News

कॅरेबियन फटाका शेरफाने रूदरफोर्ट २०२० च्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी एमआयच्या गोटात दाखल

By Mumbai Indians

आयपीएल २०२६ पूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटात शेरफाने रूदरफोर्डच्या रूपाने एक ओळखीचा चेहरा आला आहे.

कॅरेबियनमधला हा स्फोटक मधल्या फळीतला फलंदाज आपल्यासोबत प्रचंड अनुभवाची खाण घेऊन आला आहे. त्याने जगभरात २०० पेक्षा जास्त टी२० सामने आणि ३५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रूदरफोर्डकडे जेथे जाईल तेथे धावफलक पळवत ठेवण्याची क्षमता आहे.

त्याची ही स्फोटक फलंदाजी आणि वेगवान धावा जोडण्याची क्षमता तसेच उजव्या हाताचा जलद-मध्यम गती गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी त्याला संघात संतुलन आणि फटकेबाजी यांचे अप्रतिम मिश्रण ठरवते. त्यामुळे आपल्या क्रिकेट ब्रँडसाठी तो एक उत्तम पर्याय ठरेल.

आपला ब्लू अँड गोल्ड गणवेश एखादा वेस्ट इंडियन परिधान करतो तेव्हा आतषबाजी होणारच याची गॅरंटी असते. कायरन पोलार्ड, लेन्डिल सिमॉन्स आणि इतर माहित्येत ना... 😉

आणि हो, हे सांगायलाच विसरलो! रूदरफोर्ड २०२० च्या विजयी संघाचा भाग होता आणि अविस्मरणीय क्षण पुन्हा जपण्यासाठी तो परतलाय.

वेलकम बॅक, शेरफाने! 💙