News

स्कायच्या आयसीसी टी२०आय टीममधील समावेशानिमित्त २०२२ मधले पाच सर्वोत्तम सामने!

By Mumbai Indians

आपल्याला कोणालाही जरासुद्धा याचे आश्चर्य वाटले आहे का? जोफ्रा आर्चरच्या आंतरराष्ट्रीय करियरच्या पहिल्याच चेंडूवर एक षटकार ठोकणारा हा तरूण, त्याच्या टॅलेंटसाठी हे जरा सोपेच आहे.

आपला दादा आयसीसी टी२० टीम ऑफ दि इयर २०२२ मध्ये पोहोचला आहे. त्याने या कॅलेंडर वर्षाचा समारोप या स्वरूपातला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून केला आहे.

ही आकडेवारी काय सांगते? त्याने ३१ सामन्यांमध्ये ११६४ धावा कुटल्या, त्याही ४६.५६ च्या सरासरीने आणि १८७.४३ अशा तूफानी स्ट्राइक रेटने. त्याने या दरम्यान दोन शतके आणि नऊ अर्धशतके फटकावली. *उभे राहा, एमआय फॅम, त्याचे कौतुक केलेच पाहिजे. *

स्काय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठमोठे टप्पे गाठतो आहे आणि त्याचा आता कसोटी संघातही समावेश झाला आहे (असाच मोठा होत राहा, दादा!). त्याचे फलंदाजीतले हे अविस्मरणीय वर्ष आपल्याला २०२२ मधल्या सर्वोत्तम पाच कामगिरींची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही.

1. आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ | भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (४० चेंडूंमध्ये ६८ धावा): प्रचंड तणावाखाली जोरदार फटकेबाजी!

एका शक्तिशाली प्रतिस्पर्ध्याविरूद्ध एक महत्त्वाचा विश्वचषक. पहिल्या फळीतले फलंदाज लवकर बाद झाले. पण स्कायने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधला सर्वोत्तम खेळ करून भारताला एक चांगली धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. त्याने ४० चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. टीममधल्या इतर कोणत्याही फलंदाजाला १५ पेक्षा धावा करता आल्या नाहीत.


2. न्यूझीलंड विरूद्ध भारत | दुसरा टी२०आय (५१ चेंडूंमध्ये १११): तो खरोखर एका वेगळ्या पिचवर फलंदाजी करत होता

माऊंट माऊंगनुईमध्ये भारताने दुसऱ्या टी२०आयमध्ये आधी फलंदाजी करताना १९१/६ धावा केल्या. या दोन्ही टीम्समध्ये दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला १५० चा स्ट्राइक रेट साधता आला नाही. परंतु सूर्याने आपले दुसरे टी२०आय शतक झळकवले. त्यात ११ चौकार आणि सात षटकार होते. हा खरोखरच अप्रतिम सामना होता, नाही का?


3. इंग्लंड विरूद्ध भारत | तिसरा टी२०आय (५५ चेंडूंमध्ये ११७ धावा): पहिले आंतरराष्ट्रीय शतक!

कोणत्याही क्रिकेटपटूसाठी पहिले आंतरराष्ट्रीय शतक नेहमीच खास असते आणि स्कायदादाने ते खूप तणावाखाली पूर्ण केले. भारताने २१६ धावांचा पाठलाग करताना सुरूवातीला विकेट्स गमावल्या परंतु त्याने हार मानली नाही. शेवटी त्याने ट्रेंट ब्रिजवर जवळपास धावांचा अशक्य पाठलाग पूर्ण केला आणि ब्रिटिश गोलंदाजांच्या डोळ्यांसमोर तारे चमकवले.

4. भारत विरूद्ध श्रीलंका | दुसरा टी२०आय (२२ चेंडूंमध्ये ६१ धावा): २७७.२७चा स्ट्राइक रेट!

स्कायचा मिडास टच त्या वेळी सगळीकडे काम करत होता. हात लावीन तिथे सोने काढीन असाच दृष्टीकोन ठेवून तो खेळत होता. भारताने या सामन्यात २०२२ चा सर्वाधिक टी२०आय स्कोअर केला. त्याचे कारण स्कायचा हा स्फोटक खेळ होता. तिथे त्याने पाच षटकार आणि पाच चौकार फटकावले

5. आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ | भारत विरूद्ध झिम्बाब्वे (२५ चेंडूंमध्ये ६१ धावा): गणित, भौतिकशास्त्रही मागे पडले!

सूर्यकुमार यादव कोणत्याही मैदानात फटकेबाजी करायचे सोडत नाही हे स्पष्ट झाले होते. परंतु झिम्बाब्वेविरूद्ध त्याने जो काही खेळ केला, तो डोळे दिपवणारा होता.  त्याने यॉर्कर्सनाही फाइन लेग आणि स्क्वेअर लेगच्या सीमारेषांपलीकडे पाठवले. स्काय च्युइंगगम चघळत मैदानावर वाघासारखा चालत होता तेव्हा एमसीजीवरच्या ७०,००० पेक्षा अधिक चाहत्यांनी उठून टाळ्यांचा कडकडाट केला. हा क्षण अंगावर रोमांच आणणारा होता.

विश्वास ठेवा, स्कायच्या कथेचा क्लायमॅक्स तर सोडाच पण अजून मध्यांतरही आलेले नाही. २०२३ हे वर्ष आणखी चांगले सुरू झाले आहे. तुमच्या सर्व अपेक्षांपलीकडे जाऊन क्रिकेटची मेजवानी हवी असेल तर स्कायदादावर विश्वास ठेवा.