स्वप्न पाहण्यासाठी जन्म, चमकण्यासाठी नियती! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, कमलिनी! 🎉
प्रत्येक उगवत्या ताऱ्याचा एक प्रारंभ असतो. मोठी स्वप्ने अनेकदा छोट्या ठिकाणांहून सुरू होतात आणि पुढे जगातील सर्वात मोठ्या मंचावर झळकतात. क्रिकेटने आपल्या जी. कमलिनीला अशीच एक संधी दिली आणि तिने वयापेक्षा अधिक आत्मविश्वासाने प्रत्येक संधीचे सोनं केलं. जिद्द, चिकाटी आणि खेळावरील नितांत प्रेम यांच्या बळावर घडलेला हा प्रवास तिला क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरापर्यंत घेऊन गेला. ✨
तिने तामिळनाडूचे १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्या प्रतिभेची ठळक छाप पाडली. वयापेक्षा अधिक परिपक्वता, नैसर्गिक कौशल्य आणि अफाट क्षमता यांच्या जोरावर ती देशातील सर्वात आश्वासक युवा क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली. या कामगिरीमुळे तिच्यासाठी अनेक संधींची दारे खुली झाली. २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स कुटुंबाचा भाग बनणे हा तिच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरला. त्यानंतर त्याच वर्षी श्रीलंकेविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करत तिने विमेन इन ब्लू चे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च सन्मानही मिळवला. 💙
Keep dreaming. Keep shining. Keep believing. ✨
— Mumbai Indians (@mipaltan) July 20, 2026
Wishing you a very Happy Birthday, Kamalini! 💙 pic.twitter.com/UetKPF8hvb
तिच्या प्रवासातील सर्वात खास गोष्ट म्हणजे ही कहाणी अजून फक्त सुरुवातीलाच आहे. तिच्यासमोर अजून खूप मोठा प्रवास आहे. एकेकाळी जशी ती स्वतः मोठी स्वप्ने पाहत होती, तशीच आज ती असंख्य तरुण मुलींना स्वप्ने पाहण्याची आणि त्यांचा पाठलाग करण्याची प्रेरणा देत आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज होत असलेल्या कमलिनीला मुंबई इंडियन्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
आज तिच्या आयुष्यातील आणखी एका सुंदर वर्षाची सुरुवात होत असताना, संपूर्ण पलटनकडून आपल्या सुपरस्टारला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂 येणारे वर्ष आणखी मोठी स्वप्ने, अधिक उज्ज्वल क्षण आणि असंख्य अविस्मरणीय आठवणी घेऊन येवो. तुझ्या बॅटमधून आणखी भरपूर धावा आणि यष्टिमागे तुझे अप्रतिम ग्लोव्हवर्क पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत. अशीच चमकत राहा, प्रगती करत राहा आणि यशाची नवी शिखरे गाठत राहा! 🥳