BANvIND कसोटीः पुजारा, कुलदीपमुळे भारताची १-० ने आघाडी
भविष्यातल्या स्टारचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक, जखमी योद्ध्याचे पुनरागमन आणि चेतेश्वर पुजाराची ‘पिक्चर अभी बाकी है’ ची वर्दी यांच्यामुळे भारत आणि बांग्लादेश यांच्यादरम्यान चट्टोग्राम येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये अनेक नाट्यमय घटना घडल्या.
भारतीय संघ आधीच्या पराभवामुळे दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांनी कसोटीमध्ये वर्चस्व गाजवून बांग्लादेशवर १८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
संपूर्ण कसोटीत पाहुण्या संघाने वर्चस्व गाजवल्यामुळे बांग्लादेशने दुसऱ्या इनिंगमध्ये तडाखेबाज खेळ केला. परंतु, त्यांच्या हातात फार काही शिल्लक राहिले नव्हते. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि भारतीय संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
अय्यर आणि पुजाराने केली सुटका
तैजुल इस्लामने भारताच्या पहिल्या फळीला पहिल्या दिवशी अप्रतिम खेळ करून घरी पाठवले. परंतु ऋषभ पंतने ४५ चेंडूंमध्ये ४६ धावा करून भारताला गती मिळवून दिली. त्यानंतर पुजारा आणि अय्यरने हा वेग कायम ठेवून भारतासाठी आवश्यक असलेली १४९ धावांची भागीदारी केली. परंतु पुजाराचे शतक थोडक्यात हुकले आणि ही भागीदारी संपुष्टात आली.
अश्विनचे अर्धशतकः कुलदीपचा अष्टपैलू खेळ
रवीचंद्रन अश्विनची अष्टपैलू कामगिरी लोकांनी फार काही लक्षात ठेवली नसली तरी त्याने या वेळी (११३ चेंडूंमध्ये ५८ धावा) संपूर्ण जगाला आपण समोरच्या परिस्थितीत काय करू शकतो हे दाखवले आणि बांग्लादेशी गोलंदाजांना पुरते आसाममना दाखवले. त्याने कुलदीप यादवसोबत ८८ धावांची भागीदारी केली (११४ चेंडूंमध्ये ४० धावा) आणि भारताला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला.
कुलदीपनेही आपली स्फोटक गोलंदाजी सुरू ठेवली. त्याने आपल्या पुनरागमनाच्या कसोटीमध्ये एकाच दिवसात ४० धावा आणि पाच विकेट्स घेतल्या. बांग्लादेशी संघ १५० धावांमध्ये सर्व बाद झाला. परंतु फॉलो ऑन कायम ठेवण्याचा पर्याय समोर असतानाही राहुलने दुसरी इनिंग खेळायचा निर्णय घेतला.
पुज्जीभाईचा टॉप गियरः शुभमनचे पहिले शतक
शुभमन गिलने तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला सावधगिरीने सुरूवात केली आणि मग जोरदार हल्ला चढवला. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत गब्बामध्ये त्याचे शतक चुकले. परंतु चट्टोग्राममध्ये त्याला ही संधी मिळाली.
त्याने आपले पहिले शतक पूर्ण केल्यानंतर पुजाराने जोरदार हल्ला चढवत स्पिनर्सना आपल्या बॅटचे पाणी चाखवले. पुज्जीभाई गोलंदाजांचा समाचार घेत असताना कोहलीसुद्धा गोलंदाजांची जोरदार धुलाई करत होता.
बॅटमॅन ऑफ दि इंडियन क्रिकेट (बरोबर ना?) ने आपले १९ वे कसोटी शतक पूर्ण करेपर्यंत खेळ थांबवण्यात आला नाही. कर्णधार राहुलने फलंदाजांना ड्रेसिंग रूममध्ये परत बोलवेपर्यंत बांग्लादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
झाकीर हसनकडून बांग्लादेशी प्रत्युत्तराचे नेतृत्व
भारतीय संघाला चौथ्या दिवशीच खेळ संपवायला आवडला असता. परंतु झाकीर हसन (२२४ चेंडूंमध्ये १०० धावा) आणि नझमुक होसेन शांतो (१५६ चेंडूंमध्ये ६७ धावा) यांनी बांग्लादेशचे तारू सावरले. झाकीरने आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले तर शांतोनेही अविश्रांत प्रयत्न केले.
भारतीय गोलंदाजांसमोर त्यांनी खूप सहजासहजी विकेट्स टाकल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत खेळ रंगतदार झाला.
रविवार सकाळ आणि सामना संपला
शेवटच्या दिवशी शकीब अल हसनने हल्ला करायचा प्रयत्न केला. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्याचा प्रभाव पडू न देता दुसरीकडे विकेट्स घेणे सुरूच ठेवले. त्यांनी आवश्यक असलेल्या विकेट्स घेत सामना अगदी स्टाइलमध्ये संपवला.
कुलदीपने शकीबला त्रिफळाचीत करून शकीबचा लांबणारा खेळ संपुष्टात आणला. पुढच्या १४ चेंडूंमध्ये बांग्लादेशचा संघ ३२४ धावांमध्ये सर्व बाद झाला होता. फेब्रुवारी २०२१ नंतरच्या पहिल्या कसोटी सामन्यात आठ विकेट्स घेतल्यामुळे या डावखुऱ्या गोलंदाजाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भारताने चांगले मार्जिन ठेवून विजय प्राप्त केला असल्यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळण्याची अंधुक आशा अजूनही आहे.
थोडक्यात धावसंख्या
भारत ४०४ सर्वबाद (चेतेश्वर पुजारा ९०, श्रेयस अय्यर ८६) आणि २५८/२ डाव घोषित (शुभमन गिल (११०, चेतेश्वर पुजारा १०२*) कडून बांग्लादेशचा पराभव- १५० धावांमध्ये सर्वबाद (कुलदीप यादव ५/४०, मोहम्मद सिराज ३/२०) आणि ३२४ सर्वबाद (झाकीर हसन १००, अक्झर पटेल ४/७७)