MIvUPW रिपोर्ट: ग्रेस हॅरिसच्या अष्टपैलू खेळामुळे केर-वाँगच्या लढाईनंतरही आपली हार

यूपी वॉरियर्झनी २१ चेंडू शिल्लक असताना मुंबई इंडियन्सच्या १६१ धावांचा यशस्वी पाठलाग पूर्ण केला तेव्हा धावफलक पाहिला तर तुमच्या लक्षात येईल हा एकतर्फी खेळ होता. पण तुम्हाला यातून आपल्या मुलींनी कशा प्रकारे लढा दिला हे कळणार नाही. हरमनप्रीत आणि शबनीम ईस्माइल छोट्याश्या दुखापतींमुळे सामन्यातून बाहेर राहिल्या आणि आपल्या मुलींनी जो लढा दिला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.