानखेडे प्लॅटफॉर्मवर पोहोचली आहे. आम्हीसुद्धा खूश आहोत. आन्देव, आयपीएल २०२६!