AUSvIND, तिसरा ओडीआय: डोळे भरून पावले!!! रो-कोचा मास्टर क्लास आणि भारताचा विजय

पहिल्या फळीत रोहित आणि विराट म्हणजे वीकेंडचा मूड जबरदस्त! 😎

तीन सामन्यांच्या ओडीआय मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने व्हाइटवॉश टाळून अंतिम सामना नऊ विकेट्सनी खिशात टाकला.

प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी आल्यानंतर आपल्या जलदगती आणि स्पिनर्स गोलंदाजांनी प्रत्येकी सहा आणि चार विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला २३६/१० वर थांबवले.

त्यानंतर टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग ३९ ओव्हर्समध्ये केला. क्रिकेट जगातल्या सर्वाधिक धोकादायक खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे हे शक्य झाले. 💥

ख्यातनाम सिडनी क्रिकेट मैदानावर सामना कसा झाला ते पाहूया.

ऑसीजची फलंदादी- आहाहापासून अरेरेपर्यंत

मार्श हेड यांच्या सलामी जोडीने प्रत्येक चेंडूवर साधारण एक धाव काढली आणि नंतर हेड पॉवरप्लेमधल्या शेवटच्या ओव्हरमध्ये मो. सिराजच्या चेंडूवर बाद झाला. १० ओव्हर्स संपल्या तेव्हा धावफलक ६३/१ वर होता.

दरम्यान प्रत्येक फलंदाजाने स्थिरावायला थोडा वेळ घेतला. परंतु त्यांची गाडी वेग पकडण्यापूर्वीच आपल्या गोलंदाजांनी तिला गॅरेजमध्ये पाठवून दिले.

हर्षित राणाच्या ४/३९ कामगिरीसह भारतीय गोलंदाजांनी इनिंग्समध्ये वेळोवेळी विकेट्स घेऊन धावा कमी होतील याची काळजी घेतली.

टीम इंडियाच्या स्टाइलमध्ये परिस्थिती पुन्हा ताब्यात

यजमान संघ ३४ व्या ओव्हरमध्ये १८३/३ वर होता. ते ३०० पेक्षा जास्त धावा करतील असे वाटत होते. परंतु हर्षित राणाच्या ४/३९ कामगिरीसह भारतीय गोलंदाजांनी त्यांना २३६ धावांवर सर्वबाद केले. प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला. 🤗

मॅट रेनशॉने सर्वाधिक धावा म्हणजे ५८ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या.

श्रेयस अय्यरचा इथे खास उल्लेख करणे गरजेचे आहे. त्याने एलेक्स कॅरीचा अप्रतिम कॅच घेऊन हर्षित राणाला आपली पहिली विकेट घ्यायला मदत केली.

रो-कोची सुसाट ट्रेन- चाहत्यांच्या आठवणींना उधाण

काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.

हिटमॅनचे एससीजीवरचे प्रेम या वेळी पुन्हा उफाळून आले. त्याने या ठिकाणी आठव्यांदा अर्धशतकी कामगिरी केली. दुसरीकडे विराटने आपल्याला ओजी चेस मास्टर का म्हटले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

रोने १२५ चेंडूंमध्ये १२१* धावा केल्या तर त्याच्या मित्राने नाबाद ७४ धावा करून आपल्याला सहजपणे नऊ विकेट्सनी विजय मिळवून दिला. या जोडीने १६८ धावांची भागीदारी करून प्रतिस्पर्धी संघाला अवाक् केले.

रोहितचे शतक? अगदी लोण्यासारखे मऊसूत

रोहित मित्रा. लै भारी कामगिरी! 💙 तुझी इनिंग अगदी कडक होती भावा.

त्याने सहा चौकार आणि एक षट्काराच्या मदतीने ६२ चेंडूंमध्ये अर्धशतक फटकावले आणि त्यानंतर त्याने पाच चौकार आणि एक षट्कार मारून ओडीआयमधले ३३वे तर सर्व स्वरूपांमधले ५० वे शतक पूर्ण केले.

आता त्याने भारतीय सलामी फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम केला असून (१५,७८७) विरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. 👏

आता या विजयासह भारतीय संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण असून २९ ऑक्टोबरपासून टी२०आय मालिका खेळेल.

**********

थोडक्यात धावसंख्या: ऑस्ट्रेलियाचा २३६/१० (मॅट रेनशॉ ५६; हर्षित राणा ४/३९) भारताकडून नऊ विकेट्सनी पराभव २३७/१ (रोहित शर्मा १२१*; जोश हेजलवूड १/२३).