वानखेडे स्टेडियम- मुंबई इंडियन्सचे घर
(इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड)

१९७५ साली भारत- वेस्ट इंडिज कसोटी सामन्यासाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बांधलेले आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावे बांधलेले वानखेडे स्टेडियम हे सध्या मुंबई इंडियन्सचे घर आहे. या स्टेडियममध्ये सध्या ३३,००० प्रेक्षकांची बैठक क्षमता असून २०११ आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप फायनलसारखे अनेक महत्त्वाचे सामने येथे खेळले गेले आहेत. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सनी पराभव केला होता.

हे स्टेडियम अनेक गौरवशाली विक्रमांचे साक्षीदार आहे. रवी शास्त्री यांनी १९८५ साली एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार फटकावून सर गॅरी सोबर्सच्या विक्रमाची बरोबरी केली. मास्टर ब्लास्टरने २०११ साली आपला २०० वा कसोटी सामना याच मैदानावर खेळला. याच मैदानावर इतरही विक्रम केले गेले. सुनील गावस्कर यांनी सर्वाधिक धावा काढल्या (११२२ धावा) आणि त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकरने (४५५ धावा.) वेंकटेश प्रसाद याने याच स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या (१५ विकेट्स) आणि त्यापाठोपाठ अनिल कुंबळेने (१२ विकेट्स) घेतल्या आणि हरभजन सिंग याने (९ विकेट्स) घेतल्या. आता ही मुंबई इंडियन्सची घरची खेळपट्टी असून नजीकच्या भविष्यात आणखी अनेक इतिहास याच स्टेडियमवर कोरले जातील यात शंका नाही.

२०१० साली वानखेडे स्टेडियमची दुरूस्ती करण्यात आली. २०११ सालच्या आयसीसी वर्ल्ड कपसाठी समूह सामने आणि अंतिम सामन्यांसाठी हे स्टेडियम आयोजक असल्याने आधुनिक सुविधा आणि प्रेक्षकांसाठीच्या सुविधांनी हे स्टेडियम सज्ज करण्यात आले.

स्टेडियमची दोन प्रवेशद्वारे आहेतः गरवारे पॅविलियन प्रवेशद्वार आणि टाटा प्रवेशद्वार. त्याचबरोबर इथे अनेक स्टँड्स आहेत. जसे सुनील गावस्कर स्टँड, नॉर्थ स्टँड, विजय मर्चंट स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, एमसीए स्टँड, विठ्ठल दिवेचा स्टँड, गरवारे स्टँड आणि ग्रँड स्टँड

पत्ताः क्षमता उंची उद्घाटन मालक वास्तुरचनाकार
डी रोड, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र ४०००२०, भारत ३३१०८ २९ मीटर २३ जानेवारी १९७५ मुंबई क्रिकेट असोसिएशन शशी प्रभू