आशिया कप २०२५, INDvUAE: अप्रतिम. क्लिनिकल. भारत विजयी वारूवर स्वार
अरे किती पटकन झालं ना हे! 🔥
आपल्या चॅम्पियन्ससाठी ही विक्रमी संध्याकाळ होती. भारतीय संघाने यूएईला नऊ विकेट्सनी पराभूत केले आणि सर्वाधिक चेंडू शिल्लक असतानाच्या टी२०आय विजयात सर्वांत मोठा विक्रम नोंदवला.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला खेळ गुंडाळण्याची घाई झाल्यासारखे वाटत होते. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला फक्त ५७ धावा फलकावर असताना गुंडाळून टाकले. त्यानंतर आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी काहीच मिनिटांचा अवधी होता.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर काय झाले ते पाहूया:
यूएईचा संघ २६/१ वरून सर्व बाद ५७ वर गेला
किती सुंदर, किती मस्त, अक्षरशः वॉव बॉलिंग! 🤯
आलिशान शराफू (२२) आणि मुहम्मद वसीम (१९) वगळता एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. बूम बूम बुमराहने विकेट्स काढायला सुरूवात केल्यानंतर कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांनी आपापसात सात विकेट्स वाटून घेतल्या आणि यूएईच्या मधल्या फळीला गारद केले.
निकाल? नाद करता का ?
सलामी फलंदाज अभिषेक शर्माने धावांचा पाठलाग करताना पहिल्चा दोन चेंडूंवर एक षट्कार आणि एक चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. 😎
त्यानंतर टीम इंडियाने पॉवर प्लेमध्येच खेळ संपवला. पण सूर्यादादाने मात्र चौथ्या ओव्हरमध्ये जुनैद सिद्दिकीच्या चेंडूवर फाइन लेगवर एक षट्कार ठोकून मज्जा केली.
याला म्हणतात एक नंबर सुरूवात. 🤙 उर्वरित स्पर्धेतही हाच वेग कायम ठेवूया! 🧿
**********
थोडक्यात धावसंख्या: यूएई ५७/१० (आलिशान शराफू २२, कुलदीप यादव ४/७) भारताकडून नऊ विकेट्सनी पराभूत ६०/१ (अभिषेक शर्मा ३०, जुनैद सिद्दिकी १/१६).