इंग्लंड विरूद्ध भारत, पहिला एकदिवसीय सामना: ओव्हलवर भारताचा १० विकेट्सनी दणदणीत विजय

भारतीय क्रिकेट टीमने मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी ओव्हलवर इंग्लंडविरूद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० ने दणदणीत आघाडी घेतली.

भारतीय संघाने जसप्रीत बुमरा (६/१९) ची धमाकेदार गोलंदाजी आणि रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यामधील ११४ धावांच्या भागीदारीमुळे भारताला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला १० विकेट्सनी विजय मिळवून दिला.

भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि अर्शदीप सिंग हे दोघे पायाच्या आणि पोटाच्या दुखण्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाजूला ठेवले गेले.

दरम्यान यजमान इंग्लंडच्या संघाने मोईन अली या आघाडीच्या स्पिनरला खेळवण्याचा निर्णय घेतला.

जसप्रीत बुमराने दुसऱ्या ओव्हरमध्ये शून्य धावा देऊन जेसन रॉय आणि जो रूट यांना बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा स्कोअर ६/२ वर आला. बुमराची पहिली ओव्हर शून्य धाव एक विकेटची ठरली.

त्यानंतर मोहम्मद शामीने शून्यावरच धोकादायक बेन स्टोक्सला बाद केले. या डावखुऱ्या फलंदाजाने कमी टप्प्यावर पडलेला शामीचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू आतल्या बाजूला वळून सरळ ऋषभ पंतच्या उजव्या बाजूला गेला. त्याने कॅच पकडून ही महत्त्वाची विकेट घेतली.

इंग्लंडने या वेळी २०१८ पासून प्रथमच त्यांचे तिन्ही फलंदाज शून्यावर बाद होताना पाहिले आहेत. २०१८ मध्ये इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील टीम ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४/३ वर आली होती.

बुमराच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने जॉनी बेरस्टॉला बाद केल्यानंतर पाच वाइड चेंडू टाकले. बेरस्टॉने २०२१ मध्ये सहा सामन्यांत २९१ धावा काढल्या. परंतु त्याला २०२२ मधील पहिल्या ५० ओव्हर्सच्या सामन्यात फक्त सात धावा काढता आल्या. बुमराने कमी लांबीचा चेंडू टाकल्यावर तो कडेला लागला आणि पंतच्या हातात गेला.

जसप्रीत बुमराने आपल्या यॉर्कर लांबीच्या इनस्विंगरने लियाम लिव्हिंगस्टनला बाद केले. त्याने हा चेंडू फटकवायचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला अपयश आले.

यामुळे बुमराने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या १० ओव्हर्समध्ये चार विकेट्स घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. यापूर्वी ही कामगिरी जवगल श्रीनाथ (श्रीलंकेविरूद्ध २००३ मध्ये आणि भुवनेश्वर कुमार (श्रीलंकेविरूद्ध २०१३ मध्ये) केली होती.

इंग्लंडने आपला पॉवर प्लेचा टप्पा ३०/५ वर पार केला. भारतीय खेळाडू अत्यंत सहजपणे आघाडीवर राहू शकले.

अष्टपैलू खेळाडू मोइन अलीने जोस बटलरसोबत २७ धावांची भागीदारी केली. परंतु मोईनचा चुकलेला शॉट प्रसिद्ध कृष्णाने पकडला. त्यामुळे तो बाद झाला.

इंग्लंड १४ ओव्हर्समध्ये ५३/६ वर धडपडत असताना मोहम्मद शामी पुन्हा एकदा इंग्लिश फलंदाजांवर हल्ला करण्यासाठी आला. त्याने इंग्लिश कर्णधार जोस बटलर याला ३० धावांवर बाद केले. शामीच्या कमी लांबीच्या चेंडूला बटलरने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर फटकवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे सीमारेषेजवळ सूर्यकुमार यादवने अत्यंत सुंदर कॅच घेतली.

बटलरची विकेट घेतल्यामुळे मोहम्मद शामीच्या वन डे इंटरनॅशनलमध्ये १५० विकेट्स पूर्ण झाल्या. तो हा महत्त्वाचा टप्पा सर्वाधिक वेगाने गाठणारा भारतीय खेळाडू (८० सामने) ठरला आहे आणि त्याने अजित आगरकरच्या ९७ ओडीआयचा विक्रम मोडीत काढला.

इंग्लंडने १७ व्या ओव्हरमध्ये आपली आठवी विकेट घालवली. शामीने आपल्या खास उभ्या सीमद्वारे क्रेग ओव्हरटनला बाद केले. त्याचा चेंडू ओव्हरटनच्या बॅट आणि पॅडच्या मधून जाऊन स्टंपवर आदळला.

इंग्लंडचा संघ २१.४ ओव्हर्समध्ये १०० धावांवर पोहोचला. परंतु जसप्रीत बुमराने ताशी १४४ किमीच्या वेगाने चेंडू टाकला. तो ब्रायडन कार्सला टोलवता आला नाही आणि मधल्या स्टंपवर जाऊन आदळला.

इंग्लंडला २५.२ ओव्हर्समध्ये ११० धावा करता आल्या. डेव्हिड विलीच्या रूपात जसप्रीत बुमराने सामन्यातील आपली सहावी विकेट घेतली. त्याने करियरची सर्वोत्तम आकडेवारी ६/१९ वर पूर्ण केली.

भारतीय संघाला १११ धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सलामी जोडीदार या दोघांनी अत्यंत शांतपणे खेळ केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५००० धावा पूर्ण होण्यासाठी फक्त ६ धावांची गरज असताना ओडीआय सामना सुरू केला. सक्तीच्या पॉवरप्ले ओव्हर्समध्ये भारताला ५० धावा पूर्ण करणे शक्य झाले.

रोहितने १७ व्या ओव्हरमध्ये फाइन लेगवर जोरदार चेंडू टोलवून आपले ४५ वे अर्धशतक पूर्ण केले.

त्यानंतरच्या ओव्हरमध्ये रोहित-धवन यांनी एक दिवसीय क्रिकेटमध्ये आपली १८ व्या शतकाची भागीदारी पूर्ण केली. रोहित आणि विराट कोहली यांच्यादरम्यानच्या भागीदारीची ही बरोबरी ठरली. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी आपल्या ५० ओव्हर्सच्या क्रिकेट करियरमध्ये केलेल्या २६ पेक्षा अधिक शतकी भागीदारीनंतर ही जोडी तिसरी ठरली आहे.

भारताने १८.४ ओव्हर्समध्ये १११ धावांचा पाठलाग पूर्ण केला. शिखर धवनने ब्रायडन कार्सच्या चेंडूवर जोरदार चौकार मारला. त्यामुळे भारताला ओव्हलवर १० धावांनी दणदणीतय विजय मिळवता आला.

आकडेवारीचा विचार करता भारताने एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा १० विकेट्सनी पराभव करण्याची ही पहिली वेळ आहे.

रोहित शर्माच्या भारतीय संघाने आता तीन सामन्यांच्या ओडीआय मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. हा संघ आता गुरूवार दिनांक १४ जुलै रोजी ख्यातनाम लॉर्ड्स स्टेडियमवर दुसऱ्या ओडीआयसाठी इंग्लंडचा सामना करेल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल.