‘फॅन्स नाहीत तर फॅम आहेत’
मागच्या सुमारे दोन दशकांच्या कालावधीत मुंबई इंडियन्स ही फक्त क्रिकेट टीम राहिलेली नाही तर ती तिच्या चाहत्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलेली आहे. मुंबईतल्या लोकल ट्रेन्सपासून ते देशभरातील दिवाणखान्यांपर्यंत या टीमने अगदी लहानमोठे भावनिक आणि अविस्मरणीय क्षण जपलेले आहेत.
या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स आपल्या २०२६ मधल्या फॅन्स नाही तर फॅम या नवीन कॅम्पेनसोबत हे नाते जगासमोर आणणार आहे. ही जाहिरात एका साध्या परंतु शक्तिशाली सत्याने बांधलेली आहे. ते म्हणजे आमचे चाहते नाहीत तर कुटुंब आहे. हे कुटुंब आनंद साजरा करते, भांडते, काळजी करते आणि प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत टीमसोबत उभे राहते.
खऱ्या, रोजच्या नात्यांमध्ये रूजलेली जाहिरात
ही जाहिरात मोहीम 'फॅन्स नाही, फॅम' प्रत्यक्षात उतरवून एमआय खेळाडूंना कुठलेतरी लांबचे सेलिब्रिटी म्हणून नाही तर त्यांच्या कुटुंबाचा भाग असल्याचे दाखवते.
विविध छोट्या मोठ्या घटनांचा समावेश असलेली ही मालिका अत्यंत सुंदर आणि कोणत्याही प्रकारची भेसळ नसलेले नाते दाखवते. यात खेळाडू घरांमध्ये जातात. त्यांच्या रोजच्या आयुष्यातील रूटीन आणि उत्सव, धमाल आणि प्रामाणिकपणा यांनी परिपूर्ण असलेला संवाद साधतात. ही गोष्ट भावनिक नात्याची खोली दाखवते जिथे पलटन फक्त आनंद व्यक्त करत नाही तर त्यांच्या मनात ती रूतलेली आहे.
ही गोष्ट या सीझनमध्ये संपूर्ण मार्केटिंगचा भाग म्हणून दाखवली जाणार आहे. त्यातून चाहते नाहीत तर कुटुंब आहे ही ओळख पटवली जाईल आणि एक भावनिक बंध जोडला जाईल.
एमआयचे प्रवक्ते म्हणाले की, "मुंबई इंडियन्स फक्त शहराचे प्रतिनिधित्व करत नाही तर ती त्या शहराची टीम आहे. आम्ही दोन दशकांचा प्रवास पूर्ण करत असताना आम्हाला आमच्या चाहत्यांसोबत, पलटनसोबत असलेले निर्भेळ, प्रामाणिक आणि भावनिक नाते साजरे करायचे आहे. हा सीझन अशा कुटुंबाप्रति समर्पित आहे जे आम्ही जिंकलो की आनंदात असतात आणि हरलो तरी आमच्या पाठीशी असतात. ते आमचे चाहते नाहीत. आमचं कुटुंब आहे."