पुन्हा एकदा चॅम्पियन्स ऑफ अमेरिका! एमआय न्यूयॉर्कने खजिना उघडला आहे. त्यांनी कठीण लीग टप्पा आपल्या नावावर केला, प्लेऑफ्समध्ये मुसंडी मारली आणि एमएलसी ट्रॉफी खिशात टाकली. #OneFamily साठी २०२५ हे वर्ष अत्यंत सुंदर असून यंदा आपण तीन खंडांमध्ये चॅम्पियनशिप्स आपल्या नावावर केल्या आहेत.
आपल्या स्कायला काही लिमिट नाहीये!! त्याने या सीझनमध्ये विक्रमी ७१७ धावा केल्यात. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने केलेल्या इतिहासातील या सर्वाधिक धावा आहेत. त्याला आयपीएल २०२५ च्या सर्वाधिक मौल्यवान खेळाडूच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
आपण दुसऱ्या क्वालिफायरमध्ये बाहेर पडलो.:( टीमने सहा सलग विजय मिळवून प्लेऑफ्समध्ये मुसंडी मारली. पहिल्या पाच सामन्यांमध्ये चार सामने हरल्यानंतर ही जादू घडली. दुर्दैवाने मुंबई इंडियन्स प्लेऑफ्समधून बाहेर पडली.
मुलींनी निळ्यामध्ये आणखी सोनेरी रंगांची उधळण केली आहे. सगळे पुरस्कार खिशात!
ऑरेंज कॅप आणि एमवीपी : नॅट स्किव्हर ब्रंट
पर्पल कॅप: अमेलिया कर
सीझनचा उगवता खेळाडू: अमनजीत कौर
डब्ल्यूपीएल 2025 विजेते - हरमनप्रीत कौरची मुंबई इंडियन्स