आशिया कप २०२५: इंडियाया, इंडिया!! स्कायची टीम आपल्या चषकाचे रक्षण करायला सज्ज

स्टेज तयार आहे, व्हाइब्स एक नंबर आहेत आणि आपण सगळे यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ च्या प्रतीक्षेत आहोत. टीम इंडिया चॅम्पियन्स म्हणून या स्पर्धेत पदार्पण तर करचे आहेच पण त्याचबरोबर सर्वाधिक विजयी टीम म्हणून सहभागी होणार आहे. टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये दणदणीत कामगिरी करून त्यांनी मागच्या २० टी२०आयमधले १७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया उत्साहाने फुरफुरत आहे. 🔥

हे #OneFamily साठी आणखी खास का आहे? आपले चार स्टार्स चांगलेच मुरलेले आहेत. 👉 कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह. ब्लू अँड गोल्ड सामने कधी सुरू होतात याची प्रतीक्षा करत आहेत

Surya दादा returns from injury आणि हे फार महत्त्वाचे आहे. आपल्याला ३६० डिग्री फुल ऑन राडा आणि कधीही न पाहिलेले शॉट्स पाहायला मिळतील. तो मैदानात उतरेल तेव्हा तेव्हा फटाके फुटतील एवढे नक्की.

आणि मग आहे आपला हार्दिक दादा. आपला अद्वितीय खेळाडू. बॅट आणि बॉलने सामने परतवण्यासाठी तो तयार आहे. त्याचा अनुभव विचारात घेतला तर प्रत्येक प्रतिस्पर्धीसाठी तो एक खतराच ठरेल.

…आणि आपला बूम बूम बुमराह? तो भारताचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज तर आहेच पण फलंदाजांसाठी एक कर्दनकाळ आहे. यॉर्कर्स, संथ चेंडू, त्याचे चेंडू कोणालाही टोलवता येणार नाहीत कारण तो एक फुल पॅकेज आहे. आपल्या टीव्ही शोवरही लक्ष ठेवूया. कारण तो आपल्या सर्वांसाठी आशिया कप एक अविस्मरणीय आठवण बनवेल. 🌟

हेही वाचा ➡️ MI stars at Asia Cup: Blast from the past

हा आशिया कप फक्त मुकुट वाचवण्यासाठी नाही; तर २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी एक मानक आहे. पलटनसाठी हा कप धावा, विकेट्स आणि ड्रामाचा उत्सव असणार आहे. खेळाडूंसाठी स्पर्धेत त्यांचे वर्चस्व वाढवण्याचा आणखी एक प्रयत्न आहे.

तयारी राहा, कारण टीम इंडिया फक्त सहभागी होण्यासाठी नाही, तर वर्चस्व गाजवण्यासाठी उतरलीय!!!

आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या यशस्वी मोहिमा

वर्ष

प्रकार

विजेता

१९८४

ओडीआय

भारत

१९८६

ओडीआय

श्रीलंका

१९८८

ओडीआय

भारत

१९९०-९१

ओडीआय

भारत

१९९५

ओडीआय

भारत

१९९७

ओडीआय

श्रीलंका

२०००

ओडीआय

पाकिस्तान

२००४

ओडीआय

श्रीलंका

२००८

ओडीआय

श्रीलंका

२०१०

ओडीआय

भारत

२०१२

ओडीआय

पाकिस्तान

२०१४

ओडीआय

श्रीलंका

२०१६

टी२०आय

भारत

२०१८

ओडीआय

भारत

२०२२

टी२०आय

श्रीलंका

२०२३

ओडीआय

भारत