वापराच्या अटी आणि शर्ती

वेबसाइट www.mumbaiindians.com ही इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (“आयएसपीएल”)च्या मालकीची असून त्यांची मालमत्ता आहे. आयएसपीएल ही ‘मुंबई इंडियन्स’ व्यावसायिक ट्वेंटी२० क्रिकेट टीम (“टीम”) ची मालक आहे. वेबसाइटवर संवाद साधण्यापूर्वी कृपया या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा. ही वेबसाइट पाहून, ब्राऊज करून आणि वापरून तुम्ही खालील वापराच्या अटी आणि शर्ती तुम्ही वाचल्या, समजून घेतल्या आणि बांधील असण्यास मान्य करत असल्याचे स्वीकारत आणि मान्य करत आहात.

‘आपण’ किंवा ‘आम्ही’ किंवा ‘आमचे’ या संज्ञा म्हणजे वेबसाइटचे मालक आणि चालक असलेले आयएसपीएल होत. ‘वापरकर्ता’, ‘आपण’, ‘तुम्ही’ या संज्ञांचा अर्थ वेबसाइटचे वापरकर्ता किंवा प्रेक्षक होत.

आयएसपीएल या अटींमध्ये पूर्णपणे किंवा अंशतः कोणत्याही वेळी कोणतीही पूर्वसूचना न देता भर घालण्याचे, सुधारण्याचे, दुरूस्ती करण्याचे, रद्द, मर्यादित किंवा बदलण्याचे अधिकार राखून ठेवत आहे. तसेच आयएसपीएल कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही वेळी वेबसाइट, वेबसाइटची वैशिष्टे, वेबसाइटवरील साहित्य किंवा त्याचा भाग काढून घेण्याचे, रद्द करण्याचे, फेरबदल, सुधारणा बदल किंवा पलटण्याचे स्वेच्छाधिकार राखून ठेवत आहे. या अटींमध्ये केलेल्या सर्व दुरूस्ती/ सुधारणा वेबसाइटवर समाविष्ट केल्या जातील आणि वेबसाइटवर अशा प्रकारे नमूद केल्यानंतर त्या तात्काळ प्रभावशाली होतील. अशा बदल किंवा सुधारणांनंतर तुम्ही वेबसाइटचा वापर करत असल्यास तुम्ही सुधारित/ बदललेल्या अटी मान्य करत असल्याचे गृहित धरले जाईल. कोणत्याही बदलाची माहिती ठेवण्यासाठी कृपया या अटी नियमितपणे पाहा. तुम्हाला या अटी मान्य नसल्यास कृपया वेबसाइटचा वापर तात्काळ बंद करा.

 1. वेबसाइट पोहोच, सेवा आणि उपलब्धता:
  1. ही वेबसाइट विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहे. तथापि, या वेबसाइटवर देण्यात आलेली काही उत्पादने किंवा सेवांच्या संदर्भात सबस्क्रिप्शन, सदस्यत्व किंवा इतर शुल्क वापरकर्त्यांकडून घेण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. आयएसपीएल वेबसाइटच्या माध्यमातून विशिष्ट उत्पादने, सेवा, साहित्य आणि इतर कार्ये (“सेवा”) उपलब्ध करून देऊ शकते. वेबसाइटवर देण्यात येणाऱ्या सेवा प्रत्येक वेळी आणि प्रदेशनिहाय बदलू शकतात. तसेच, आयएसपीएल पूर्णपणे स्वेच्छाधिकारानुसार वापरकर्त्याला वेबसाइटची पोहोच मर्यादित करण्याचा किंवा त्यांना वेगळी वेबसाइट वापरण्याचे आदेश किंवा रिडायरेक्ट करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. आयएसपीएल एका प्रदेशातील वापरकर्त्याला दुसऱ्या प्रदेशातील वेबसाइटच्या सेवा पाहता, वापरता किंवा प्राप्त करता येतील याची कोणतीही हमी किंवा निश्चिती देत नाही.
 1. नोंदणी:
  1. सर्वसाधारणपणे तुम्ही वेबसाइटवर नोंदणी न करता किंवा तुमची ओळख किंवा तुमची वैयक्तिक माहिती न देता आमची वेबसाइट पाहू शकता आणि तिला भेट देऊ शकता. तथापि, विशिष्ट सेवा आणि उत्पादने मिळवण्यासाठी तसेच वेबसाइटची विशिष्ट वैशिष्टे आणि साहित्य (येथे स्पष्ट केल्याप्रमाणे) पाहण्यासाठी वापरकर्ता प्रोफाइल तयार करण्याची एक साधी नोंदणी प्रक्रिया पार पाडावी लागेल. नोंदणी आणि युजर प्रोफाइलच्या निर्मितीसाठी तुम्हाला तुमची ओळख तसेच / किंवा तुमच्याबद्दलची इतर माहिती यात नमूद केल्याप्रमाणे द्यावी लागेल.
 1. वापरकर्ता प्रोफाइल:
  1. वापरकर्त्यांना आमच्याकडे नोंदणी करण्याचा आणि वेबसाइटवर एक वैयक्तिक युजर प्रोफाइल (“युजर प्रोफाइल”) तयार करण्याचा पर्याय असेल. त्यामुळे त्यांना आमच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेले साहित्य लाइक करून/ कमेंट करून/ शेअर करून आमच्या वेबसाइटवर संवाद साधणे शक्य होईल. वेबसाइटवरील ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून आणि युजर प्रोफाइल तयार करून तुम्ही या अटी आणि आमचे (“गोपनीयता धोरण”) येथे उपलब्ध असलेले गोपनीयता धोरण स्वीकारत असल्याचे निश्चित करत आहात. आयएसपीएल आपल्या संपूर्ण आणि एकल स्वेच्छाधिकारानुसार नोंदणीसाठी नोंदणी अर्ज स्वीकारण्यास आणि युजर प्रोफाइल तयार करण्यास नकार देऊ शकते.
  2. युजर प्रोफाइल तयार करण्यासाठी तुम्ही एकतरः
   1. युजर प्रोफाइल तयार करण्यासाठी तुम्ही एकतरः युजर प्रोफाइल तयार करण्यासाठी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, इमेल पत्ता, मोबाइल नंबर, जन्मतारीख, लिंग, राज्य आणि शहर द्यावे लागेल आणि तुमच्या युजर प्रोफाइलसाठी पासवर्ड निवडावा लागेल.
  3. तुम्ही हे मान्य करून स्वीकारत आहात की, तुम्हाला तुमच्या युजर प्रोफाइल पडताळणीसाठी स्वतःबद्दल अधिक माहिती द्यावी लागू शकेल. तुमचे युजर प्रोफाइल पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, इमेल पत्ता, लिंग, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, सध्याचे शहर/ निवासस्थान आणि प्रोफाइल फोटो द्यावा लागेल. तुम्ही स्वतःबद्दल अचूक आणि पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. तुम्ही हे मान्य करता की ही माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला सूचित करून ती अद्ययावत कराल. तुम्ही आम्हाला देत असलेली कोणतीही माहिती तुमच्या सर्वोत्तम ज्ञानानुसार पूर्ण आणि सत्य असली पाहिजे. तुम्ही दिलेली माहिती तपासण्याचे किंव पडताळणी उत्तरदायित्व आमच्यावर नाही आणि तुम्ही चुकीची माहिती दिल्याचा किंवा आमच्यापासून संबंधित माहिती लपवल्याच्या परिणाम किंवा निष्कर्षासाठी आम्ही जबाबदारी घेणार नाही.
  4. तुम्ही हे समजता की वेबसाइटवर तुम्ही देत असलेल्या माहितीचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे ज्यात तुमचे युजरनेम, पासवर्ड, इमेल पत्ता, संपर्क तपशील आणि मोबाइल क्रमांक यांचा समावेश आहे परंतु तेवढेच मर्यादित नाही. तुम्ही पासवर्ड आणि युजर प्रोफाइलची गोपनीयता राखण्यासाठी उत्तरदायी आहात आणि तुमचा पासवर्ड किंवा युजर प्रोफाइलअंतर्गत होणाऱ्या सर्व कार्यांसाठी तुम्ही जबाबदार आहात.
  5. आमच्या सेवा आणि आमची वेबसाइट सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी आहेत. तुमचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल आणि आमच्या वेबसाइटवर युजर प्रोफाइल तयार करायचे असल्यास कृपया तुमच्या पालकांना तुमच्या पतीने नोंदणी करून युजर प्रोफाइल तयार करण्यास सांगा. तुम्ही आईवडील/ कायदेशीर पालक असाल आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या/ पाल्याच्या वतीने युजर प्रोफाइल तयार केलेले असल्यास तुम्ही या अटी मान्य करत असल्याचे निश्चित करत आहात आणि तुमच्या मुलासाठी/ पाल्यासाठी तयार केलेल्या अशा कोणत्याही युजर प्रोफाइलच्या संदर्भात तुमच्या मुलाकडून/ पाल्याकडून या अटींचे पालन केले जाईल असे स्पष्ट करत आहात. तुमच्या मुलाच्या/ पाल्याच्या वेबसाइट आणि युजर प्रोफाइलच्या वापराच्या संदर्भात तुमच्या मुलाची/ पाल्याची वर्तणूक आणि दिलेल्या कोणत्याही माहितीसाठी तुम्ही जबाबदार असाल.
 1. वेबसाइटवरील साहित्य:
  1. या अटींच्या सापेक्ष या वेबसाइटवर दिसणारे सर्व साहित्य, ज्यात चित्रे, विधाने, मते, लेख, अभिप्राय, छायाचित्रे, उत्पादने, चित्रे, कलाकृती, डिझाइन्स, लेखन, ग्राफिक्स, लोगो, बटण आयकॉन्स, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स तसेच सॉफ्टवेअर (एकत्रितरित्या “साहित्य”) हे आयएसपीएल आणि/ किंवा तिच्या मालकीच्या कंपन्या, सहयोगी, परवानाधारक आणि साहित्याचे पुरवठादार यांच्या मालकीच्या आणि त्यांनी नियंत्रित केलेल्या आहेत आणि जागतिक डिझाइन, ट्रेडमार्क्स, ट्रेड ड्रेस, कॉपीराइट आणि इतर बौद्धिक संपदा कायद्यांनी संरक्षित आहेत. या वेबसाइटच्या काही विशिष्ट विभागांमध्ये साहित्याची निर्मिती वापरकर्ते, चाहते किंवा इतर तृतीय पक्ष साहित्य पुरवठादारांनी तयार केलेल्या साहित्याच्या मर्यादेत आयएसपीएल सर्वसाधारणपणे साहित्याची पडताळणी किंवा पाहण करत नाही आणि अशा साहित्याचे योगदान देणाऱ्या व्यक्ती अशा योगदानासाठी पूर्णपणे जबाबदार असतात. तुम्ही या वेबसाइटवर असलेल्या कोणत्याही माहितीसंबंधात अवलंबून राहिल्यास असे अवलंबित्व तुमच्या जबाबदारीवर असेल.
  2. ही वेबसाइट आणि त्यातील साहित्य या वेबसाइटच्या वापरकर्त्यांकडून वैयक्तिक, बिगर वाणिज्यिक वापरासाठी आहे. तुम्ही या वेबसाइटवरील साहित्य कॉपी करू शकत नाही किंवा अन्यथा या वेबसाइटवरील कोणताही कॉपीराइट किंवा मालकीच्या सूचना बदलू, लपवू किंवा काढून टाकू शकत नाही. या वेबसाइटवरील कोणत्याही साहित्य किंवा मटेरियलशी संबंधित कोणताही हक्क, शीर्षक किंवा हितसंबंध लागू असल्यास तुमच्या या वेबसाइटच्या वापराद्वारे तुम्हाला हस्तांरित होत नाही. तुम्ही आयएसपीएलच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही साहित्य, वेबसाइट किंवा कोणतेही संबंधित सॉफ्टवेअर पूर्णपणे किंवा अंशतः पुनर्निर्मिती, प्रकाशित, हस्तांतरित, वितरित, प्रदर्शित, सुधारित, डेरिव्हेटिव्ह कार्ये निर्मिती करणे, त्यांच्या विक्रीत किंवा वापर करण्यात सहभागी होऊ शकत नाही.
 1. योगदान दिलेले साहित्यः
  1. या वेबसाइटवर तुम्ही पोस्ट केलेले किंवा प्रदर्शित केलेल्या कोणत्याही नोट्स, कमेंट्स, छायाचित्रे, संदेश, इमेल्स, बिलबोर्ड पोस्टिंग, छायाचित्रे, चित्रे, प्रोफाइल्स, मते, कल्पना, व्हिडिओ, ऑडिओ फाइल्स किंवा इतर कोणतय्ही साहित्यासाठी (एकत्रितरित्या “वापरकर्ता साहित्य”) यांच्यासाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. आयएसपीएल वापरकर्त्यांकडून कोणतेही वापरकर्ता साहित्य वेबसाइटवर सादर करण्याच्या, पोस्ट करण्याच्या आणि/ किंवा, हस्तांतरित करण्याच्या पद्धती आणि परिस्थिती वेळोवेळी तपासून बदलण्याचे अधिकार राखून ठेवते. नोंदणीकृत युजर प्रोफाइलने नोंदणीकृत असलेल्या वापरकर्त्यांना विशिष्ट युजर कंटेंट (जसे प्रतिक्रिया आणि संदेश) वेबसाइटवर पोस्ट केलेल्या विशिष्ट कंटेंटला आणि वेबसाइटवरील इतर युजर प्रोफाइल्सनी पोस्ट केलेल्या युजर कंटेंटला प्रतिसाद आणि प्रत्युत्तर म्हणून संवाद साधण्याच्या दृष्टीने पोस्ट करण्याची परवानगी दिली जाऊ शकेल. तुम्ही हे मान्य करता की, तुम्ही पोस्ट केलेल्या कोणत्याही युजर कंटेंटचा वापर आयएसपीएलकडून केला जाऊ शकतो ज्यात अशा युजर कंटेंटचा समावेश असलेल्या डेरिव्हेटिव्ह कामाच्या निर्मितीसाठी जे यात नमूद केलेल्या गोपनीयता धोरण आणि अटींच्या सुसंगत असेल आणि तुम्हाला अशा वापरासाठी कोणतेही प्रदान किंवा इतर भरपाई मिळवण्याचा अधिकार नसेल. तुम्ही कोणत्याही अयोग्य किंवा बेकायदेशीर पद्धतीने किंवा तुम्हाला लागू असलेला कोणताही कायदा किंवा परवान्याचे उल्लंघ करून वेबसाइटचा वापर करू शकत नाही. तुम्ही वेबसाइटच्या वापरासंबंधी आम्ही देत असलेल्या सर्व वाजवी सूचनांचे पालन करण्याचे मान्य करत आहात. तुम्ही वेबसाइटवर पोस्ट केलेल्या कोणत्याही युजर कंटेंटला पोस्ट करण्याची किंवा लिंक देण्यास आयएसपीएलला परवानगी देण्यास मान्यता देत आहात. तुम्ही वेबसाइटवर कोणत्याही प्रकारच्या युजर कंटेंटचे योगदान दिल्यास तुम्ही आयएसपीएल आणि त्यांचे सहयोगी, सेवा पुरवठादार, परवानाधारक आणि असोसिएट्स यांना असे युजर कंटेंट सध्या ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्याही माध्यमात वापरण्याची, पुनरूत्पादित करण्याची, प्रकाशित, एडिट, वितरित, हस्तांतरित, साठवणूक, ट्रान्समिट, सार्वजनिक प्रदर्शन आणि अंगीकार करण्यासाठी एक संपूर्ण, रॉयल्टीमुक्त, जगभरात वापरण्यात येणारा आणि पोटपरवानायोग्य हक्क देत आहात. अशा प्रकारच्या युजर कंटेंटमध्ये योगदान देत असताना तुम्ही आयएसपीएलला हे सूचित करता की युजर कंटेंट हे मालकीची मूळ कलाकृती आहे किंवा तुम्हाला असे योगदान करण्याचा हक्क आहे आणि उक्तनिर्देशित परवाने तुम्ही आयएसपीएलला प्रदान करत आहात.
 1. वेबसाइटच्या या वापराला परवानगी नाही:
  1. या वेबसाइटचे वापरकर्ते कोणतेही युजर कंटेंट आयोजित, प्रदर्शित, अपलोड, पोस्ट, कमेंट, सुधारित, प्रकाशित, हस्तांतरित, अपडेट किंवा शेअर करणार नाही जेः:
  1. दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीचे आहे आणि त्यासाठी वापरकर्त्यांना कोणताही हक्क नाही;
  2. धोकादायक, छळ करणारे, निंदात्मक, अवमानजनक, अश्लील, पोर्नोग्राफिक, पेडिओफायलिक, अब्रुनुकसानीकारक, दुसऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे असेल ज्यात सेलिब्रिटींचे हक्क, गोपनीयता आण बौद्धिक संपदा, तिरस्कारजन्य, किंवा वांशिकदृष्ट्या अनुवांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह, अपमानास्पद, पैशांचा अपहार किंवा जुगार यांच्याशी संबंधित किंवा प्रोत्साहन देणारे किंवा कोणत्याही इतर प्रकारे बेकायदेशीर असलेल्या बाबींचा समावेश आहे परंतु तेवढेच मर्यादित नाही;
  3. अज्ञान मुलांना कोणत्याही प्रकारे धोकादायक;
  4. कोणतेही पेटंट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट, कॉपीराइट किंवा इतर बौद्धिक, मालकीचे हक्क, गोपनीयतेचे हक्क किंवा कोणत्याही पक्षाच्या इतर हक्कांवर अतिक्रमण;
  5. तत्कालीन अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन;
  6. प्राप्तकर्त्याला अशा कोणत्याही संदेशाबाबत चुकीची माहिती देणे गैरसमज करून देणे किंवा अशी कोणतीही माहिती देणे जी अवमानजनक किंवा धोकादायक स्वरूपाची आहे;
  7. दुसऱ्या व्यक्ती किंवा आस्थापना असल्याप्रमाणे दर्शवणे किंवा कोणतीही व्यक्ती किंवा आस्थापना यांच्यासोबत तुमची संलग्नता असल्याचे खोटे दर्शवणे;
  8. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या वेबसाइटचा वापर, पोहोच आणि/ किंवा आनंद यांच्यामध्ये अडथळे किंवा हस्तक्षेप करणे;
  9. कोणत्याही संगणकीय स्त्रोताच्या कार्यक्षमतेत अडथळे आणण्यासाठी, नष्ट करण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी सॉफ्टवेअर व्हायरसेस, किंवा इतर कोणतेही संगणकीय कोड, फाइल्स किंवा प्रोग्राम्स यांचा समावेश (ज्यात कोणत्याही मर्यादेशिवाय संगणकीय व्हायरस, मालवेअर, लॉजिक बॉम्ब, ट्रोजन हॉर्सेस, वॉर्म्स, घातक घटक, करप्टेड डेटा किंवा इतर धोकादायक सॉफ्टवेर किंवा धोकादायक डेटाचा समावेश आहे परंतु तेवढेच मर्यादित नाही);
  10. भारताची एकता, एकात्मता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व यांना, परकीय राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणे किंवा कोणताही दखलपत्र गुन्हा घडण्यासाठी कारण ठरणे किंवा कोणत्याही अपराधाच्या चौकशीला प्रतिबंध करणे किंवा दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राचा अपमान.
 1. युजर रिवॉर्ड प्रोग्रामः:
  1. युजर प्रोफाइलची एक्टिव्हिटी आणि वेबसाइटवरील संवादावर आधारित, वेबसाइटवर पोस्ट करण्यात आलेल्या विशिष्ट कंटेंटला आणि इतर युजर प्रोफाइल्सनी पोस्ट केलेल्या युजर कंटेंटला प्रतिसाद म्हणून कलात्मक आणि सकारात्मक युजर कंटेंटसह आयएसपीएल वेळोवेळी आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार निश्चित केलेल्या पद्धतीने निवडक युजर प्रोफाइल्सची निवड करून अशा युजर प्रोफाइल्सच्या नोंदणीकृत युजर्सना पारितोषिके देऊ शकते, जसे टीम मर्चंडाइज किंवा टीमच्या सामन्यांची तिकिटे ज्याचा निर्णय आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार वेळोवेळी (“रिवॉर्ड्स प्रोग्राम”) घेतला जाईल. रिवॉर्ड प्रोग्रामची अंमलबजावणी आयएसपीएलकडून आयएसपीएलच्या स्वेच्छाधिकारानुसार केली जाईल आणि अतिरिक्त विशेष अटी आणि शर्तींच्या सापेक्षही असेल.
  2. तुम्ही याद्वारे हे मान्य करत आणि स्वीकारत आहात की तुम्ही वेबसाइटवर संपूर्ण युजर प्रोफाइलसह नोंदणीकृत वापरकर्ते असाल तरच रिवॉर्ड्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असाल. याखेरीज, आयएसपीएलने अन्यथा स्पष्टपणे विनिर्दिष्ट केलेले असल्याशिवाय संपूर्ण युजर प्रोफाइलसह एक नोंदणीकृत वापरकर्ता तो/ ती भारताचा नागरिक असेल तरच रिवॉर्ड्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असेल. या संदर्भात तुम्ही हे मान्य करता आणि स्वीकारता की तुम्हाला रिवॉर्ड्स प्रोग्राममध्ये तुमची पात्रता कायम ठेवण्यासाठी एक वैध भारतीय पत्त्याचा पुरावा आएसपीएलला सादर करावा लागेल. तुम्ही याद्वारे पुढे मान्य करता आणि स्वीकारता की तुम्हाला रिवॉर्ड प्रोग्रामअंतर्गत देऊ केलेली कोणतेही(तीही) पारितोषिक(के) ही तुमच्या वैयक्तिक बिगर व्यावहारिक वापरासाठी असतील आणि ती अतिरिक्त अटी आणि शर्तींच्या सापेक्ष असू शकतात.
  3. आयपीएल रिवॉर्ड प्रोग्राम किंवा त्याचा कोणताही भाग कोणत्याही वेळी सुधारित, अद्ययावत, रद्द किंवा मागे घेण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. रिवॉर्ड प्रोग्रामअंतर्गत पारितोषिकांचे स्वरूप आयएसपीएलकडून वेळोवेळी त्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार सुधारित किंवा दुरूस्त केले जाऊ शकते. तुम्ही यातील कोणत्याही अटींचे आणि/ किंवा रिवॉर्ड प्रोग्रामला आणि/ किंवा पारितोषिकाला लागू असलेल्या कोणत्याही विशेष अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी आयएसपीएल या बाबींचे अधिकार राखून ठेवतेः (१) तुम्ही रिवॉर्ड्स प्रोग्रामअंतर्गत तुम्ही जिंकलेले कोणतेही पारितोषिकाचे प्रदान रद्द करणे आणि/ किंवा (२) रिवॉर्ड्स प्रोग्राममधील तुमचा सहभाग रद्द करणे आणि/ किंवा (३) तुमचे युजर प्रोफाइल बंद करणे.
 1. वॉरंटी आणि उत्तरदायित्व अस्वीकरण:
  1. या वेबसाइटवर उपलब्ध असलेले सर्व साहित्य, माहिती आणि साधने (लेखनसाहित्यासह) तुम्हाला "आहे तसे" आणि "उपलब्ध असल्याप्रमाणे" या तत्वावर देण्यात येत आहे, जे कोणत्याही स्वरूपाच्या अभिव्यक्त किंवा मानीव वॉरंटी किंवा हमीशिवाय देण्यात आले हे. विशेषतः एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाच्या सुयोग्यतेसाठी हमी, विनाअडथळा पोहोच, अचूकता, माहितीचे पूर्णत्व किंवा अद्ययावत असणे किंवा चुका, व्हायरस, मालवेअर, ट्रोजन्स, बग्स, वॉर्म्स, संसर्ग इत्यादींपासून मुक्तता यांची कोणतीही हमी या वेबसाइट किंवा त्याच्या वापराच्या संदर्भात देण्यात आलेली नाही. त्याशिवाय सदर वेबसाइटचे कार्यान्वयन, माहिती, कंटेंट, युजर कंटेंट, मटेरियल्स किंवा उत्पादने यांच्या संदर्भात अभिव्यक्त किंवा मानीव अशा कोणत्याही प्रकारची हमी किंवा वॉरंटी आयएसपीएल देत नाही. लागू असलेल्या कायद्याने आवश्यक असलेली मर्यादा वगळता, आयएसपीएल या वेबसाइटच्या वापरातून येणारी माहिती, कंटेंट, युजर कंटेंट, मटेरियल्स किंवा उत्पादने यांची अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, परिणामात्मक किंवा अन्यथा यांच्याबाबतीत सर्व प्रकारची जबाबदारी नाकारत आहे..
  2. आयएसपीएल या गोष्टींची हमी देत नाही (१) ही वेबसाइट सातत्याने उपलब्ध असेल किंवा उपलब्ध असेलच; किंवा (२) या वेबसाइटवरील माहिती संपूर्ण, सत्य, अचूक किंवा गैरसमज करून देणारी नाही.
  3. लागू असलेल्या कायद्यांन्वये कमाल अनुज्ञेय मर्यादेत तुम्ही याद्वारे आयएसपीएल, टीम, तिचे सहयोगी, भागीदार, प्रायोजक, सहयोगी कंपन्या, एजंट्स, कर्मचारी, अधिकारी, संचालक आणि प्रतिनिधी यांना (“आयएसपीएल क्षतिपूर्तीमुक्त पक्षकार”) वेबसाइटचा वापर किंवा वापर करण्यातील अक्षमता, अनुपलब्धता, मागे घेणे, सुधारणा, रद्द करणे, अडथळे येणे, वेबसाइट बंद करणे किंवा बदल करणे किंवा वेबसाइट पाहण्यात किंवा वापरण्यातील अक्षमतेपासून मुक्त करण्याचे, सोडून देण्याचे आणि क्षतिमुक्त ठेवण्याचे मान्य करत आहात आणि आयएसपीएलचे क्षतिपूर्तीमुक्त पक्ष कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, घटनेपुरत्या, विशेष, दंडात्मक किंवा परिणामात्मक नुकसानासाठी उत्तरदायी नसतील.
  4. या वेबसाइटचे नियंत्रण आणि कार्यान्वयन भारतातून केले जात आहे आणि आयएसपीएल असा कोणताही दावा करत नाही की यात असलेले साहित्य, माहिती किंवा मटेरियल हे दुसऱ्या ठिकाणाहून वापरण्यासाठी सुयोग्य किंवा उपलब्ध असेल. भारताबाहेरून ही वेबसाइट पाहणे आणि वापरणे हा पूर्णपणे तुम्ही पत्करणार असलेला धोका आहे आणि सर्व लागू असलेल्या कायद्यांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही जबाबदार असल्याचे तुम्ही मान्य करता आणि लिहून देता आणि आयएसपीएल क्षतिपूर्तीमुक्त पक्षकारांना या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही उत्तरदायित्व किंवा नुकसानापासून मुक्त, डिस्चार्ज किंवा सोडून देण्याचे मान्य करता.
  5. आयएसपीएल तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता वेबसाइटमध्ये नवीन वैशिष्टे, कार्यक्षमता आणि घटक आणण्याचा आणि/ किंवा अस्तित्वात असलेले घटक बदलण्याचा, सुधारण्याचा, दुरूस्त करण्याचा, बंद करण्याचा, थांबवण्याचा आणि काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. तसेच तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता देण्यात आलेल्या एक किंवा अधिक सेवा किंवा वेबसाइट बंद करण्याचा (कायमस्वरूपी किंवा तात्पुरते) अधिकार आयएसपीएलला आहे. आयएसपीएल वेबसाइटच्या वापरावर आणि/ किंवा सेवा किंवा कंटेंटच्या साठवणुकीवर आणि/ किंवा युजर कंटेंटवर त्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोपनीयता धोरणाचे पालन करत असताना मर्यादा आणू शकते. आयएसपीएल तुम्हाला वेबसाइटला आणि सेवा पोहोच आणि वापर देत असल्याच्या दृष्टीकोनातून तुम्ही हे मान्य करता की आयएसपीएल आणि तृतीय पक्ष पुरवठादार आणि भागीदार सेवांवर किंवा कंटेंट, युजर कंटेंट किंवा सेवांमधून माहितीवर अशा प्रकारच्या जाहिराती लावू शकतात, त्या त्यांनी सादर केलेल्या असतील किंवा इतरांनी सादर केलेल्या असू शकतात.
 1. माहितीची अचूकताः
  1. या वेबसाइटवर सादर केलेली माहिती आयएसपीएलने अंतर्गत आणि बाह्य स्त्रोतांमधून गोळा केलेली आहे. या माहितीचे पूर्णत्व किंवा अचूकतेबाबत कोणतेही सादरीकरण किंवा वॉरंटी देण्यात आलेली नाही. या वेबसाइटवर टायपोग्राफिकल चुका, अपूर्णत्व किंवा जुनी माहिती दिलेली असू शकते. आयएसपीएल कोणत्याही वेळी, कोणतीही पूर्वसूचना न देता या वेबसाइटवरील किंवा त्यावर देण्यात आलेल्या सेवांच्या संदर्भात कंटेंट, युजर कंटेंट आणि महितीत बदल करण्याचा किंवा अद्ययावत करण्याचा अधिकार राखून ठेवते, परंतु आयएसपीएल ही माहिती दुरूस्त किंवा अद्ययावत करण्याचे कोणतेही वचन देत नाही.
 1. तृतीय पक्ष संवाद आणि तृतीय पक्ष साइट्सना लिंक्सः
  1. या वेबसाइटवर आयएसपीएलच्या मालकीच्या, चालवलेल्या किंवा शिक्कामोर्तब नसलेल्या तृतीय पक्ष वेबसाइटच्या लिंक्स असू शकतात आणि तुम्ही याद्वारे आयएसपीएल क्षतिपूर्तीमुक्त पक्षांना अशा तृतीय पक्ष वेबसाइट किंवा लिंक्सचा वापर किंवा वापरातील अक्षमता किंवा पाहण्यातून उद्भवणारे दावे, नुकसान आणि हानी यांच्यापासून मुक्त करता आणि सोडून देत आहात. आयएसपीएल याद्वारे अशा तृतीय पक्ष वेबसाइटवर प्रदर्शित केलेले किंवा उपलब्ध केलेले कंटेंट किंवा त्यांच्याकडून खरेदी केलेली उत्पादने/ मर्चंडाइज किंवा तुम्ही दिलेली/ तुमच्याकडून गोळा केलेल्या माहितीच्या संदर्भातील सर्व जबाबदारी किंवा उत्तरदायित्व नाकारते. तुम्हाला अशा तृतीय पक्ष वेबसाइटना भेट देण्यापूर्वी, पाहण्यापूर्वी, वापरण्यापूर्वी किंवा त्यांच्या सेवा घेण्यापूर्वी अशा तृतीय पक्ष वेबसाइट्सच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  2. सदर तृतीय पक्ष वेबसाइटच्या संदर्भातील संपर्क, जाहिरात, खरेदी किंवा प्रमोशन, वस्तू आणि/ किंवा सेवांच्या डिलिव्हरी आणि पेमेंटसह आणि इतर कोणत्याही अटी, शर्ती, वॉरंटी किंवा अशा तृतीय पक्ष वेबसाइटशी संबंधित पत्रव्यवहार, खरेदी किंवा प्रमोशन हे फक्त तुम्हाला आणि लागू असलेल्या तृतीय पक्षांदरम्यान आहे आणि ही पूर्णपणे तुमच्या जबाबदारीवर आहे. आयएसपीएल तुम्ही अशा तृतीय पक्ष वेबसाइटला तुम्ही दिलेल्या/ तुमच्याकडून घेतलेल्या कोणत्याही प्रकारचे व्यवहार, माहिती आणि अशा तृतीय पक्ष वेबसाइट्सशी संवाद आणि/ किंवा त्यातून झालेले कोणतेही नुकसान यांच्यासाठी उत्तरदायी किंवा जबाबदार नसेल.
 1. बौद्धिक संपदाः
  1. या वेबसाइटवर दर्शवण्यात आलेले किंवा प्रदर्शित केलेले सर्व कंटेंट, टीमचे ट्रेडमार्क, लोगो, छायाचित्रे, चित्रे, ऑडिओ, व्हिडिओ, डिझाइन, लेआऊट आणि इतर सर्व कंटेंट आणि बौद्धिक संपदा हक्क आयएसपीएलच्या मालकीचे आणि त्यांची एकमेव मालमत्ता आहेत आणि/ किंवा वैध परवाना/ प्राधिकृतता यांअंतर्गत वापरण्यात येत आहेत. आयएसपीएलकडून किंवा त्यांच्या संबंधित मालकांकडून लेखी पूर्व परवानगीशिवाय या वेबसाइटवरील कंटेंटची अनधिकृतपणे नक्कल, वापर, पुनर्निर्मिती, वितरण, सुधारणा, फेरबदल, वितरण, रिपोस्टिंग, हायपरलिंकिंग, डीप-लिंकिंग, फ्रेमिंग, मिररिंग, डाऊलोडिंग किंवा इतर कोणताही वापर करण्यास कठोर प्रतिबंध आहे.
 1. अतिक्रमण सूचनाः
  1. या वेबसाइटवर प्रदर्शित केलेले किंवा अन्यथा उपलब्ध केलेले कोणतेही कंटेंट, युजर कंटेंट किंवा साहित्य या अटींचे उल्लंघन करत असल्याचे किंवा लागू असलेले कायदे, नियम आणि नियमावलीनुसार प्रतिबंधित किंवा निर्बंधित केल्याचे, किंवा तुमच्या मालकी हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे किंवा या वेबसाइटच्या इतर वापरकर्त्यांसाठी अपमानजनक असल्यास, धमकी देत असल्याचे किंवा इजा पोहोचवत असल्याचे तुमचे सदविचाराने मत असल्यास कृपया खालील माहिती गोळा करा आणि info@mumbaiindians.com; येथे इमेल पाठवा. त्या इमेलमध्ये खालील माहिती समाविष्ट असेल:
   1. वेबसाइटवरील कथित प्रतिबंधित/ बेकायदेशीर/ अपमानास्पद मटेरियलची स्पष्ट ओळख पटवणे (विशिष्ट यूआरएल संदर्भासह);
   2. तुमचे संपर्क तपशीलः नाव, पत्ता, इमेल पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक;
   3. मालकी हक्कांच्या कथित उल्लंघनाच्या प्रकरणी (कॉपीराइट, ट्रेडमार्क किंवा गोपनीयता हक्कांसह); एक निवेदन ज्यात तुम्हाला सद्भावनेने असे वाटते की, वेबसाइटवर कथित स्वरूपात अतिक्रमित करण्यात आलेले मालकीचे साहित्य तुम्ही किंवा तुमचे एजंट किंवा कायद्याने प्राधिकृत केलेले नाही;
   4. एक निवेदन ज्यात तुम्हाला सद्भावनेने असे वाटते की असे साहित्य प्रतिबंधित/ बेकायदेशीर/ अपमानास्पद आहे; आणि
   5. एक निवेदन ज्यानुसार नोटीसमध्ये देण्यात आलेली माहिती अचूक आहे आणि खोटी साक्ष देणाऱ्यांना दंडाच्या तत्वाखाली आहे आणि स्वाक्षरीकर्ता हा तुमच्या वतीने काम करण्यासाठी प्राधिकृत आहे.
  2. तुम्ही या कलमाअंतर्गत पाठवलेले इमेल नोटिफिकेशन तुमच्या इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीने किंवा कंटेंट किंवा युजर केंटेंटद्वारे या अटींचे उल्लंघन झाल्यामुळे थेट बाधित झालेल्या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीसह पाठवलेले असेल.
  3. अशा प्रसंगी आयएसपीएल आपल्याशी पुढील माहितीसाठी संपर्क साधू शकेल आणि असे कंटेंट/ युजर कंटेंट या अटींचे उल्लंघन करते की नाही किंवा अन्यथा ते अपमानास्पद/ प्रतिबंधित/ बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचा पूर्ण स्वेच्छाधिकार राखून ठेवते आणि त्यांना योग्य वाटेल अशा प्रकारची कारवाई ते या संदर्भात करतील. तुम्ही उक्तनिर्देशित नोटिफिकेशन प्रक्रियेचा गैरहेतूने वापर केल्यास आयएसपीएल तुम्हाला वेबसाइट पाहण्यास प्रतिबंधित करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.
 1. नुकसानभरपाई:
  1. तुम्ही (१) तुमचा वेबसाइटचा वापर (२) वेबसाइट पाहणे तुम्हाला शक्य होत असल्यास किंवा नसल्यास (३) तुम्ही वेबसाइटवर कोणत्याही प्रकारचे युजर कंटेंट टाकल्यास त्याचा बेकायदेशीरपणा किंवा इतरांच्या कंटेंटवरील अतिक्रमण किंवा या वेबसाइटवर असलेल्या कोणत्याही माहितीवर तुम्ही अवलंबून राहिल्यास किंवा (४) रिवॉर्ड्स प्रोग्राममधील तुमचा सहभाग यातून येणारे कोणतेही दावे, नुकसान, खर्च आणि भरपाई, ज्यात वकिलांच्या शुल्काचा समावेश असेल परंतु तेवढेच मर्यादित नसेल त्यापासून तुम्ही आयएसपीएल आणि आयएसपीएल क्षतिमुक्त पक्षांचा बचाव करण्याचे, क्षतिपूर्तीमुक्त ठेवण्याचे आणि इजामुक्त ठेवण्याचे मान्य करत आहात आणि स्वीकारत आहात. तुम्ही हे लिहून देता, स्पष्ट करता आणि निश्चित करता की तुम्ही दिलेले कोणतेही साहित्य आणि कोणत्याही प्रकारचे युजर कंटेंटः (१) कोणत्याही तृतीय पक्षांच्या हक्कांचे उल्लंघन, चोरी किंवा अतिक्रमण ज्यात कॉपीराइट, ट्रेडमार्क, गोपनीयता किंवा इतर वैयक्तिक किंवा मालकीच्या हक्कांचा समावेश आहे असे नसेल किंवा (२) खोटे किंवा अन्यथा बेकायदेशीर साहित्य नसेल. आयएसपीएल स्वतःच्या जबाबदारीवर कोणत्याही साहित्याचा संपूर्ण बचाव आणि नियंत्रण करण्याचे अधिकार तुम्ही क्षतिपूर्तीमुक्त ठेवण्याच्या सापेक्ष राखून ठेवत आहे.
 1. माफी:
  1. तुम्ही यात विचाराधीन असलेल्या कोणत्याही बाबीसंदर्भात कोणतीही नुकसानभरपाई न मागता तुम्हाला कोणत्याही लागू कायद्यांतर्गत अस्तित्वात असलेले किंवा भविष्यात घेतलेले कोणतेही हक्क ज्यात (मर्यादेशिवाय) कोणताही कायदा, विनियम किंवा आदेशान्वये प्रदान केलेल्या गोपनीयता किंवा व्यक्तिमत्व हक्कांचा समावेश आहे.
 1. उत्पादनाची माहितीः
  1. या वेबसाइटवर दिसणारी उत्पादने कायमच वेबसाइटवर किंवा रिटेल विक्रीच्या ठिकाणी उपलब्ध असतीलच याची हमी आयएसपीएल देऊ शकत नाही. सर्व उत्पादनांचे तपशील आणि माहिती पूर्वसूचनेशिवाय बदलण्याच्या सापेक्ष आहेत. तुमचा संगणक/ साधनाचे विशिष्ट तांत्रिक तपशील आणि सेटिंग्स आणि त्याचे डिस्प्ले या वेबसाइटवर देण्यात आलेल्या उत्पादनाच्या प्रदर्शनाच्या अचूकतेवर परिणाम करू शकतात. या वेबसाइटवर प्रदर्शित केलेले वेबसाइटवरील कंटेंट आणि उत्पादने, निवडी आणि किमती (असल्यास) विक्रीची ऑफर मानली जात नाही आणि आयएसपीएलकडून ऑफरसाठी निमंत्रण मानले जाईल. याचा परिणाम म्हणून आयएसपीएल या वेबसाइटवर असलेल्या कोणत्याही माहितीवर एखादी व्यक्ती विसंबून तिला होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी घेत नाही आणि कोणतेही कंटेंट किंवा ऑफरचे निमंत्रण कोणत्याही वेळी आणि कोणतीही पूर्वसूचना न देता स्वतःच्या अटींवर सुधारित करण्याचे किंवा मागे घेण्याचे अधिकार राखून ठेवते.
 1. संपर्कः
  1. आम्हाला वेबसाइटवर ‘आमच्याशी संपर्क साधा’ या पेजवर स्पष्ट केलेल्या संपर्क तपशीलांचा वापर करून या वेबसाइटशी संबंधित कोणत्याही शंकेसाठी संपर्क साधता येईल. तुम्ही युजर प्रोफाइल तयार केले आणि आम्हाला तुमचे संपर्क तपशील दिल्यास (तुमचा इमेल पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकासह) आम्ही तुम्हाला माहिती आणि अपडेट्ससोबत संपर्क साधू ज्यात सामन्यांची यादी आणि टीमचे अपडेट्स यांचा समावेश असेल परंतु तेवढेच मर्यादित नसेल. आम्ही अशा संपर्क तपशिलांचा वापर अधूनमधून जाहिरातीचे साहित्य पाठवण्यासाठी करतो. त्यात रिवॉर्ड प्रोग्राम आणि उपलब्ध असलेल्या नवीन सेवांबाबतही सूचना असतील.
 1. निर्देशन:
  1. आयएसपीएलच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय तुम्ही या अटींअंतर्गत तुमचे हक्क आणि उत्तरदायित्व कोणालाही निर्देशित करू शकत नाही. आयएसपीएल वेबसाइटवर घोषणा करून लेखी अधिसूचनेद्वारे आपले हक्क आणि उत्तरदायित्वे तिसऱ्या पक्षाला निर्देशित करू शकते.
 1. प्रशासकीय कायदा, अधिकारक्षेत्र आणि विवाद निवारणः
  1. वेबसाइट आणि या अटींसंदर्भातील सर्व विवाद भारताच्या कायद्यान्वये कायद्यांमध्ये संघर्ष असले तरी प्रशासित केले जातील आणि मुंबई येथील न्यायालयांना सर्व विवादांशी संबंधित विशेष अधिकारक्षेत्र असेल.
  2. वर काहीही नमूद केलेले असले तरी भारतीय मध्यस्थी आणि लवाद कायदा १९९६ नुसार आयएसपीएलकडून नेमण्यात येणाऱ्या एकल लवादाद्वारे सर्व विवाद आणि दावे यांचे समायोजन केले जाईल. लवादाची प्रक्रिया इंग्लिश भाषेत पार पाडली जाईल आणि लवादाचे स्थान मुंबई येथे असेल. लवाद असा कोणताही दावा किंवा विवाद यांच्याबाबतचा निवाडा सक्तीने प्रशासनिक कायद्यान्वये करेल. याअंतर्गत कोणत्याही लवादाच्या प्रक्रियेतून आलेल्या निवाड्यावर अधिकारक्षेत्र असलेल्या कोणत्याही न्यायालयात दाद मागता येईल किंवा निवाड्याचा कायदेशीर स्वीकार करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी प्रकरणानुरूप कोणत्याही न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकेल. लवादाचा खर्च आणि भरपाई आणि लवादाचे शुल्क हे सर्व विवाद किंवा दाव्यात असलेल्या प्रत्येक पक्षाकडून समानपणे स्वीकारले जाईल; प्रत्येक पक्षकार स्वतःचे शुल्क, खर्च आणि वकिलाचे इतर खर्च स्वतःहून भरेल. लवादाचा निवाडा अंतिम असेल आणि विवादात असलेल्या सर्व पक्षकारांसाठी तो निर्णायक आणि बंधनकारक असेल.
  3. या अटींमध्ये काहीही नमूद केलेले असले तरी तुम्ही हे मान्य करता की या वेबसाइटच्या अटींच्या उल्लंघनासाठी आयएसपीएलला होणाऱ्या नुकसानासाठी आर्थिक भरपाई हा पुरेसा उपाय ठरणार नाही आणि त्यानुसार आयएसपीएलला तुम्हाला या अटी आणि शर्तींचे कोणतेही उल्लंघन टाळण्यासाठी सक्षम अधिकारक्षेत्र असलेल्या न्यायालयाला योग्य किंवा आवश्यक वाटेल अशा प्रकारचा कोणताही मनाई हुकूम, प्रतिबंध आदेश, वसुलीचा हक्क, विशिष्ट कामगिरीसाठी खटला किंवा इतर कोणताही दिलासा मिळवण्याचा हक्क असेल.
 1. पूर्तता न करणे आणि रद्दीकरण:
  1. वेबसाइट आणि या अटींशी संबंधित सर्व विवादांचे प्रशासन कायद्यांच्या उल्लंघनाचा संदर्भ न येता भारताच्या कायद्यान्वये केले जाईल आणि मुंबईतील न्यायालयांना सर्व विवादांच्या निपटाऱ्यासाठी विशेष अधिकारक्षेत्र असेल. यातील कोणत्याही अटींची पूर्तता न केल्यास वेबसाइट पाहण्याची परवानगी आणि/ किंवा वापरण्याचा हक्क नाकारण्यात येऊ शकतो. आयएसपीएल या अटींचे उल्लंघन केलेले आहे किंवा या अटी मान्य केलेल्या नाहीत अशा त्यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला कोणतीह सूचना न देता वेबसाइट पाहण्याचा अधिकार नाकारण्याचे हक्क राखून ठेवत आहे.
 1. गोळा केलेली आणि ट्रॅक केलेली माहिती:
  1. ही वेबसाइट पाहून तुम्ही हे मान्य करता आणि समजता की तुमचा आयपी पत्ता, वेबसाइट पाहण्यासाठी वापरलेले साधन आणि इतर लोकसांख्यिक माहिती नोंदवून रेकॉर्ड केली जाईल. तुम्ही आमच्या वेबसाइटवर नोंदणी करून युजर प्रोफाइल तयार करण्याचा पर्याय निवडलल्यास आम्ही वरील कलम ३ मध्ये नमूद केलेली अशी माहिती (वैयक्तिक माहितीसह) गोळा करून साठवून ठेवू. तुमच्याकडून घेतलेली सर्व माहिती, युजर प्रोफाइलच्या नोंदणीसाठी घेतलेल्या माहितीसह आमच्या गोपनीयता धोरणाच्या सापेक्ष आहे. तुम्हाला आमच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या काही सेवा घ्यायच्या असल्यास आम्ही तुमच्याकडून पुढील माहिती घेऊ. ही माहिती तुम्ही अशा सेवा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असताना मागितली जाईल. वेबसाइटवर अभिप्राय अर्जांद्वारे दाखल केलेली माहिती डेटाबेसमध्ये साठवली जाते. आम्ही या गोष्टीची हमी देतो की वापरकर्त्यांबाबतची वैयक्तिक माहिती त्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही तृतीय पक्षांना दिली जाणार नाही.