आशिया कप २०२२- भारताला श्रीलंकेविरूद्ध जोरदार पुनरागमनाची आशा

भारतीय क्रिकेट संघ मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आगामी आशिया कप २०२२ सामन्यात श्रीलंकेचा सामना करत असताना सुपर फोर राऊंडमधला पहिला विजय प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहे.

भारताने पहिल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानविरूद्ध पाच विकेटने पराभव पत्करला आहे. या पराभवाचा वचपा काढून आशिया कप २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरूद्ध चांगला खेळ करावा लागेल.

त्याचवेळी श्रीलंकेला थोडीशी उत्सुकता आहे कारण त्यांनी अफगाणिस्तानवर पाच चेंडू शिल्लक ठेवून चार विकेटने विजय मिळवला आणि आपले सुपर फोरचे खाते उघडले.

भारतासाठी जिंकू किंवा मरू या संभाव्य परिस्थितीतील सामन्याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

आशिया कपमध्ये भारत विरूद्ध श्रीलंकेची बरोबरी

भारत आणि श्रीलंकेने आशिया कपमध्ये एकमेकांचा २० वेळा सामना केला आहे आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी १० सामने जिंकले आहेत.

आशिया कपचा भारत आणि श्रीलंकेमधील शेवटचा सामना २०१६ मध्ये झाला. त्यात भारतीय संघाने पाच विकेटनी विजय प्राप्त केला. विराट कोहलीच्या नाबाद ५६ धावांनी भारताला चार चेंडू शिल्लक असताना १४२/५ अशी कामगिरी करून १३९ धावांचा पाठलाग करणे शक्य झाले.

एकूणच टी२०आय सामन्यांबद्दल सांगायचे झाल्यास भारताने श्रीलंकेविरूद्ध खेळलेल्या २५ सामन्यांपैकी १७ सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे. त्यांच्या मागील पाच सामन्यांमध्ये त्यांनी तीन वेळा सलग विजय मिळवला आहे.

त्यामुळे रोहित शर्माचा भारतीय संघ मंगळवारी श्रीलंकेला हरवण्यासाठी सज्ज असेल.

या खेळाडूंवर असेल लक्ष

पाकिस्तानविरूद्ध ४४ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी वाया गेली असली तरी विराट कोहलीने आशिया कप २०२२ मध्ये सलग दुसरे अर्धशतक फटकावले आहे. त्यामुळे तीन इनिंग्समध्ये त्याची धावसंख्या १५४ वर गेली आहे. कोहलीचा लंकन लायन्सविरूद्ध उत्तम रेकॉर्ड होता (सात सामन्यांमध्ये ८४.७५ च्या सरासरीने ३३९ धावा) आणि भारताला पुन्हा एकदा उत्तम धावसंख्या करून विजयासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.

दरम्यान रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या सलामीच्या जोडीकडून त्यांची भागीदारी पाकिस्तानविरूद्ध त्यांनी जो फॉर्म दाखवला होता त्यापासून पुढे जाईल अशी आशा आहे. त्यांनी आधीच्या सामन्यात ३१ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. त्यामुळे रोहित- केएलच्या जोडीने टी२०आय स्वरूपात १४ वेळा अर्धशतकी भागीदारी केली. मंगळवारी भारताला एक चांगली सुरूवात करून देतील अशी आशा आहे.

श्रीलंकेबाबत सांगायचे झाल्यास वनिंदू हसरंगा हा प्रमुख खेळाडू ठरेल. या अष्टपैलू खेळाडूने भारतासोबतच्या सहा सामन्यांमध्ये ४५ धावा आणि १० विकेट्स घेतल्या आहेत. परंतु मागील काही वर्षांतील त्याचा टी२० क्रिकेटमधील त्याचा प्रभाव त्याला एक धोकादायक खेळाडू म्हणून सिद्ध करतो.

दोन्ही संघांची काट्याची लढाई होणार आहे. भारत श्रीलंकेविरूद्ध आशिया कप २०२२ सुपर ४ हा जिंकलाच पाहिजे अशा स्थितीतील सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी खेळेल. हा सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल (भारतीय प्रमाणवेळ.)

चला पलटन, आपल्या लाडक्या संघाचा उत्साह वाढवूया!