News

बूमचा फायफर, सॅम्सने पाडलेले खिंडारः सीझनच्या सर्वोत्तम खेळांच्या आठवणी

By Mumbai Indians

टाटा आयपीएल २०२२ च्या आमच्या १४ लीग सामन्यांच्या कालावधीत आमच्या गोलंदाजांनी अत्यंत अप्रतिम कामगिरी केली. काही गोलंदाज पॉवरप्लेमध्ये आले, काही डेथ ओव्हर्समध्ये तर काही मधल्या ओव्हर्समध्ये आहे.

काही अविस्मरणीय खेळींच्या आठवणी जागृत करूया.

डॅनियल सॅम्स- सीएसकेविरूद्ध ४/३०, डी वाय पाटील स्टेडिमय, २१ एप्रिल

आपल्या इनिंगच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन तोडफोडीला सुरूवात करणे यापेक्षा जास्त एखाद्या गोलंदाजासाठी काय असू शकते. डॅन सॅम्सने नेमके हेच सीएसकेविरूद्धच्या सामन्यात केले.

त्याने ऋतुराज गायकवाडला कट मारण्यासाठी मोहात पाडण्याच्या दृष्टीने वाइड बॉल टाकला. फलंदाजाने ते आमंत्रण स्वीकारले आणि बॉल अगदी सहजपणे बॅकवर्ड पॉइंटवर तिलक वर्माच्या हातात जाऊन विसावला. सॅम्सने सीएसकेच्या फलंदाजांवर तिथूनच हल्ला चढवायला सुरूवात केली.

आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने मिशेल संतनरला शॉर्ट बॉल टाकला. तो जास्त वर उडाल्यामुळे त्याने फटकावला आणि परिणाम व्हायचा तोच झाला. त्यानंतर सॅम्स १३ व्या ओव्हरमध्ये परतला. त्याने फॉर्ममध्ये असलेल्या शिवम दुबेला बॅडच्या कडेने चेंडू टोलवायला भाग पाडले. ईशानने एक अप्रतिम डाइव्ह घेऊन त्याला आऊट केले.

सामन्याच्या १५ व्या ओव्हरमध्ये सॅम्सने अंबाटी रायाडूला एक फुलटॉस टाकला. रायाडूला तो जोरात टोलवायचा मोह आवरला नाही. पॉलीने लाँग ऑफवर चेंडू पकडला.

त्या रात्री सॅम्सने आपल्या प्रत्येक ओव्हरमध्ये एकेक फलंदाज आऊट केले आणि या सीझनमध्ये त्याचा फॉर्म नंतर पूर्ण सीझनमध्ये दिसला.

एम अश्विन- २/२९ जीटीविरूद्ध सामन्या, ब्रेबॉर्न स्टेडियम, ६ मे

तुमच्या प्रतिस्पर्धी संघाचे दोन सेट झालेले ओपनर्स एकाच ओव्हरमध्ये एकामागून एक बाद होतात तेव्हा ती खेळी खूप खास असते. एम. अश्विनने जीटीविरूद्ध त्या ओव्हरमध्ये सामना फिरवला.

आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये चार धावा दिल्यानंतर एशने दुसऱ्या ओव्हरमध्ये १३ धावा दिल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये ११ धावा दिल्या. पण त्याची त्या रात्रीची शेवटची ओव्हर डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.

जीटी वर्चस्व गाजवत असताना १३ ओव्हरमध्ये तो आला. तोपर्यंत वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके फटकावली होती आणि त्यांना शेवटच्या ओव्हरमध्ये ७२ धावांची गरज होती.

एशच्या खेळापुढे गिलने आधी मान टाकली. त्याने बॉल टाकला. गिल थोडा खाली वाकला. पण बॉल गिलला चकवून थोडासा लांब गेला. त्याला बॉलचा अंदाज आला नाही आणि थोडक्यात लाँग ऑनवर पॉलीला कॅच दिला.

पाच बॉल्सनंतर साहाने स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा झाला नाही. एशने नेहमीपेक्षा जास्त वेगाने बॉल टाकला. जीटीच्या या ओपनरच्या बॅटची वरची बाजू बॉलला लागली. त्यामुळे डॅन सॅम्सला डीप बॅकवर्ड स्क्वेअरवर विकेट मिळाली.

एशने त्या रात्री दोन महत्त्वाचे खेळाडू आऊट करून जीटीच्या सेट झालेल्या फलंदाजांना बाजूला काढले आणि त्यांच्या पाठलागाचा वेग कमी केला.

जसप्रीत बुमरा - /१० केकेआरविरूद्ध, डी वाय पाटील स्टेडियम, ९ मे

टी २० क्रिकेटमधला पहिला फायफर, तीन विकेट्स आणि शून्य धावांची ओव्हर आणि चार ओव्हर्समध्ये १८ डॉट बॉल्स. या देखण्या खेळीबद्दल आम्ही आणखी काही सांगायची गरज आहे का?

त्या रात्री केकेआरविरूद्ध बूमने कमाल केली. त्याच्या पहिल्याच चेंडूवर एक चौकार मारण्यात आल्यानंतर त्याने फलंदाजांना जराही संधी दिली नाही.

रोने त्याला आंद्रे रसेलसाठी मागे ठेवले होते. बूमने त्याचा विश्वास सार्थ ठरवत एकाच ओव्हरमध्ये रसेल आणि नितीश राणा यांना बाद केले.

बूमने त्यानंतर १८ व्या ओव्हरमध्ये शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि सुनील नरिने यांना पाच बॉल्सवर एकही धाव न देता बाद केले आणि त्याच्या तसेच इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने फक्त एक रन दिला.

टी२० च्या इतिहासातला हा एक महान खेळ होता असे म्हणता येईल.

डॅनियल सॅम्स - /१६ सीएसकेविरूद्ध, वानखेडे स्टेडियम १२ मे

डॅन सॅम्सने सीएसकेविरूद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी केली. हे वानखेडेवरील त्याच्या टॉप क्लास नवीन बॉलच्या खेळीतून दिसून आले.

सॅम्सने पुन्हा एकदा पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाज आऊट केला. पण या वेळी सलग दोनदा त्याने फलंदाज बाद केले. आपल्या दुसऱ्याच बॉलवर त्याने डेवॉन कॉन्वेला बाद केले. त्याच्या पॅड्सवर बॉल आदळून विकेटसमोर तो पकडला.

तीन बॉल्सनंतर त्याने मोई अलीला शॉर्ट चेंडू टाकला. त्याला बाऊन्सरचा अंदाज आला नाही आणि त्याने मिड विकेटला हृतिकला अत्यंत सहज कॅच दिला.

सॅम्सच्या आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडच्या बॅटची कडा त्याच्या लेग साइडला चाटून गेली आणि त्याला आपल्या गोलंदाजीवर दुसऱ्यांदा बाद केले.

सॅम्सने पॉवरप्लेमध्ये ३/१४ अशी कामगिरी केली जी एमआयच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळांपैकी एक होती. त्याने सीएसकेला खिंडार पाडून हा सामना ३/१६ वर संपवला.

रमणदीप सिंग - /२० एसआरएचविरूद्ध, वानखेडे स्टेडियम, १७ मे

नवव्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आल्यानंतर रमणदीपसिंगने तीन ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेतल्या आणि सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

एसआरएच प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठी यांच्या ५० धावांच्या भागीदारीने आत्मविश्वास मिळवत असातना रोने रमणदीपला नवव्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी बोलावले आणि त्याने लगेच फलंदाज बाद केले.

रमणदीपने पाचव्या बॉलवर गर्गला चकवले. शेवटी गर्गने एक सोपा कॅच दिला. रमणदीपने तो लगेच पकडून त्याला बाद केले.

अठराव्या ओव्हरमध्ये रमणदीपने आणखी एक स्लो चेंडू टाकला. फॉर्ममध्ये असलेला त्रिपाठी एक मोठा फटका मारायच्या प्रयत्नात चुकला. त्याचा कॅच तिलकने घेतला.

त्याच ओव्हरमध्ये रमणदीपने फुलटॉस आणि स्लो टाकला आणि एडन मार्क्रमला त्यावर काम करण्यासाठी जागा आणि वेगही दिला नाही. त्यामुळे डीपवर आणखी एक कॅच दिला गेला आणि रमणदीपने डेथ ओव्हरमध्ये एसआरएचला पुरते थकवले.

त्याने त्या रात्री फक्त तीन ओव्हर्स टाकल्या. पण त्याची स्मार्ट बॉलिंग आणि उत्तम फील्डिंग यांच्यामुळे हा खेळ अविस्मरणीय झाला.

आपले अनुभवी आणि तरूण गोलंदाज एक चांगली भागीदारी उभी करून आव्हान स्वीकारत आहेत. हे भविष्यासाठी सुचिन्ह आहे.