News

रोमांचक मालिकेत भारताकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव, मालिकेत बरोबरी

By Mumbai Indians

पहिल्या टी२०आयमध्ये चार विकेट्सनी सामना हरल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने या पराभवाचा वचपा काढत ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सनी हरवले. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. 

अटीतटीच्या सामन्यात अनुभव एरॉन फिंच आणि मॅथ्यू वेड यांनी कांगारूंना त्यांच्या पहिल्या आठ ओव्हर्सच्या कोट्यामध्ये ९०/५ अशी कामगिरी करून दिली. आव्हानाचा सामना करत असताना कर्णधार रोहित शर्माने आघाडी घेऊन २० चेंडूंमध्ये ४६ धावा फटकावल्या आणि भारतीय संघाला चार चेंडू शिल्लक असताना विजय मिळवण्यासाठी मदत केली. 

दिवसभर पाऊस नव्हता. परंतु मैदान ओले असल्यामुळे सामन्याची सुरूवात दोन तास उशिराने झाली. 

दोन्ही संघांनी प्रत्येकी आठ ओव्हर्स आणि दोन पॉवर प्ले ओव्हर्स अशा प्रकारचा सामना खेळवण्याचे परिस्थितीच्या पाहणीनंतर सामनाधिकाऱ्यांनी निश्चित केले. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

भारताने आपल्या पहिल्या सामन्यातील खेळाडूंमध्ये दोन बदल केले. ऋषभ पंत आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना अनुक्रमे भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांच्या जागेवर खेळवले. 

ऑस्ट्रेलियन संघासाठी डॅनियल सॅम्स दुखापतग्रस्त नॅथन एलिसच्या जागी खेळण्यासाठी आला तर सीन एबॉट जोश इंग्लिसच्या जागी खेळण्यासाठी आला. 

पहिल्या अडखळत्या ओव्हरनंतर ऑस्ट्रेलियाने आपली पहिली विकेट कॅमेरॉन ग्रीनच्या रूपात विराट कोहलीने अप्रतिम कामगिरीमुळे गमावली. 

त्यानंतर लवकरच अक्झर पटेलने ग्लेन मॅक्सवेल आणि टिम डेव्हिड यांना लागोपाठच्या ओव्हरमध्ये बाद केले. ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद झाला. 

चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमरा याने एक यॉर्कर टाकून संघाला अडचणीत टाकू शकणाऱ्या एरॉन फिंचला पॅव्हिलियनला परत पाठवले. ऑस्ट्रेलियन कर्णधारानेही परत जात असताना या यॉर्करचे दिलखुलासपणे कौतुक केले. 

पहिल्या टी२०आयपासून आपला फलंदाजीचा फॉर्म मॅथ्यू वेडने कायम ठेवला. त्याने २० चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने तब्बल १९ धावा कुटल्या आणि पाहुण्या संघाला त्यांना नेमून दिलेल्या ओव्हर्समध्ये ९०/५ अशा धावा करून दिल्या. 

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीने- रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये २० धावा फटकावून बॅटचे पाणी पाहुण्या संघाला चाखवले. 

एडम झम्पाने केएल राहुलला तिसऱ्या ओव्हरमध्ये १० धावांवर बाद करून कांगारूंना आपली पहिली विकेट मिळवून दिली. अर्ध्या ओव्हरचा कोटा पूर्ण होत असताना भारतीय संघ प्रति ओव्हर १२.७५ धावा कुटत होता. 

परंतु एडम झम्पाने भारताच्या या वेगाला खीळ घातला. त्याने विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना पाचव्या ओव्हरमध्ये बाद केले. त्यामुळे भारताला धक्का बसला. 

भारत ५५/३ वर असल्यामुळे सामना अधांतरी अडकला. परंतु रोहित शर्माच्या क्रीझवरील खेळामुळे हा वेग भारताच्या दिशेने पलटला. 

हार्दिक पंड्या पॅट कमिन्सकडून ९ धावांवर बाद झाला. परंतु दिनेश कार्तिकने (१०* धावा दोन चेंडू) शेवटच्या ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौकार ठोकून सामना संपवला. 

या दरम्यान रोहित शर्माने टी२०आयमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूचा विक्रम केलेल्या मार्टिन गुप्तिलचा विक्रम मोडला. त्याची आकडेवारी आता १७६ असून ती न्यूझीलंडच्या फलंदाजापेक्षा चारने जास्त आहे. 

या विजयासोबत भारताने व्हीसीए स्टेडियमवर ऑस्ट्रेलियावर आपले वर्चस्व गाजवण्याचा पायंडा कायम राखला आहे. नागपूरमधील या खेळपट्टीवर पाहुण्या संघाविरूद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यांपैकी हा त्यांचा सहावा विजय होता. 

थोडक्यात धावसंख्या: ऑस्ट्रेलिया ९०/५ ८ ओव्हर्समध्ये (मॅथ्यू वेड ४३*, अक्झर पटेल २/१३) भारती संघाकडून सहा विकेट्सनी पराभव. भारताची धावसंख्या ९२/४ ७.२ ओव्हर्समध्ये (रोहित शर्मा ४६*; एडम झम्पा ३/१६) 

आता आणखी एक उत्कंठावर्धक सामना तिसरा टी२०आय राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद येथे रविवारी होणार आहे कारण मालिका आता बरोबरीत आहे. त्यामुळे कोणता संघ जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.