ब्लू अँड गोल्डमध्ये फ्रेंडशिप डे = आपली तर यारी अतरंगी आहे भावांनो!

पलटन, फ्रेंडशिप डे २०२५ आलाय आणि आपल्या #OneFamily मधली दोस्ती- यारी जपण्याची ही संधी आपण तर नक्कीच सोडणार नव्हतो! 🤟 

तुमची टीम फक्त काही व्यक्तींची नाही तर ते एक कुटुंब आहे. हे माहीत असल्यामुळे ही गोष्ट खूप खास आहे! 💙 ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांची टांग खेचणे असो किंवा विजयाचा आनंद लुटणे असो. मुंबई इंडियन्सची पोरं प्रत्येक नातं मनापासून निभवतात.

हा बंध खास आहे - धमाल, हाय फाइव्ह आणि मी तुझ्या पाठीशी आहे अशी खात्री. 🤝

…आणि हे फक्त खेळाडूंवर थांबत नाही! आपले प्रशिक्षक? ते तर मित्रमंडळ आहे! ते एकत्र राहतात, गाइड करतात आणि प्रत्येक बऱ्यावाईट प्रसंगात आपल्या टीमसोबत असतात. 💪

थोडक्यात सांगायचे तर आपल्या लाडक्या मित्रमंडळाची भावना खास आहे. खांद्याला खांदा लावून, काळजाचा ठाव घेऊन आपण जगतो.. मैदानात आणि मैदानाबाहेरही. बघायचंय का तुम्हाला …

फिफामध्ये पेनल्टीज खेळताना

**********

हा भाईचारा नाहीये तर काय आहे, सांगा बरं! 😎

**********

अरे तू येडा झाला की काय 😂

**********

दांडी गुल केल्यावर झालेला आनंद 😁

**********

त्रिदेव (की तीन तिघाडा, दुसऱ्या टीमचा काम बिगाडा?) 🤓

**********

जय-वीरू - तेरी जीत, मेरी जीत 🎶

**********

अरे ए, ट्रेन थांबल्यावर उतरशील की काय? 😏

**********

उत्तम ट्रेनिंग झाल्यानंतर फतकल मारून बसणे 🤙

********** 

पॉली आणि मल्लीची ही दोस्ती तुटायची नाय 🤜🤛

**********

बोरिंग लेक्चरमध्ये काड्या करताना बॅकबेंचर पोरं … 🫸🫷

 

**********

भारतीय आदरातिथ्याचा आनंद घेताना परदेसी लोक्स