सर्वांसाठी शिक्षण आणि खेळ

शिक्षण आणि खेळ या दोन्हींमध्ये एकत्रितरित्या मुलांचे आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. २०१० सालापासून मुंबई इंडियन्स ईएसए- सर्वांसाठी शिक्षण आणि खेळ यांना पाठिंबा देत आहे. या उपक्रमाद्वारे रिलायन्स फाऊंडेशनने १८ दशलक्षपेक्षा अधिक मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे. या उपक्रमाद्वारे भारतातील मुलांना दर्जेदार शिक्षण आणि खेळाच्या संधी दिल्या जातात.

२०१८ साली ईएफएचे रूपांतर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ईएसए)मध्ये झाले. ईएसए हा रिलायन्स फाऊंडेशनच्या एका प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. त्यांनी १३ दशलक्षपेक्षा अधिक मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकण्यासाठी शिक्षण आणि खेळाच्या लक्ष्याधारित क्षेत्रांना एकत्र आणले आहे. ईएसए उपक्रम संपूर्ण वर्षभर शिक्षण आणि खेळ यांच्यावर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण विकास देण्यासाठी आणि विविध क्रीडा मालमत्तांमध्ये सुविधा, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा आणि उपकरणे देऊन क्रीडा वातावरणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मुंबई इंडियन्स आपल्या ईएसएच्या माध्यमातून शिक्षणाला पाठिंबा देतात आणि वंचित तसेच दिव्यांग मुलांमध्ये खेळाला प्रोत्साहन देतात.

ईएसएच्या माध्यमातून रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्ट्स खेळाच्या पायाभूत सुविधा सुधारत आहे, प्रशिक्षकांचे सक्षमीकरण करत आहे, साधनसुविधा पुरवत आहे आणि सुयोग्य खेळाडूंना अनुदानही देत आहे.

रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स ईएसएच्या माध्यमातून पूर्णवेळ निवासी फुटबॉल शिष्यवृत्ती देते, शिक्षण, प्रशिक्षण, विकास आणि आंतरराष्ट्रीय संधी यांच्यावर भर देते.

रिलायन्स फाऊंडेशन ज्युनियर एनबीए ईएसएच्या माध्यातून संपूर्ण भारतभरात शालेय बास्केटबॉल उपक्रमांना मदत देते. त्यासाठी ते प्रशिक्षकांचे सक्षमीकरण करण्यावर भर देतात आणि दर्जेदार उपकरणेही देतात.

 1. आरंभ - नवी मुंबईत राहणाऱ्या स्थलांतरित मजुरांसोबत काम करते. ते या सीमांत समुदायांसाठी शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात काम करतात. स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शाळेत प्रवेश मिळेल आणि दर्जेदार शिक्षण मिळेल याचीही काळजी घेतात.
 2. असीमा - सीमांत समुदायाताली मुलांना उच्च दर्जाचे आणि मूल्याधारित शिक्षण देण्यासाठी काम करते. मागील १७ वर्षांच्या कालावधीत या स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील झोपडपट्टी समुदायांमध्ये राहणाऱ्या मुलांसोबत तसेच इगतपुरीमधील दुर्गम आदिवासी समुदायासोबत काम केले आहे.
 3. मेलजोल - समाजात योगदान देण्याच्या आवश्यक त्या संधींसह मुलांना सामाजिक आणि आर्थिक शिक्षण देण्याच्या माध्यमाचा वापर करते. मेलजोल देशभरातील महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि आदिवासी शाळांपर्यंत पोहोचते.
 4. मुंबई मोबाइल क्रेचेस - मुंबईतील बांधकाम स्थानांवरील मुलांसोबत काम करते. त्यांना एक सुरक्षित, आनंदी आणि सुदृढ बालपण मिळेल याची काळजी घेते. ते मुलांना दर्जेदार शिक्षण, पोषक आहार आणि एक उज्ज्वल भवितव्यासाठी पाया निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 5. मुलींच्या शिक्षणासाठी सखी - सखीचे ध्येय समुदाय पातळीवर दर्जेदार अध्ययन सुविधा निर्माण करण्याचे आहे जेणेकरून मुंबईच्या झोपडपट्टीतील प्रत्येक मुलीला आपले शिक्षण आत्मविश्वासाने सुरू ठेवण्याची संधी मिळेल. सखी समुदायावर आधारित शाळेनंतरच्या उपक्रमांद्वारे झोपडपट्टीतील इतर मुलींसाठी मूलभूत शैक्षणिक क्षमता उभारत आहे.
 6. उम्मीद - विकासात्मक अपंगत्वासह जन्मलेल्या किंवा अपंगत्वाचा जास्त धोका असलेल्या मुलांमधील क्षमता जास्तीत जास्त वाढीस लावून समाजाच्या प्रमुख धारेत त्यांचा समावेस करण्यासाठी काम करते. ही स्वयंसेवी संस्था या मुलांना तसेच त्यांच्या कुटुंबांना या मुलांचा विकास होईल, शिकता येईल आणि त्यांचे आयुष्य सर्वोत्तम पद्धतीने जगता येईल यासाठी मदत करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती विकसित करते आणि वापरते.
 7. मिलान - मिलानचे ध्येय मुलांना तसेच तरूणांना शिकवणे, सक्षम आणि सबल करणे यांच्यासाठी सर्वसमावेशक क्षेत्रे तयार करण्याचे आहे जेणेकरून त्यांना आपल्या क्षमता जास्तीत जास्त वापरता येतील आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यात तसेच ज्या समाजातून ते येत आहेत त्यात बदलाचे कारक म्हणून सज्ज होता येईल. मिलान मुलांसोबत आणि विशेषतः कमी उत्पन्न गटातील किशोरवयीन मुलींसाठी शैक्षणिक आणि नेतृत्व उभारणी उपक्रम चालवते. त्यांच्यासाठी संधींचे समान जग निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
 8. वन बिलियन लिटरेट फाऊंडेशन - वन बिलियन लिटरेट फाऊंडेशन (ओबीएलएफ) ही संस्था ग्रामीण भागांमधील मुलांना इंग्लिश तसेच तंत्रज्ञानाची मूलतत्वे एका धमाल आणि एक्टिव्हिटीवर आधारित अभ्यासक्रमाद्वारे शिकवून शिक्षणात समानता आणण्याचा प्रयत्न करते. ओबीएलएफ वरील कौशल्ये शिकवण्यासाठी ग्रामीण महिलांना प्रशिक्षित करते आणि रोजगार देते आणि त्याद्वारे त्यांचे सक्षमीकरण करून त्यांना वित्तीय आणि बौद्धिक स्वातंत्र्य देते.
 9. दीपालय - दीपालय ही संस्था ग्रामीण आणि शहरी गरीबांना बाधित करणाऱ्या समस्यांवर काम करते आणि त्यांचे विशेष लक्ष्य महिला आणि मुलांचे आहे. दीपालयासाठी हस्तक्षेपाची क्षेत्रे शिक्षण, अपंगत्व, आरोग्य, संस्थात्मक सेवा आणि महिला सक्षमीकरण ही आहेत.
 10. स्लम सॉसर - स्लम सॉसर ही फिफा पुरस्कृत संस्था आहे. ती वंचित मुले आणि तरूणांचे आयुष्य बदलण्यासाठी फुटबॉलच्या शक्तीचा वापर करते. विशेषरित्या तयार केलेल्या अभ्यासक्रम आणि उपक्रमांद्वारे स्लम सॉसर सहभागींसोबत काम करून त्यांना एकत्र आणते आणि अध्ययन आणि फिटनेस यांच्यासाठी प्रयत्न करते.
 11. युवा - युवा इंडिया ही संस्था झारखंडमध्ये सांघिक खेळ (फुटबॉल) आणि शिक्षण यांच्यामार्फत मुलींना सक्षमीकृत करण्यासाठी कार्यरत आहे. युवाचे ध्येय मुलींना आपल्या स्वतःच्या भविष्याचा ताबा घेण्यासाठी सक्षमीकृत करण्याचे आणि बालविवाह तसेच मानवी तस्करी यांच्यासारख्या सामाजिक समस्यांना प्रतिबंध करण्याचे आहे.
 12. कम्युनिटी लायब्ररी प्रोजेक्ट - कम्युनिटी लायब्ररी प्रोजेक्ट (टीसीएलपी)चा विश्वास आहे की सर्व लोकांना पुस्तकांपर्यंत पोहोचता आले पाहिजे. टीसीएलपी पुस्तकांपर्यंत पोहोच देणारा अभ्यासक्रम आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचा विकास करते जेणेकरून पहिल्या पिढीतील वाचकांना तसेच नागरी गरीबांना वाचन आणि चिंतन करणे शक्य होईल.
 13. ऑस्कर फाऊंडेशन - ऑस्कर फाऊंडेशन फुटबॉलच्या माध्यमातून वंचित मुलांमध्ये आणि तरूणांमध्ये शिक्षणाचे महत्त्व रूजवते आणि त्यांना जीवनकौशल्यांसह सक्षमीकृत करते जेणेकरून त्यांना आपल्या समाजाच्या विकासाची जबाबदारी घेणे शक्य होईल.
 14. लीप फॉरवर्डः - लीप फॉर वर्ड ही संस्था फक्त एका कार्यासाठी वचनबद्ध आहे- भारतातील वंचित समाजातील मुलांमध्ये इंग्लिश भाषेची कौशल्ये विकसित करणे. लीपफॉरवर्ड ही संस्था प्रादेशिक भाषिक वातावरणासाठी सोप्या इंग्लिश शिकण्याच्या उपाययोजना तयार करते आणि या उपाययोजना स्थानिक शिक्षकांद्वारे शिकवण्याची व्यवस्था करते. त्यासाठी शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देते आणि त्यांना आपल्या समुदायांसाठी इंग्लिश क्लासेस सुरू करण्यासाठी मदत करते.