एमआय फॅमिली मेंबरशिप प्रोग्राम मानक अटी आणि शर्ती २०२२

इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (“आयएसपीएल”), या ‘मुंबई इंडियन्स’ व्यावसायिक ट्वेंटी २० क्रिकेट टीम (“MI”) च्या मालक आणि प्रवर्तक असलेल्या कंपनीकडून एमआय फॅमिली मेंबरशिप प्रोग्राम (“Program”) एमआय प्लॅटफॉर्मवर एमआयच्या चाहत्यांना दिली जात आहे. त्यात अधिकृत एमआय वेबसाइट www.mumbaiindians.com (“वेबसाइट”), आणि अधिकृत एमआय मोबाइल एप्लिकेशन्सवर (येथे उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.mumbaiindians आणि https://apps.apple.com/in/app/mumbai-indians-official-app/id1098173888) (“अॅप्स”).यांचा समावेश आहे. या एमआय फॅमिली मेंबरशिप प्रोग्राम मानक अटी आणि शर्ती २०२२ (“शर्ती”) प्रोग्रामला लागू आहेत ज्यात सदस्यत्वाच्या एका स्तराचा पर्याय निवडणारे चाहते यात नमूद केलेल्या शर्तींनुसार त्याच्याशी समकक्ष फायद्यांसाठी पात्र आहेत.

यात वापरण्यात आलेल्या परंतु या शर्तींमध्ये स्पष्ट न केलेल्या ठळक संज्ञांचा अर्थ https://www.mumbaiindians.com/marathi/terms-and-conditions, वर उपलब्ध असलेल्या वेबसाइट अटी आणि शर्तींसारखाच आणि या शर्तींमध्ये संदर्भाने समाविष्ट केलेल्या संज्ञांप्रमाणेच असेल.

या शर्तींच्या उद्दिष्टासाठी संदर्भात "तुम्ही", “तुमचे”, “तुम्ही स्वतः”, “त्यांचे” किंवा “वापरकर्ता” असे नमूद असल्यास त्याचा अर्थ अशी कोणतीही व्यक्ती जी वेबसाइट पाहते किंवा वापरते आणि/ किंवा प्रोग्रामसाठी अर्ज भरते आणि/ किंवा लाभार्थी (यात स्पष्ट केल्याप्रमाणे) आहे. “आम्ही”, “आमचे” or “आम्हाला” म्हणजे आयएसपीएल, तिचे कर्मचारी आणि वेबसाइट आणि/ किंवा प्रोग्रामच्या संदर्भात आयएसपीएलच्या वतीने कोणत्याही सेवा देणारे प्राधिकृत एजंट्स होय.

या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन तुम्ही या बाबी वाचल्या, समजून घेतल्या, स्वीकारल्या आणि मान्य केल्या असे गृहित धरले जाईलः (१) या अटींना बांधील असणे आणि वेळोवेळी अद्ययावत/ सुधारणा केल्याप्रमाणे या अटींची पूर्तता करणे आणि (ii) आमच्या https://www.mumbaiindians.com/marathi/privacy-policyयेथे उपलब्ध असलेल्या ‘गोपनीयता धोरणात’ विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे वैयक्तिक माहिती गोळा करणे, वापर, जाहीर करणे आणि इतर हाताळणी.

अतिरिक्त नियम/ अटी अस्तित्वात असू शकतात आणि प्रोग्रामचे तसेच प्रोग्रामअंतर्गत देण्यात येणारे कोणतेही फायदे, कार्यान्वयन आणि उपक्रमांचे प्रशासन करू शकतात. हे नियम https://www.mumbaiindians.com/marathi/membership येथे उपलब्ध असल्याप्रमाणे वेबसाइटच्या ‘एमआय फॅमिली मेंबरशिप प्रोग्राम’ विभागांतर्गत प्रकाशित केले जातील. अशा कोणत्याही अतिरिक्त नियम आणि शर्तींशी स्वतःची ओळख करून घेणे ही वापरकर्त्यांची जबाबदारी आहे. तसेच, प्रोग्राम किंवा अन्यथा वेबसाइट आणि/ किंवा एप्सवर देण्यात येऊ शकणाऱ्या कोणत्याही स्पर्धा, कार्यान्वयन उपक्रम आणि गेम्सच्या संदर्भात वापरकर्ते हे मान्य करतात की अशा स्पर्धा, कार्यान्वयन उपक्रम आणि गेम्सचे प्रशासन स्वतंत्र अटी आणि शर्तींद्वारे केले जाईल. त्यात वापरकर्त्यांच्या अशा स्पर्धा / उपक्रम/ कार्यान्वयन/ गेम्समध्ये सहभागी होण्याच्या आणि पारितोषिके जिंकण्याबाबतच्या पात्रतेबाबतच्या अटी आणि शर्तींचा समावेश असेल आणि अशा सर्व अटी आणि शर्ती संबंधित स्पर्धा / उपक्रम/ कार्यान्वयन/ गेम पेज/ विभागांमध्ये सूचित केल्या जातील.

उपक्रमाची उद्दिष्टे

हा उपक्रम खालील उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोः

  • एमआयच्या चाहत्यांना एमआय फॅमिलीच्या एका प्रोग्रामखाली णणे आणि टीमसाठी पाठिंबा मिळवणे.
  • एमआय फॅन समुदायासाठी एक मालकीहक्काची भावना निर्माण करणे.
  • एमआय फॅमिलीच्या माध्यमातून एमआय चाहत्यांमध्ये संवादाला चालना देणे.
  • एमआय टीमला निष्ठेने पाठिंबा देणे आणि संपूर्ण वर्षभर खेळाडूंना पाठिंबा देऊन प्रोत्साहन देणे.
  • एमआय टीमच्या सीएसआर उपक्रमांसोबत जोडून घेऊन पाठिंबा देणे.
  • वरील ध्येये पूर्ण करून त्यांचे पालन करणे आणि ती साध्य करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणे.

पात्रता

तुम्ही वेबसाइटवर आणि प्रोग्राममध्ये वैयक्तिक वापरकर्ता अकाऊंट (“युजर अकाऊंट”) साठी साइनअप करू शकता, तरच जर तुम्ही नोंदणीच्या दिवशीः

  • अठरा (१८) वर्षे वयाचे किंवा त्यापेक्षा अधिक असाल;
  • भारताचे रहिवासी असाल आणि/ किंवा भारतात कायमस्वरूपी निवासस्थान असल्यास;
  • एक वैध वैयक्तिक इमेल एड्रेस आणि मोबाइल क्रमांक तुमच्याकडे असल्यास आणि तो वापरात असल्यास;
  • या अटींच्या सापेक्ष प्रोग्रामचे सदस्य आधीपासूनच नसले पाहिजे; आणि
  • आयएसपीएलकडून तुम्हाला प्रोग्राममधून आधी काढून टाकलेले नसले पाहिजे.
  • याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे की वय वर्षे १८ खालील वापरकर्त्यांनी त्यांच्या पालकांना किंवा कायदेशीर पालकांना त्यांच्या वतीने नोंदणी करून युजर अकाऊंट तयार करण्याची विनंती केली पाहिजे. तुम्ही पालक/ कायदेशीर पालक असाल ज्यांनी तुमच्या मुलाच्या/ पाल्याच्या वतीने युजर अकाऊंट तयार केलेले आहे तर तुम्ही या अटींप्रति तुमची स्वीकारार्हता निश्चित करत आहात आणि तुमचे मूल/ पाल्य या अटींची पूर्तता करेल याची तुम्ही खात्री देत आहात. तुमच्या मुलाने/ पाल्याची कृत्ये आणि वर्तणूक तसेच तुमच्या मुलाच्या/ पाल्याच्या वेबसाइट, प्रोग्राम आणि प्रोग्रामअंतर्गत देण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने कायद्याने अनुज्ञेय केलेल्या मर्यादेत तुमच्या पाल्याने/ मुलाने दिलेल्या माहितीसाठी तुम्ही जबाबदार असाल. येथे हेही स्पष्ट करण्यात येत आहे की, १८ वर्षे वयाखालील वापरकर्त्यांना काही विशिष्ट फायदे मिळण्यापासून प्रतिबंधित केले जाईल आणि/ किंवा आमच्याकडून वेळोवेळी स्पष्ट केल्याप्रमाणे प्रोग्रामअंतर्गत काही विशिष्ट कार्यक्रम, प्रमोशन्स, उपक्रम, स्पर्धा किंवा गेम्समध्ये सहभागापासून प्रतिबंधित केले जाऊ शकते.
  • वापरकर्त्यांना वेबसाइटवर युजर अकाऊंट उघडल्यानंतर प्रोग्राम सदस्यत्व (“सदस्यत्व”) बहाल केले जाईल आणि तुम्ही सदर अटींच्या कलम ५ नुसार प्रोग्रामच्या सदस्यत्वाच्या वरील स्तराची खरेदी करण्याचा पर्याय निवडला नसल्यास तुम्हाला प्रोग्रामच्या ‘ब्लू श्रेणी’ मध्ये सहभागी करून घेतले जाईल. सदस्यत्व हे प्रति व्यक्ती सदस्यत्वाच्या तत्वावर दिले/ विकले जात आहे. तथापि, वापरकर्त्यांना या अटींनुसार अनेक सदस्यत्वे आपले कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना अशी अतिरिक्त सदस्यत्वे भेट देण्यासाठी खरेदी करता येतील आणि भेटवस्तू म्हणून सदस्यत्वे प्राप्त करणाऱ्या व्यक्तींनी येथे नमूद केलेले पात्रता निकष पूर्ण केलेले असले पाहिजेत.

वापरकर्ता माहिती

  • प्रोग्रामसाठी साइन अप करण्यासाठी वापरकर्त्यांना युजर अकाऊंट तयार करत असताना एक नोंदणी अर्ज भरावा लागेल. तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, इमेल पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, लिंग, निवासी पत्ता, राज्य आणि शहर ही सर्व माहिती द्यावी लागेल आणि तुमच्या युजर अकाऊंटसाठी पासवर्डही निवडावा लागेल. युजर अकाऊंटच्या संदर्भात अशा प्रत्येक वापरकर्त्याला एक वैध आणि विशेष वैयक्तिक इमेल पत्ता आणि वैयक्तिक भारतीय मोबाइल क्रमांक द्यावा लागेल.
  • वापरकर्ते स्वतःसाठी सदस्यत्व खरेदी करू शकतात किंवा त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना किंवा मित्रांना सदस्यत्व भेट स्वरूपात देऊ शकतात. ते अशा भेटवस्तूच्या स्वरूपात दिलेल्या सदस्यत्वाचा वापर करून या अटींच्या सापेक्ष प्रोग्रामचे सदस्य (“लाभार्थी”) होऊ शकतात. सदस्यांना लागू असलेल्या नोंदणी अर्जात नमूद केल्याप्रमाणे अचूक तपशील आणि माहिती द्यावी लागेल.
  • तुम्ही हे मान्य करत आहात आणि स्वीकारत आहात की तुम्हाला युजर अकाऊंट पडताळणीसाठी अधिक माहिती आणि/ किंवा ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याबद्दल (आणि/ किंवा तुमच्या लाभार्थ्यांबाबत) (जसे वैध सरकारी प्राधिकृत फोटो ओळख पुरावा) द्यावा लागेल. तुम्ही तुमची आणि/ किंवा तुमच्या लाभार्थ्यांची (लागू असल्यास) संपूर्ण आणि अचूक माहिती द्यावी लागेल. तुम्ही या गोष्टीची खात्री देत आहात की तुम्ही ही माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आम्हाला सूचित कराल आणि योग्य माहिती द्याल. येथे हे स्पष्ट करण्यात येत आहे की प्रत्येक युजर अकाऊंटच्या संदर्भात लागू असलेले युजर त्याचा/ तिचा इमेल पत्ता आणि/ किंवा दूरध्वनी क्रमांक अद्ययावत करतील आणि त्याचे अद्ययावतीकरण आम्ही आखून दिलेल्या पडताळणी प्रक्रियेच्या पूर्ततेच्या सापेक्ष प्रत्येक वापरकर्त्यासाठी लागू केले जाईल. येथे हेही स्पष्ट करण्यात येत आहे की तुम्ही तुमच्या युजर अकाऊंटमध्ये डिलिव्हरीचा पत्ता दिल्यानंतर सीझनच्या कालावधीत हा पत्ता अद्ययावत करता येणार नाही, बदलता येणार नाही किंवा सुधारता येणार नाही (खाली स्पष्ट केल्याप्रमाणे.) युजरने सुरूवातीला दिलेल्या पत्त्यामध्ये अंशतः बदल करायचे असल्यास आणि त्यात काहीही चूक असल्यासच आमच्या स्वेच्छाधिकारानुसार डिलिव्हरी पत्त्यातील कोणताही प्रस्तावित बदल स्वीकारला जाईल आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल. तुम्ही दिलेली कोणतीही माहिती तुमच्या ज्ञानानुसार संपूर्ण आणि सत्य असली पाहिजे. तुम्ही दिलेल्या कोणत्याही माहितीची तपासणी आणि पडताळणी करण्याचे उत्तरदायित्व आमच्यावर नाही आणि तुम्ही चुकीची माहिती दिल्यास किंवा आमच्यापासून संबंधित माहिती लपवल्यास होणाऱ्या परिणाम किंवा निष्कर्षाची कोणतीही जबाबदारी आम्ही स्वीकारणार नाही.
  • तुम्ही हे समजता की तुम्ही वेबसाइटवर देत असलेल्या माहितीचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे, त्यात तुमचे मेंबरशिप युजरनेम, पासवर्ड, इमेल पत्ता, संपर्क तपशील, देण्यात आलेले इतर कोणतेही सदस्यत्व तपशील आणि मोबाइल नंबर यांचा समावेश आहे परंतु तेवढेच मर्यादित नाही. पासवर्ड आणि युजर अकाऊंटची गोपनीयता राखण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुमचा पासवर्ड, मेंबरशिप नंबर किंवा युजर अकाऊंटअंतर्गत येणऱ्या सर्व कार्यांसाठी तुम्हीच पूर्णपणे जबाबदार असाल.
  • • वापरकर्ता वेबसाइटच्या प्रोग्राम विभागात जाऊन त्यांच्या वापरकर्ता अकाऊंट आणि मेंबरशिपशी संबंधित त्याचे/ तिचे फायदे (खाली नमूद केल्याप्रमाणे), ट्रान्झॅक्शनचा इतिहास आणि प्राधान्याचे तपशीलही पाहू शकतात.

सदस्यत्वाची वैधता

  • सदस्यत्वाचा ‘ब्लू श्रेणी’ धारण करणाऱ्या वापरकर्त्याचे सदस्यत्व या अटींअंतर्गत रद्द केलेले असल्याशिवाय आणि/ किंवा आयएसपीएलने प्रोग्राम रद्द करेपर्यंत आणि मागे घेईपर्यंत वैध राहील. सिल्व्हर श्रेणी किंवा गोल्ड श्रेणी किंवा ज्युनियर श्रेणीचे सदस्यत्व धारण करणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व एमआय ज्या सीझनमध्ये खेळणार आहे त्या लागू असलेल्या लीगच्या हंगामासाठी वैध असेल, जे एमआयकडून वेळोवेळी निश्चित केले जाईल (“हंगाम”). त्यानंतरच्या आयएसपीएलने या अटींअंतर्गत नियत केलेल्या पद्धतीनुसार पुढील सीझनसाठीच्या कालावधीत वापरकर्त्याचे सदस्यत्व नूतनीकरण केलेले नसल्यास आपोआपच ‘ब्लू श्रेणी’मध्ये रूपांतरित केले जाईल.

सदस्यत्वाच्या श्रेणी आणि फायदे

  • (a) या प्रोग्रामअंतर्गत वापरकर्त्यांसाठी सदस्यत्वाच्या चार श्रेणी उपलब्ध आहेत- ब्लू, ज्युनियर, सिल्व्हर आणि गोल्ड. पात्र वापरकर्ते वापरकर्ता खाते नोंदणीच्या वेळी किंवा त्यानंतर वेबसाइटवर प्रोग्राम विभागाअंतर्गत अर्ज भरून आपल्या आवडीच्या सदस्यत्व श्रेणीची निवड करू शकतात. प्रत्येक हंगामात सदस्यांसाठी उपलब्ध असलेल्या ‘सिल्व्हर’ ,‘गोल्ड’ आणि ‘ज्युनियर’ सदस्यत्व श्रेणींची संख्या मर्यादित आहे आणि हंगामासाठी लागू असलेल्या सदस्यत्वाच्या अशा श्रेणीसाठी उपलब्ध असलेले साठे विकले गेल्यानंतर सदस्यत्वाच्या श्रेणीचे असे पर्याय अकार्यरत केले जातील. लागू असलेल्या सदस्यत्वाच्या श्रेणीच्या उपलब्धतेच्या, वापरकर्त्याची यशस्वी नोंदणी किंवा वापरकर्त्याच्या सदस्यत्व अर्जाच्या सादरीकरणाच्या सापेक्ष आणि हंगामाच्या सदस्यत्वाच्या अशा श्रेणीसाठी लागू असलेल्या सदस्यत्व रकमेच्या प्रक्रियेच्या सापेक्ष वापरकर्ते त्यांच्या सदस्यत्वाच्या श्रेणीनुसार हंगामासाठी (‘सिल्व्हर श्रेणी’, ‘गोल्ड श्रेणी’ आणि ‘ज्युनियर श्रेणी’)खाली नमूद केलेल्या लाभांसाठी (“लाभ”) पात्र असतीलः प्रोग्रामअंतर्गत आणि प्रोग्रामच्या प्रत्येक श्रेणीअंतर्गत देण्यात येणारे लाभ हे आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार असतील आणि ते आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार कधीही नाकारले, मागे घेतले, सुधारित केले किंवा रद्द केले जाऊ शकतील. आयएसपीएल प्रोग्रामच्या सदस्यत्वासाठी नवीन श्रेणी आणण्याचे अधिकार राखून ठेवत आहे आणि वेबसाइटच्या प्रोग्राम विभागाखाली सूचना देऊन प्रोग्रामच्या सध्याच्या श्रेणी काढून टाकू शकेल, बदलू शकेल किंवा त्यांचे विलिनीकरणही करू शकेल. सदस्यत्व शुल्क आयएसपीएलकडून त्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार वेळोवेळी सुधारित केले जाऊ शकेल आणि सुधारित केलेले शुल्क वेबसाइटच्या प्रोग्राम विभागावर अद्ययावत केले जाईल आणि/ किंवा वैध सदस्यत्व असलेल्या वापरकर्त्यांना इमेलद्वारे सूचित केले जाईल.
    श्रेणी ब्लू सिल्व्हर गोल्ड ज्युनियर
    मेंबरशिप शुल्क मोफत INR 999 per Season INR 2499 per Season INR 899 per Season
    मेंबरशिप कार्ड व्हर्चुअल मेंबरशिप कार्ड पर्सनलाइज्ड मेंबरशिप कार्ड पर्सनलाइज्ड मेंबरशिप कार्ड पर्सनलाइज्ड मेंबरशिप कार्ड
    वेलकम किट NA MI ब्रँडेड टी-शर्ट, डिजिटली ऑटोग्राफ्ड मिनी बॅट , MI मास्क, MI फ्लॅग आणि MI फॅन कॅप MI रेप्लिका जर्सी, डिजिटली ऑटोग्राफ्ड मिनी बॅट, MI मास्क, MI फ्लॅग आणि MI प्रीमियम कॅप डिजिटली ऑटोग्राफ्ड मिनी बॅट, MI ड्रॉस्ट्रिंग बॅग, MI सिपर, MI रायटिंग पॅड, MI टिफिन बॉक्स, MI मग, MI मास्क, MI फ्लॅग आणि MI स्टिकर्स
    तुम्हाला वेबसाइट साहित्य पाहण्याची आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची, खास गेम्स खेळण्याची जिंकण्याची संधी मिळेल होय होय होय होय
  • प्रोग्रामअंतर्गत आणि प्रोग्रामच्या प्रत्येक श्रेणीअंतर्गत देण्यात येणारे लाभ हे आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार असतील आणि ते आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार कधीही नाकारले, मागे घेतले, सुधारित केले किंवा रद्द केले जाऊ शकतील. आयएसपीएल प्रोग्रामच्या सदस्यत्वासाठी नवीन श्रेणी आणण्याचे अधिकार राखून ठेवत आहे आणि वेबसाइटच्या प्रोग्राम विभागाखाली सूचना देऊन प्रोग्रामच्या सध्याच्या श्रेणी काढून टाकू शकेल, बदलू शकेल किंवा त्यांचे विलिनीकरणही करू शकेल. सदस्यत्व शुल्क आयएसपीएलकडून त्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार वेळोवेळी सुधारित केले जाऊ शकेल आणि सुधारित केलेले शुल्क वेबसाइटच्या प्रोग्राम विभागावर अद्ययावत केले जाईल आणि/ किंवा वैध सदस्यत्व असलेल्या वापरकर्त्यांना इमेलद्वारे सूचित केले जाईल.

सदस्यत्व कार्ड्स

  • ब्लू श्रेणी प्रोग्राम सदस्यांना आपले व्हर्चुअल सदस्यत्व कार्ड वेबसाइटवरील त्यांच्या ‘माय फॅमिली’ युजर अकाऊंटवर साइन इन करून मिळवता येईल. अशा वापरकर्ता सदस्यत्वाशी जोडलेल्या इमेल पत्त्यावर इमेल पाठवूनही हे व्हर्चुअल सदस्यत्व कार्ड जारी केले जाऊ शकते. गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर श्रेणी प्रोग्राम सदस्यांना त्यांचे वैयक्तिकीकृत सदस्यत्व कार्ड प्रोग्राममध्ये यशस्वीरित्या नोंदणी केल्यावर चार (४) ते सहा (६) आठवड्यात आयएसपीएलने अन्यथा सदस्याला कळवलेले नसल्यास मिळू शकेल. वैयक्तिकीकृत सदस्यत्व कार्ड चोरीला गेल्यास, गहाळ झाल्यास किंवा त्याचे नुकसान झाल्यास सिल्व्हर श्रेणी, गोल्ड श्रेणी आणि ज्युनियर श्रेणी प्रोग्राम सदस्यांनी अशी चोरी, गहाळ होणे किंवा नुकसान यांची तक्रार आमच्याकडे mifamily@mumbaiindians.com येथे इमेल लिहून नोंदवावी. आयएसपीएलच्या पूर्णपणे स्वेच्छाधिकारानुसार नकरी सदस्यत्व कार्डे जारी केली जातील आणि ती अतिरिक्त शुल्काच्या सापेक्ष असू शकतात. सदस्यत्वाचे लाभ घेण्याचा प्रयत्न करत असताना सदस्याला तपासणीसाठी कोणत्याही वेळी आवश्यक ते सदस्यत्व कार्ड आणणे गरजेचे भासू शकते आणि/ किंवा सदस्यत्व कार्डात नमूद केल्याप्रमाणे सदस्यत्वाचे तपशील आणि अशी इतर कोणतीही माहिती आयएसपीएल किंवा त्यांचे एजंट आणि सेवा पुरवठादार यांनी विनंती केल्याप्रमाणे द्यावी लागू शकते. वापरकर्ता सदस्यत्व कार्ड हे सदस्याचे वैयक्तिक कार्ड आहे आणि ते अहस्तांतरणीय असून ते सदस्याला हस्तांतरित करता येणार नाही.

सदस्यत्व वेलकम किट

  • प्रोग्राममध्ये वेलकम किट्स पात्र वापरकर्त्यांना त्यांच्या सदस्यत्वाच्या श्रेणीनुसार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर यशस्वीरित्या नोंदणी केल्यावर चार (४) ते सहा (६) आठवड्यांत आयएसपीएलने वापरकर्त्याला अन्यथा सूचित केलेले असल्याशिवाय सादर करावे लागेल. याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे की, प्रोग्राम वेलकम किट्स आणि वैयक्तिकीकृत सदस्यत्व कार्ड्स हे फक्त भारतातील परिसरात डिलिव्हरीसाठी पात्र आहेत आणि अवैध पत्ता किंवा भारताच्या भौगोलिक प्रदेशाबाहेरील पत्ता देणाऱ्या वापरकर्त्यांचे अशा प्रोग्राम वेलकम किटचे लाभ जप्त केले जाऊ शकतील. वापरकर्त्याने चुकीचा पत्ता दिल्याच्या परिस्थितीत आयएसपीएल चुकीच्या पत्त्यावर गेलेल्या किंवा हरवलेल्या डिलिव्हरीसाठी आणि त्याच्या कोणत्याही परिणामांसाठी उत्तरदायी नसेल.
  • पात्र वापरकर्ते याद्वारे हे मान्य करतात आणि स्वीकारतात की प्रोग्राम वेलकम किट्सची डिलिव्हरी एखाद्या दैवी घटनेसह (येथे स्पष्ट केल्याप्रमाणे) अनपेक्षित कारणांमुळे, येथे उक्तनिर्देशित केलेल्या वेळापत्रकापेक्षा अधिक विलंबाने होऊ शकते, आणि असे वापरकर्ते हे मान्य करतात की ते डिलिव्हरीतील अशा प्रकारच्या विलंबासाठी आयएसपीएलविरोधात कोणत्याही प्रकारचे दावे करणार नाहीत.
  • प्रोग्राम वेलकम किटअंतर्गत देण्यात आलेल्या उत्पादनांच्या संदर्भात पात्र वापरकर्ते हे मान्य करतात की आपला अर्ज दाखल करत असताना किंवा प्रोग्राममध्ये अन्यथा विनंती केल्यानंतर मिळालेल्या शर्ट/ जर्सीच्या संदर्भात अचूक माहिती देतील. वापरकर्ते स्पष्टपणे हे स्वीकारतात आणि मान्य करतात की प्रोग्राम वेलकम किटचा भाग म्हणून देण्यात आलेल्या कोणतेही उत्पादन बदलून किंवा एक्स्चेंज करण्याची परवानगी कोणत्याही उत्पादनाच्या साइजसाठी किंवा वापरकर्त्याला भेडसावणाऱ्या उत्पादनाच्या फिटिंगशी संबंधित समस्यांबाबत आयएसपीएलकडून दिली जाणार नाही.
  • प्रोग्राम वेलकम किट प्राप्त झाल्यानंतर प्रोग्राम वेलकम किटमध्ये असलेल्या उत्पादनांमध्ये कोणत्याही प्रकारषा दोष आहे का हे तपासण्याची जबाबदारी तुमची असेल. तुम्हाला प्रोग्राम वेलकम किटचा भाग म्हणून प्राप्त झालेले कोणतेही उत्पादनः (१) कारागिरी किंवा उत्पादनाशी संबंधित प्रत्यक्ष दोषयुक्त असल्यास किंवा (२) नुकसान झालेल्या स्थितीत किंवा सील नसलेल्या स्थितीत डिलिव्हर झाल्यास किंवा आयएसपीएल किंवा त्यांच्या प्रोग्राम वेलकम किट पॅकेजिंगअंतर्गत तृतीय पक्ष व्हेंडर / सेवा पुरवठादाराकडून लावलेले कोणतेही सील काढलेले असल्यास (each a “दोषयुक्त उत्पादन”), आम्हाला सूचित करणे ही तुमची जबाबदारी आहे. दोषयुक्त उत्पादन प्राप्त झाल्यावर तुम्ही आम्हालाmifamily@mumbaiindians.com , येथे इमेलद्वारे सूचित करण्याचे मान्य करत आहात, त्याची सूचना तुम्ही तुमच्या सदस्यत्व माहितीसोबत द्याल आणि त्यात कथित दोष किंवा नुकसानाचे तपशील आणि छायाचित्र (त्रे) दिलेली असतील. तुम्ही दोषयुक्त उत्पादन प्राप्त झाल्यानंतर अशी सूचना ७२ तासांपेक्षा उशिराने नाही अशा प्रकारे देण्याचे मान्य करत आहात. तुम्ही आम्हाला उक्तनिर्देशित ७२ तासांमध्ये दोषयुक्त उत्पादनाची सूचना देण्यात अपयशी ठरल्यास तुम्ही प्रोग्राम वेलकम किटअंतर्गत देण्यात आलेली उत्पादने विनाशर्त स्वीकार्लयाचे मान्य केले जाईल आणि त्यानंतर परत घेण्याची विनंती किंवा दोषयुक्त उत्पादनाची सूचना स्वीकारली जाणार नाही. येथे नमूद केलेल्या वेळापत्रकात दोषयुक्त उत्पादनाची सूचना प्राप्त झाल्यानंतर आम्ही/ आमचे सेवा पुरवठादार आपल्याशी संपर्क सधू आणि उत्पादन डिलिव्हरीच्या वेळी दोषयुक्त होते याची खात्री आणि पडताळणी केली जाईल आणि कथित दोष/ नुकसानाबाबत अधिक माहिती किंवा पुरावे देण्यास आपल्याला सांगितले जाऊ शकते.
  • वरील पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आणि आयएसपीएल आणि/ किंवा त्यांचे नियत व्हेंडर्स/ सेवा पुरवठादारांचे त्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार दोषयुक्त उत्पादनातील कथित नुकसान किंवा दोषाबाबत समाधान झाल्यास तुम्हाला अशा दोषयुक्त उत्पादनासाठी बदली उत्पादन मिळवण्याचा अधिकार आयएसपीएलने निश्चित केल्यानुसार असेल, आणि तुम्हाला तसे कळवले जाईल. परंतु तुम्हाला दोषयुक्त उत्पादन आयएसपीएल आणि/ किंवा त्यांचे नियत व्हेंडर्स/ सेवा पुरवठादार यांना आयएसपीएलच्या सूचनेनुसार परत करावे लागेल.

रकमांचे प्रदान आणि परतावे

  • वापरकर्त्यांना युजर अकाऊंटच्या नोंदणीच्या वेळी किंवा नंतर वेबसाइटवरील प्रोग्राम विभागाअंतर्गत तुम्ही ज्या सदस्यत्व श्रेणीसाठी अर्ज केला आहे त्यासाठी लागू असलेले सदस्यत्व शुल्क भरावे लागेल. आम्ही तुम्हाला की आम्ही सदस्यत्व शुल्काच्या तुमच्या प्रदानावर प्रक्रिया केली आहे हे सूचित करू आणि तुम्ही सदस्य झाला आहात हे कळवू. इमेलच्या संदेशात तुमच्या सदस्यत्व अर्जाच्या आमच्या स्वीकृतचा समावेश असेल. आमच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे तुम्हाला इमेल प्रत्यक्षात प्राप्त न झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारत नाही.
  • अन्यथा स्पष्टपणे नमूद केलेले असल्याशिवाय सदस्यत्व शुल्क हे जीएसटी आणि भारतात लागू असलेल्या इतर करांच्या सापेक्ष असतील. तथापि, तुम्ही भारताबाहेरून सदस्यत्व खरेदी करत असल्यास (परंतु तुम्ही या अटींअंतर्गत अन्यथा सदस्यत्वासाठी पात्र असल्यास) आंतरराष्ट्रीय व्यवहारांना लागू असलेले इतर कर आणि शुल्क सदस्यत्वाच्या शुल्कात समाविष्ट केलेले नाहीत आणि असे शुल्क आणि कर यांच्या प्रदानासाठी तुम्ही जबाबदार असाल.
  • सदस्यत्व शुल्काचा कोणत्याही परिस्थितीत परतावा केला जाणार नाही. ज्यात या अटीअंतर्गत वापरकर्त्याच्या सदस्यत्वाचे रद्दीकरण, प्रोग्राम बंद होणे/ मागे घेणे किंवा कोणत्याही कारणासाठी सदस्यत्वात सुधारणा होणे या कारणांचा समावेश असेल परंतु तेवढेच मर्यादित नसेल. आयएसपएलने कोणतेही कारण न देता आणि किमान एक (१) महिना सूचना न देता हंगामादरम्यान प्रोग्राम बंद केल्यास, मागे घेतल्यास किंवा रद्द केल्यास, आणि परंतु असे की पात्र वापरकर्त्याला अशा हंगामासाठी लागू असलेले लाभ मिळालेले नसल्यास आयएसपीएल स्वेच्छाधिकारानुसार आयएसपीएलने वाजवी स्वरूपात निश्चित केल्याप्रमाणे वापरकर्त्याला लागू असलेले सदस्यत्व शुल्क प्रो-राटा स्वरूपात करेल किंवा आयएसपीएलने वाजवी स्वरूपात निश्चित केल्याप्रमाणे पर्यायी फायदे प्रदान करेल. या संदर्भातील आयएसपीएलचा निर्णय अंतिम असेल आणि वापरकर्ते परतावा आणि/ किंवा लाभांसाठी कोणत्याही प्रकारचा दावा न करण्याचे मान्य करत आहेत.

वापरकर्ता निर्बंध

  • सदस्यत्व प्रत्येक वापरकर्त्यासाठी वैयक्तिक आहे, अहस्तांतरणीय आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते हस्तांतरित केले जाऊ शकत नाही किंवा त्याची पुनर्विक्री होऊ शकत नाही. सदस्यत्वात नाव दिलेले वापरकर्ते किंवा लाभार्थी हेच त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभांचा वापर अशा वापरकर्ता/ लाभार्थ्याच्या वैयक्तिक वापरासाठी करू शकतात आणि वापरकर्ता/ लाभार्थी वेबसाइटवरील त्यांच्या वापरकर्ता खात्यांवरील सर्व कार्यांसाठी, त्यांच्या सदस्यत्व कार्डाअंतर्गत आणि लाभांचा कोणताही वापर किंवा उपयोग यांच्यासाठी उत्तरदायी असतील.
  • लागू असलेले कायदे/ विनियम यांचे उल्लंघन मानल्या गेलेल्या कोणत्याही हेतूसाठी प्रोग्राम किंवा सदस्यत्व लाभांचा वापर करण्यापासून तुम्हाला प्रतिबंध केला जात आहे.
  • अन्यथा स्पष्टपणे विनिर्दिष्ट केलेले असल्याशिवाय प्रोग्राम आणि सदस्यत्वाचे लाभ आर्थिक रकमा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या फायद्यांसाठी वापरले किंवा त्यांची देवाणघेवाण केली जाऊ शकणार नाही. प्रोग्राम आणि सदस्यत्वाचे फायदे यांचे कोणत्याही प्रकारे हस्तांतर, देवाणघेवाण, विक्री, भाडेतत्वावर देणे, भाड्याने देणे, परवान्याने देणे, सुरक्षा हितसंबंधांसाठी देणे किंवा व्यापारी वापर करता येणार नाही.
  • वापरकर्ते प्रोग्रामवर दिसणारी कोणतीही चिन्हे, ट्रेडमार्क, लोगो आणि/ किंवा इतर बौद्धिक संपदा आणि सदस्यत्व लाभ, वेबसाइट किंवा इतर कोणत्याही बाबींचा वापर, त्यात बदल, नक्कल करणे किंवा त्याच्याशी इतर कोणत्याही प्रकारे छेडछाड आयएसपीएलच्या लेखी संमतीशिवाय करणार नाहीत.
  • इतर कोणत्याही व्यक्तीचे वापरकर्ता खाते वापरून, सदस्यत्व कार्ड आणि/ किंवा सदस्यत्वाचा वापर करून वेबसाइट पाहणे किंवा पाहण्याचा प्रयत्न करणे किंवा लाभ वापरणे किंवा वापरण्याचा प्रयत्न करणे यांना सक्तीने बंदी आहे.

लेखनसाहित्य

  • प्रोग्रामशी संबंधित सर्व साहित्य आणि सामग्री ज्यात मर्चंडाइज, माहिती, छायाचित्रे, चिन्हे, लोगो, डिझाइन्स, चित्रे, व्हिडिओ, ग्राफिक्स, लेखी साहित्य, लेख, हायपरलिंक्स, मल्टीमीडिया क्लिप्स, अॅनिमेशन, गेम्स आणि सॉफ्टवेअर याचा समावेश आहे परंतु तेवढेच मर्यादित नाही (एकत्रितरित्या "साहित्य" म्हणून संबोधित) आयएसपीएलच्या मालकीचे असेल किंवा नसेल तरी ते लागू असलेल्या बौद्धिक संपदा कायद्यांनी संरक्षित आहे. सर्व साहित्याचा वापर फक्त प्रोग्राम आणि लाभ पाहण्यासाठी आणि अटींशी त्यांची सुसंगती तपासण्याच्या हेतूसाठी केला जाईल.
  • तुम्ही हे मान्य करत आहात की सर्व मालकी हक्क आणि साहित्यातील सर्व कॉपीराइट आणि इतर बौद्धिक संपदा हक्क हे आयएसपीएलच्या किंवा आमच्या परवानाधारकांच्या मालकीचे आहेत आणि अटींमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असल्याशिवाय अशा कोणत्याही बाबींमध्ये तुमचा कोणताही हक्क, मालकी किंवा हितसंबंध नाही. तुम्हाला प्रदान केलेल्या परवान्याचा तुम्ही पोट परवाना देणार नाही, परवाना नेमून किंवा हस्तांतरित करणार नाही किंवा असा परवाना किंवा त्याचा कोणताही भाग किंवा अशा परवान्यात नमूद असलेले साहित्य भाड्याने किंवा भाडेतत्वावर देणार नाही. तुम्ही अटींमध्ये नमूद केलेल्या पद्धतींशिवाय प्रोग्राम पाहण्यासाठी आणि/ किंवा प्रोग्रामच्या लाभांचा वापर करण्यासाठी परवानगी दिलेल्या पद्धतीशिवाय साहित्याचे हस्तांतरण, नक्कल, पुनर्निर्मिती, वितरण, वापर, रिव्हर्स इंजीनियर, वितरण, अनुवाद, अर्थ लावणे, सुधारणा करणे, बदलणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे साहित्याचा वापर करणार नाही.
  • तुम्हाला कंटेंटचा वापर फक्त वैयक्तिक, बिगर वाणिज्यिक आणि स्वतःच्या वापरासाठी आणि अटींमध्ये नमूद केलेल्या पद्धतीत प्रोग्रामचे लाभ पाहण्यासाठी तसेच वापरण्यासाठी एक वैयक्तिक, बिगर-वैशिष्टिक, निर्देशित न करण्यायोग्य आणि अहस्तांतरणीय परवाना दिला जात आहे जो इतर कोणत्याही कारणासाठी नसेल.

हक्कांचे प्रदान

  • लाभार्थी फायदे मिळवण्याचा पर्याय निवडणारे आणि/ किंवा प्रोग्रामअंतर्गत कोणत्याही उपक्रमात, स्पर्धेत किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणारे वापरकर्ते आयएसपीएलला त्यांचे नाव, छायाचित्र, दृकश्राव्य रेकॉर्डिंग आणि तत्सम वापरकर्त्याने आम्हाला पाठवलेल्या स्वरूपात आणि/ किंवा प्रोग्रामच्या आराखड्यात किंवा त्याअंतर्गत घेतल्याप्रमाणे किंवा निर्माण केल्याप्रमाणे किंवा प्रोग्रामच्या कोणत्याही कार्यक्रम/ स्पर्धा/ उपक्रमात घेतल्याप्रमाणे संबंधित उपक्रमाचा प्रसार करण्यासाठी आणि संबंधित उपक्रम, स्पर्धा किंवा कार्यक्रमाचे प्रोग्रामअंतर्गत निश्चित ध्येय पूर्ण करण्यासाठी तसेच एमआय, आयएसपीएल किंवा त्यांच्या वेबसाइटचे मार्केटिंग आणि प्रसार करण्यासाठी कोणतीही नुकसानभरपाई न मागता कायदेशीर पद्धतीने वापरण्यासाठी त्यांची संमती आणि परवानगी देत आहेत आणि मान्य करत आहेत. असे वापरकर्ते आयएसपीएलने वेळोवेळी वाजवी स्वरूपात विनंती केलेल्या पद्धतीत एमआय आणि/ किंवा प्रोग्रामचा प्रसार करण्यासाठी आयएसपीएलला सहकार्य करण्याचे स्वीकारत आहेत. वरील बाबींसंदर्भात काहीही समस्या असल्यास वापरकर्ते आम्हाला येथे लिहू शकतात- mifamily@mumbaiindians.com.

अस्वीकरणे

  • साहित्य, प्रोग्राम आणणि लाभ हे सर्व दोष आणि त्रुटींसह सक्तीने "आहे तसे" या तत्वावर दिले जात आहेत. कोणतीही कोणत्याही प्रकारे, लेखी किंवा सूचित सादरीकरणे, हमी, अटी किंवा गँरंटी (ज्यात कोणत्याही मर्यादेशिवाय अचूकता, पूर्णत्व, विनाअडथळा तरतूद, दर्जा, बाजारयोग्यता, एका विशिष्ट हेतूसाठी सुयोग्य असणे किंवा बिगर उल्लंघन यांच्यासाठी कोणतीही सूचित वॉरंटीसह) कायद्याने अनुज्ञेय केलेल्या सर्वोच्च मर्यादेत विशिष्टपणे वगळण्यात आले आहेत.

तृतीय पक्ष

  • आयएसपीएल काही विशिष्ट प्रोग्राम लाभ देण्यासाठी आणि/ किंवा विशिष्ट प्रोग्राम लाभांची खरेदी किंवा प्रदानाला सुविधा देण्यासाठी तृतीय पक्षांना सहभागी करून घेते (तृतीय पक्ष पेमेंट गेटवे सेवा पुरवठादार, तिकिटींग सेवा पुरवठादार आणि डिलिव्हरी भागीदारांसह). अशा तृतीय पक्ष सेवा पुरवठादार त्यांच्या सेवा वैयक्तिक कंत्राटदार म्हणून देतात आणि ते देत असलेल्या सेवा या आयएसपीएल आणि/ किंवा प्रोग्रामपासून स्वतंत्र असतात. प्रोग्राम आणि लाभांचा तुमचा वापर, वेबसाइटवर प्रोग्राम पाहण्यासह आणि त्यातील पेमेंट गेटवेच्या वापरासह हे सर्व तुमच्या स्वेच्छेने असेल आणि संबंधित सेवा पुरवठादार किंवा सेवांच्या सुयोग्यतेबाबत निश्चिती करण्यासाठी तुम्हीच एकटे जबाबदार असाल. प्रोग्राम आणि/ किंवा वेबसाइटच्या माध्यमातून कोणत्याही सेवा पुरवठादाराने किंवा तृतीय पक्षाने दिलेले लाभ, किंवा कोणत्याही सेवा, उत्पादने, साहित्य, माहिती किंवा साधने कोणत्याही व्यक्तीसाठी सुयोग्य किंवा जुळणारी असतील याची हमी आम्ही देत नाही. आयएसपीएल तुमच्या तृतीय पक्षांसोबतच्या व्यवहारांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे उत्तरदायित्व नाकारते (अशा तृतीय पक्षांकडून तुम्ही कोणतेही साहित्य, उत्पादने सेवा खरेदी केल्यास त्यासह), ज्यांच्या जाहिराती किंवा साहित्य किंवा लेखन वेबसाइटवर असेल किंवा त्यांच्या हायपरलिंक वेबसाइटवर आणि/ किंवा वेबसाइटच्या प्रोग्राम विभागात दिलेल्या असल्या किंवा अन्यथा प्रोग्रामद्वारे त्याच्या लिंक दिलेल्या असल्या तरी हे उत्तरदायित्व आयएसपीएल नाकारते.

उत्तरदायित्वाच्या मर्यादा

  • वापरकर्ते प्रोग्राम आणि सदस्यत्वात स्वेच्छेने आणि त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी होतील आणि लाभांचा वापर करतील. आयएसपीएलला कोणत्याही परिस्थितीत वेबसाइट पाहत असताना किंवा कोणत्याही लाभाच्या वापराचा परिणाम म्हणून वापरकर्त्यांकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून झालेले कोणतेही नुकसान किंवा मोडतोड (ज्यात कोणताही अपघात, दुखापत, मृत्यू, मालमत्तेचे नुकसान यांचा समावेश आहे परंतु तेवढेच मर्यादित नाही) (प्रोग्राममधील सहभागासह) जबाबदार धरता येणार नाही.
  • लागू असलेल्या कायद्यांद्वारे अनुज्ञेय असलेल्या कमाल मर्यादेत कोणत्याही परिस्थितीत आयएसपीएल, एमआय, त्यांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी किंवा एजंट कोणत्याही वापरकर्त्याला प्रोग्राममधील सहभागातून झालेल्या वैयक्तिक दुखापत किंवा कोणत्याही विशेष, परिस्थितीजन्य, अप्रत्यक्ष, दंडात्मक, परिणामात्मक नुकसानासाठी उत्तरदायी नसतील. ज्यात नफ्याचे किंवा महसुलाचे, सद्भावनेचे नुकसान, वापरकर्ता खाते पाहण्यात आलेले अपयश, कोणतीही माहिती हस्तांतरित करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यात आलेले अपयश, गोपनीय माहितीचे नुकसान, व्यवसायातील हस्तक्षेप, गोपनीयतेचे नुकसान, डेटा करप्ट होणे किंवा गहाळ कोणे, वापरकर्त्याची माहिती प्राप्त करण्यात किंवा बॅकअप करण्यात आलेले अपयश (किंवा अर्काइव्ह केलेला डेटा), कोणत्याही कृत्याच्या कारणासाठी, ज्यात कंत्राट, चुकीचे कृत्य (दुर्लक्षासह) किंवा अन्यथा यांचा समावेश असेल परंतु तेवढेच मर्यादित नसेल, कोणत्याही प्रकारे ऑफरमधून येणारे किंवा ऑफरद्वारे किंवा संबंधित असलेले, मेंबरशिपचा किंवा लाभांचा स्वीकार किंवा वापर किंवा लाभांचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे कोणत्याही वेळी अपयश, काढून टाकणे किंवा मागे घेणे (सामने किंवा आयपीएल रद्द होणे किंवा पुढे ढकलणे यांच्यासह) किंवा अन्यथा प्रोग्रामच्या कार्यान्वयनाच्या प्रक्रियेत, मग आयएसपीएल किंवा त्यांच्या कोणत्याही किंव सर्वच एजंट्सना अशा नुकसानाची शक्यता असल्याचा सल्ला दिला असला तरी, या बाबी समाविष्ट आहेत.

युजर अकाऊंट सस्पेंशन आणि टर्मिनेशन

  • प्रोग्रामच्या कोणत्याही घटकाबाबत आयएसपीएलचा निर्णय अंतिम असेल. युजरची मेंबरशिप आयएसपीएलने कोणत्याही कारणासाठी प्रतिबंधित किंवा सस्पेंड केली असेल तर त्या वापरकर्त्याची प्रोग्रामच्या कोणत्याही आणि सर्व लाभांची पोहोच अकाऊंट आणि मेंबरशिप योग्य आणि पुनर्स्थापित होईपर्यंतच्या काळापुरती प्रतिबंधित केली जाईल.
  • आयएसपीएलला या गोष्टी जाणवल्यास किंवा वाजवी स्वरूपात विश्वास असल्यास आयएसपीएल युजर मेंबरशिप रद्द करू शकते (१) प्रोग्रामचा सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी युजर अपात्र आहे (२) या अटींअंतर्गत किंवा प्रोग्रामशी संबंधित इतर कोणत्याही लागू अटींसंदर्भात किंवा लाभ आणि/ किंवा वेबसाइटवर युजरला लागू असलेल्या कोणत्याही अटी किंवा आदेशाचे उल्लंघन आहे किंवा (३) वापरकर्ता त्याच्या/ तिच्या मेंबरशिपचे आणि/ किंवा मेंबरशिपअंतर्गत देण्यात आलेल्या कोणत्याही लाभांचे उल्लंघन करत आहे ज्यात वापरकर्ता/ वापरकर्ता खात्याकडून त्याच्या/ तिच्या सदस्यत्वाच्या वापराशी संबंधित आणि/ किंवा लाभांच्या रोखीकरणाबाबत घोटाळा किंवा संशयास्पद हालचालींचा समावेश आहे किंवा (४) वापरकर्ता अशा कृतीत किंवा कार्यात सहभागी आहे ज्या प्रोग्राम, एमआय, आयएसपीएल, त्यांचे सहयोगी, खेळाडू, प्रतिनिधी, भागीदार किंवा प्रायोजकांच्या हितसंबंधांविरूद्ध आहेत किंवा एमआयचे नाव, प्रतिमा, प्रतिष्ठा, तत्वे किंवा व्यावसायिक हितसंबंधांसाठी धोकादायक आहेत.
  • तसेच वापरकर्त्याचे सदस्यत्व वरील कलम १६(ब) अंतर्गत कोणत्याही कारणासाठी रद्द करण्यात आल्यास वापरकर्त्याची प्रोग्राम आणि प्रोग्रामशी संबंधित लाभांची पोहोचसुद्धा रद्द केली जाईल. त्याशिवाय, तुम्ही या अटींचे प्रत्यक्ष उल्लंघन केल्याच्या प्रसंगी आम्ही तुमची प्रोग्राममधील भविष्यातील नोंदणी करण्यापासून आणि/ किंवा आमच्याकडून भविष्यात चालवल्या गेलेल्या इतर कोणतेही प्रोग्राम किंवा प्रमोशन्स यांच्यामधून तुम्हाला प्रतिबंधित करण्याचा अधिकार राखून ठेवत आहोत. एखाद्या वापरकर्त्याचे सदस्यत्व आणि/ किंवा कोणतेही संबंधित लाभ सस्पेंड केले गेल्यास किंवा मागे घेतले गेल्यास किंवा त्यांची मेंबरशिप आयएसपीएलकडून सदर अटींच्या अनुषंगाने रद्द केली गेल्यास आयएसपीएल कोणत्याही वापरकर्त्याला परतावा देण्यासाठी उत्तरदायी नसेल.
  • आयएसपीएलकडून केली जाणारी कोणतीही कारवाई कायदा किंवा समभागात उपलब्ध असलेले आमचे इतर हक्क किंवा उपायांच्या निःष्पक्ष असेल.
  • वापरकर्ता त्याचे/ तिचे सदस्यत्व आयएसपीएलला खालील इमेल पत्त्यावर लेखी स्वरूपात सूचना देऊन रद्द करू शकेल आणि मागे घेऊ शकेलः mifamily@mumbaiindians.com. एखाद्या प्रसंगी वापरकर्त्याने वर नमूद केल्यानुसार त्याचे/ तिचे सदस्यत्व रद्द केल्या आणि मागे घेतल्यास आयएसपीएल अशा वापरकर्त्याने भरलेले सदस्यत्व शुल्क वापरकर्त्याला परतावा करण्यासाठी उत्तरदायी नसेल आणि आयएसपीएल अशा वापरकर्त्याला वापरकर्त्याने सदस्यत्व रद्द केल्यानंतर आणि मागे घेतल्यावर कोणतेही लाभ देण्यासाठी उत्तरदायी नसेल.

सुधारणा आणि रद्दीकरण

  • आयएसपीएल या अटींमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार राखून ठेवत आहे आणि अशा बदलांमुळे तुमच्या हक्कांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत असल्यास तुम्हाला सूचित केले जाईल. अटींमधील असे कोणतेही बदल वेबसाइटच्या प्रोग्राम विभागात सूचित केले जातील.
  • सदस्यत्वाचे लाभ हे येथे नमूद केल्याप्रमाणे आणि/ किंवा वेबसाइटच्या प्रोग्राम विभागात आणि/ किंवा आयएसपीएलने वेळोवेळी जाहिरात केल्याप्रमाणे असतील. प्रोग्रामअंतर्गत सर्व लाभ, ऑफर्स आणि सेवा उपलब्धतेच्या सापेक्ष आहेत आणि आयएसपीएलकडून वेळोवेळी बदलले जाऊ शकतात. आयएसपीएल वेबसाइटच्या प्रोग्राम विभागात नमूद केलेले आणि/ किंवा एमआय प्रसार साहित्यात जाहिरात केलेल्या उत्पादन किंवा सेवांच्या ऐवजी बदली उत्पादने किंवा मेंबरशिप बेनिफिट्सचा भाग असलेले लाभ वेळोवेळी बदलण्याचे अधिकार राखून ठेवत आहे.
  • आयएसपीएल प्रोग्राम मेंबरशिपचे किंवा सदस्यत्वाच्या टियर्सचे रिब्रँडिंग किंवा नाव बदलण्याचा अधिकार किंवा कोणत्याही वेळी अतिरिक्त मेंबरशिप स्कीम आणण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. वैध सदस्यत्व असलेल्या वापरकर्त्यांना आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता अशी कोणतीही अतिरिक्त किंवा बदली योजना हस्तातंरित केली जाईल. परंतु असे की, त्यांना नवीन योजनेअंतर्गत तेच किंवा जास्तीत जास्त प्रमाणात तत्सम फायदे मिळवण्याचा अधिकार असेल जे त्यांना आधी ते ज्या योजना/ टियरअंतर्गत मिळवण्यासाठी पात्रता होती, आणि परंतु असे की वापरकर्त्याने अन्यथा स्पष्टपणे मान्य केलेले असल्याशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क वापरकर्त्याला देय नसेल. या अटी आणि शर्तींमधील कोणतीही बाब या गोष्टीची हमी देत नाही की वापरकर्त्याला आयएसपीएलच्या कोणत्याही इतर अधिकृत सदस्यत्व योजना किंवा प्रोग्रामचा सदस्य होण्याचा अधिकार असेल.
  • आयएसपीएल संपूर्ण प्रोग्राम कार्यरत प्रोग्राम मेंबर्सना एक (१) महिन्याची आगाऊ सूचना देऊन रद्द करू शकते किंवा मागे घेऊ शकते. आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार आयएसपीएल प्रोग्रामसाठी कोणत्याही वेळी तत्सम सदस्यत्व प्रोग्राम देण्याचा पर्याय निवडू शकते आणि आयएसपीएल स्वेच्छाधिकाराचा वापर करून योग्य असलेल्या सर्व प्रसंगी सुयोग्य सूचना देण्याचा प्रयत्न करू सकते. तुम्हाला अशा सर्व सुधारणा, बदल किंवा फेरबदलांबाबत माहिती ठेवण्यासाठी वेबसाइटवरील या अटी आणि प्रोग्राम विभाग वेळोवेळी पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. असे पर्याय सूचनेत नमूद केलेल्या कालावधीत तुम्ही वापरले नाहीत तर तुम्ही सुधारित अटी मानल्या आहेत असे गृहित धरले जाईल. प्रोग्राम रद्द केला गेल्यास सूचना कालावधी लागू असल्यास तो संपल्यावर, कोणतेही मेंबर किट्स, दावे, लाभ किंवा प्रमोशनल ऑफरचे दावे स्वीकारले जाणार नाहीत. हंगाम सुरू असताना आयएसपीएलने प्रोग्राम कोणतेही कारण न देता आणि वरील नोटीस कालावधीशिवाय रद्द केल्यास आणि परंतु असे की, पात्र वापरकर्त्याला अशा हंगामासाठी लागू असलेले लाभ न मिळाल्यास वरील कलम ९(क) च्या तरतुदी लागू होतील.

सर्वसाधारण

  • दैवी आपत्ती” घटना म्हणजे आयएसपीएलच्या वाजवी नियंत्रण आणि दूरदृष्टीपलीकडे असलेली घडणारी कोणतीही घटना ज्यात कोणत्याही जनसंपर्क यंत्रणेचा अभाव, घातपात, आग, पूर, भूकंप, नैसर्गिक आपत्ती, स्फोट, अपघात, दैवी कृत्ये, नागरी उठाव, संप किंवा कोणत्याही प्रकारची औद्योगिक कृती, लॉकआऊट, दंगली, हल्ला, युद्ध आणि दहशतवादी घटना, रोगराई, जागतिक साथ, विलगीकरणाचे आदेश, लॉकडाऊनचे आदेश, न्यायिक, सार्वजनिक किंवा नियामक प्राधिकाऱ्यांची कृत्ये किंवा आदेश, कायद्यात बदल, वेळापत्रकात, इंडियन प्रीमियर लीगचे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे आणि/ किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे नियम, नियमावली आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल, किंवा सरकारी कायदे यांचा समावेश आहे परंतु तेवढेच मर्यादित नाही. हे स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे की, आयएसपीएल कोणत्याही मेंबरशिप लाभांच्या, प्रोग्रा किंवा या अटी आणि प्रोग्रामअंतर्गत कोणत्याही उत्तरदायित्वाच्या पूर्ततेतील, डिलिव्हरी किंवा पूर्ततेतील अपयश किंवा विलंब यांच्यासाठी, सदर अपयश आणि/ किंवा विलंब दैवी आपत्तीच्या घटनेमुळे किंवा त्या कारणामुळे झालेले असल्याच्या मर्यादेत उत्तरदायी नसेल.
  • सदर अटींमधील एक किंवा अधिक तरतुदी लागू असलेल्या कायदा(द्यां)तर्गत अंमलबजावणी होणाऱ्या नसतील तर यातील उर्वरित अटी वैध आणि लागू करण्यायोग्य असतील.
  • तुमच्याकडून यातील कोणत्याही अटींच्या किंवा कोणताही हक्क किंवा उपायांबाबत उल्लंघनाच्या संदर्भात कारवाई करण्यासाठी आमचे अपयश किंवा विलंब सदर किंवा यापूर्वीच्या, सुरू असलेल्या, भविष्यातील किंवा तत्सम उल्लंघनाच्या संदर्भातील आमच्या कारवाईचा हक्क सोडून दिला असे मानणारे असेल.
  • प्रशासकीय कायदे आणि विवादः अटींचा अर्थ भारताच्या कायद्यांनुसार लावण्यात येईल आणि प्रशासित केला जाईल. अटींशी संबंधित कोणतेही विवाद, वाद किंवा दावे यांच्यासाठी मुंबई येथील न्यायालयांचे विशेष अधिकारक्षेत्र असेल.

कम्युनिकेशन्स

  • तुम्ही प्रोग्राम किंवा एमआयसंदर्भात आयएसपीएल किंवा त्यांचे कोणतेही भागीदार, एजंट्स, सेवा पुरवठादार, परवानाधारक किंवा सहयोगी यांच्याकडून उद्घोषणा, अपडेट्स, प्रशासकीय संदेश, विशिष्ट लाभांची डिलिव्हरी, अधिसूचना, प्रमोशन्स आणि जाहिराती प्राप्त करण्यासाठी संमती देत आहात.

ग्राहक सहकार्य

  • सदस्यत्व असलेल्या वापरकर्त्यांना लाभांच्या परताव्याचे फायदे, प्रोग्रामसंबंधी शंका किंवा सहाय्यासाठी किंवा तुम्हाला प्रोग्रामसंबंधी, तुमची मेंबरशिप किंवा काहीही तक्रारी किंवा चिंता असल्यास आणि तुम्हाला त्या आम्हाला सूचित करायच्या असल्यास किंवा त्यासंबंधी तुम्हाला आम्हाला अन्यथा काहीही अभिप्राय द्यायचा असल्यास सदस्य सहाय्य आणि/ किंवा ऑनलाइन हेल्पडेस्कचे दूरध्वनी क्रमांक वेबसाइटच्या प्रोग्राम विभागात उपलब्ध आहेत.