आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांसाठी एक महत्त्वाचा धोकाः जसप्रीत बुमराचे प्रभुत्व

जसप्रीत बुमराने ओव्हलवर इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ६/१९ ची आपल्या करियरमधली सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे भारताला १० विकेट्सनी दणदणीत विजय मिळता आला.

या कामगिरीमुळे आयसीसी ओडीआय गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये या २८ वर्षीय अहमदाबाच्या जलदगती खेळाडूचे स्थान सर्वोच्च झाले आहे. तसेच सर्व स्वरूपांमध्ये त्याची गोलंदाजी दिमाखदार झाली आहे.

बुमराची सहा विकेट्सची खेळी अनेक वर्ष स्मरणात राहील. तो इंग्लंडमध्ये सहा विकेट्स काढणारा पहिलावहिला भारतीय जलदगती खेळाडू ठरला आहे. त्याशिवाय त्याच्या कामगिरीमुळे त्याला भारताच्या पुरूषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा मान मिळाला आह.

जसप्रीत बुमराने गोलंदाजीची आकडेवारी सर्वोत्तम तर दिलीच पण त्याने इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय इनिंग्समध्ये सहा विकेट्स काढणाऱ्या आशिष नेहरा, श्रीसंत आणि कुलदीप यादव यांच्या फळीत स्थान मिळवले आहे.

जसप्रीत बुमराच्या ऐतिहासिक गोलंदाजीमध्ये ओव्हलवरील पिचच्या स्थितीचेही मोठे योगदान ठरले आहे.

“चेंडू स्विंग आणि सीम होत असातना व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ही संधी खूप चांगली असते कारण आपल्याला सामान्यतः मिळत असलेल्या पिचवर बचावात्मक खेळावे लागते,” बुमराने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

"मी पहिला चेंडू टाकला तेव्हाच मला थोडा स्विंग मिळाला आणि मी त्याचा फायदा उचलायचा ठरवले. चेंडू स्विंग होत नसतो तेव्हा मला लांबी थोडी मागे न्यावी लागते. बॉलच हलत असताना तुम्हाला फार प्रयत्न करावे लागत नाहीत. विकेट सपाट असते तेव्हा तुमची अचूकता पणाला लागते. परंतु चेंडू हलत असताना याचा त्रास होत नाही,” तो म्हणाला.

दुसऱ्या ओडीआयमध्ये बुमराने ४९ धावांमध्ये दोन विकेट्स घेतल्या. लॉर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताला १०० धावांनी पराभव पत्करावा लागला.

जसप्रीत बुमरा हा भारताच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये महान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने ७२ सामन्यांमध्ये ४.६३ च्या सरासरीने १२१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे आवडते प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आहेत. त्यांच्याविरूद्ध त्याने प्रत्येकी २२ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु लंकन लायन्सविरूद्ध या कामगिरीसाठी त्याला कमी सामने खेळावे लागले.

तो ५० ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी मोठा धोका आहे. त्याचबरोबर बुमरा हा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतही भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याने ५८ सामन्यांत ६९ विकेट्स घेतल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच या २८ वर्षीय खेळाडूने २० ओव्हर्सच्या विकेट्समध्ये ऑस्ट्रेलियासाठी स्वतःला एक संकट म्हणून उभे केले. त्याने ११ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या. टी२०आयमधले त्याचे सर्वाधिक वर्ष पदार्पणाचे म्हणजे २०१६ होते.

बुमराने २०१६ मध्ये २१ सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्याच प्रयत्नात ऑस्ट्रेलियालविरूद्ध (३/२३) अशी कामगिरी केली. मात्र झिम्बाब्वेला त्याने आपल्या चेंडूचे पाणी पाजले. या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि फक्त ११ धावा दिल्या.

टाटा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा भाग म्हणून जसप्रीत बुमरा हा स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने १२० सामन्यांमध्ये १४५ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. या वेळी त्याने कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध फक्त १० धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या.

आंद्रे रसेल, नितीश राणा आणि सुनिल नरिने हे तडाखेबाज फलंदाज त्याच्या गोलंदाजीचे बळी ठरले आहे. केकेआरविरूद्ध कोणत्याही गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी म्हणून त्याच्या (५/१०) या कामगिरीची नोंद झाली.

जसप्रीतने कसोटी क्रिकेटमध्येही भारतासाठी गोलंदाजीचा आनंद घेतला आहे. त्याने ३० सामन्यांमध्ये २.६९ च्या सरासरीने १२८ विकेट्स घेतल्या. २०१९ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरूद्ध लाल चेंडूने सर्वोत्तम कामगिरी केली.

त्याच्या २७ धावांसाठीच्या सहा विकेट्समुळे भारताला किंग्स्टनवर २५७ धावांनी विजय प्राप्त करता आला. सामन्याच्या आकडेवारीबद्दल सांगायचे झाल्यास बुमराच्या ९/८६ मुळे भारताला २०१८ मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवता आला.

कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराचा आवडता संघ कोणता आहे असे विचारले तर त्याचे उत्तर इंग्लंड आहे. त्याने १० सामन्यांमध्ये २.७३ च्या सरासरीने ४१ विकेट्स घेतल्या.

हा भारतीय जलदगती गोलंदाज सध्या २०२१-२३ च्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये गोलंदाजीत आघाडीवर आहे. त्याने १० सामन्यांमध्ये ४५ विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराने सर्व स्वरूपातील क्रिकेटमध्ये भारताचे १६० सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर ३१८ विकेट्स आहेत.

त्याच्या गोलंदाजीच्या स्वरूपाचा विचार करता त्याने पूर्ण लांबीचे चेंडू टाकण्याच प्रावीण्य मिळवले असल्याचे दिसते. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत या गोलंदाजाने पूर्ण लांबीचे चेंडू टाकून ६६.१२ टक्के विकेट्स घेतल्या, त्यातील १९.०१ टक्के चांगल्या लांबीने आणि १३.२२ टक्के विकेट्स यॉर्कर्सने घेतल्या आहेत.

कसोटी सामन्यांत बुमराच्या ५३.९१ टक्के विकेट्स पूर्ण लांबीच्या चेंडूतून आल्या आहेत तर ३३.५९ टक्के विकेट्स गुड लेंथने आणि ४.६९ विकेट्स यॉर्करने घेतल्या आहेत.

टी२०आय स्वरूपात या खेळाडूने ५७.९७ टक्के विकेट्स पूर्ण लांबीच्या चेंडूंनी, २०.२९ टक्के विकेट्स चांगल्या लांबीच्या चेंडूंनी आणि २०.२९ टक्के विकेट्स यॉर्करने घेतल्या आहेत. बुमराने प्रामुख्याने २० ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये यॉर्करद्वारे चांगले यश मिळवल्याचे दिसते.

समीक्षक त्याच्या अपारंपरिक गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारतात आणि आता भारताच्या सर्व स्वरूपातील सामन्यांमध्ये आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक होण्यापर्यंतचा प्रवास जसप्रीत बुमराने एक गोलंदाज म्हणून स्वतःला सुधारत राहा आणि खेळाचा आनंद घ्या, कौतुक आणि टीकेकडे दुर्लक्ष करा या मंत्रावरच केला आहे.