अपयश पचवणे कठीण आहे. परंतु आम्हाला लढत राहावे लागेलः महेला जयवर्धने
एका अत्यंत रोमांचक सामन्यात आम्ही शेवटच्या चेंडूवर सीएसकेविरूद्ध हरलो. एमएस धोनीने आमच्या विरोधकांना १५६ धावांचा पाठलाग करताना विजय प्राप्त करून दिला.
टीमने अत्यंत अटीतटीने सामना केला आणि प्रमुख मार्गदर्शक महेला जयवर्धने यांना संघाला फक्त इच्छाशक्तीची गरज आहे असे वाटते.
“हार पचवणे कठीण आहे. मुलांनी खूप चांगला सामना केला. आम्हाला फक्त तगड्या इच्छाशक्तीची गरज आहे. आज आम्ही पहिल्या सहा ओव्हर्समध्ये खूप लढावे लागले कारण विकेट कठीण होती. गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. त्यांनी योजनेप्रमाणे काम केले. परंतु अंतिमतः एमएसच्या अनुभवामुळे त्यांच्यासाठी विजय मिळवणे शक्य झाले,” असे महेला यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
“आम्हाला छोट्या मार्जिन्समधून बाहेर पडून लढत राहावे लागणार आहे. आम्ही टीमला हाच संदेश देत आहोत.”
आज रायले मेरेडिथ आणि हृतिक शौकीन या दोन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली, डॅनियल सॅम्सने ४-३० सोबत चांगले पुनरागमन केले. त्यामुळे महेला यांनी टीमची रचना अनेक घटकांवर अवलंबून असते असे सांगितले.
“आम्ही आमच्या टीमची निवड वेगवेगळ्या गोष्टी तसेच विरोधी स्पर्धक या गोष्टींचा विचार करून करतो. आमच्याकडे तरूण खेळाडू आहेत. त्यांनाही आम्ही संधी देतोय. माझ्या मते हृतिकने आज चांगली गोलंदाजी केली. आम्ही या संधींची निर्मिती काहीतरी नवीन घडते का हे पाहण्यासाठी करतो आणि समूहालाही पुढे नेत राहणे महत्त्वाचे आहे,” महेला म्हणाले.
मुख्य मार्गदर्शकांनी ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज मेरेडिथबद्दलही चर्चा केली.त्याने आपल्या चार ओव्हर्समध्ये २५ धावा देऊन एक विकेट घेतली.
“रायलीचे सुरूवातीला स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे त्याने हळूहळू काम केले. त्याला खेळण्यापूर्वी अनेकदा गोलंदाजीचा सराव करावा लागला. तो मागील सामना खेळू शकला असता परंतु आम्हाला सातत्यपूर्णता राखायची होती. त्याच्याकडे आत्मविश्वास होता. मी त्याच्या गोलंदाजीमुळे खूप खूश आहे. त्याने आज आपल्या खेळातील बदलांचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला,” महेला म्हणाले.
आपले मुख्य खेळाडू सध्या जात असलेल्या वाईट काळातून लवकरच बाहेर येतील असे मुख्य मार्गदर्शकांना वाटत होते.
“चढउतार होतच असतात. ईशानने पहिल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. रोने चांगली सुरूवात केली परंतु त्याला पुढे चांगला खेळ करता आला नाही. तुम्ही खूप लवकर आऊट होता तेव्हा तुम्हाला काहीही चांगले वाटत नाही. त्यांनी चांगली फलंदाजी केली नसती तर मला काळजी वाटली असती. परंतु ते चांगले खेळलेत. आम्हाला त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी टाटा आयपीएलमध्ये खूप चांगला खेळ केलाय आण ते नक्कीच चांगली कामगिरी करतील,” ते शेवटी म्हणाले.
हा सामना अंतिमतः दुर्दैवीरित्या हरलो आहोत. परंतु टीमने खूप चांगल्या प्रकारे लढा दिला. त्यांनी उत्तम कामगिरी केली. हीच कामगिरी २४ एप्रिल रोजी वानखेडेवर एलएसजीविरूद्ध पाहायला मिळेल अशी आशा आहे.