AUSvIND, तिसरा टी२०आय: होबार्टमध्ये भारताचा विजय आणि मालिकेत १-१ ची बरोबरी

टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने यजमान संघ आक्रमक खेळत असतानाही वेळोवेळी विकेट्स घेऊन त्यांना १८६/६ वर रोखले.

भारताने होबार्टमध्ये अविस्मरणीय विजय कसा मिळवला ते पाहा:

अर्शदीप सिंगची विकेट्सने परिपूर्ण कामगिरी

११ च्या संघात सहभाग नोंदवताना अर्शदीप सिंगने जराही वेळ न घालवता ट्राविस हेड आणि जोश इंग्लिस यांना बाद करून भारताला महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या.

ऑस्ट्रेलिया आक्रमक फलंदाजी करत असतानाही भारतीय गोलंदाजांनी खूप प्रयत्नपूर्वक यजमान संघाला १८६/ ६ वर थांबवले, तेही परिस्थिती फलंदाजीसाठी उपयुक्त असतानाही.

वॉशिंग्टन सुंदरने अप्रतिम फलंदाजी केली

पाठलाग करताना भारतीय फलंदाजांचा हेतू एकदम स्पष्ट होता. त्यांनी धावा फटकावत ठेवल्या. परंतु वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ४९ धावांनी भारतीय संघाला होबार्टवर ५ विकेट्सनी विजय मिळवून मालिका १-१ अशी ठेवता आली.

भारतीय संघ आता ६ नोव्हेंबर रोजी पुढील सामन्यासाठी गोल्ड कोस्टला जाईल.

---------------

थोडक्यात धावसंख्या: ऑस्ट्रेलियाचा १८६/६ (टिम डेव्हिड ७४, अर्शदीप सिंग ३/३५) चा भारताकडून पाच विकेट्सनी पराभव. भारत १८८/५ (वॉशिंग्टन सुंदर ४९*, नॅथन एलिस ३/३६).