सहाय्यक गोलंदाजापासून ते स्वप्नवत पहिल्या सामन्यापर्यंतः कार्तिकेयचा हा आठवडा

आठवड्याच्या सुरूवातीला कुमार कार्तिकेय सिंग आपले नेहमीचे आयुष्य जगत होता.

डावखुरा स्पिनर ज्याने मध्य प्रदेशासाठी २०१९ सालापासून नऊ टी २० सामने खेळले आहेत, तो संघाचा राखीव गोलंदाज होता. तो फलंदाजांना अचानक संधी येईल तेव्हा नेट्समध्ये मदत करत होता.

आमचा ऑल राऊंडर मोहम्मद अर्शद खान दुर्दैवाने दुखापतग्रस्त झाला आणि त्याला सीझनमधून बाहेर पडावे लागले. परंतु त्यामुळे कार्तिकेयसाठी आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी चालून आली.

या स्पिनरला अर्शदच्या जागेवर बदली म्हणून घेण्यात आले. त्याची प्रतिक्रिया बघता त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

“मला स्वप्नात असल्यासारखे वाटतेय. मी जर्सी घातली तेव्हा मी खूप वेळ आरशात बघत होतो. मी सर्वप्रथम माझ्या कोचना आणि त्यानंतर माझ्या आईवडिलांना कळवेन. त्यांची प्रतिक्रिया अमूल्य असेल. मी इथपर्यंतचा पल्ला गाठेन असे त्यांना वाटलेच नव्हते,” कार्तिकेयने आपल्या पहिल्या मुलाखतीत सांगितले. interview.

झांसी पोलिस दलात असलेले त्याचे वडील श्यामलाल सिंग यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

“मला कॉल आला आणि त्याने मला एमआय जर्सीमध्ये फोटो पाठवले तेव्हा मला खूप आनंद झाला. एका पोलिसाचा मुलगा टाटा आयपीएलमध्ये खेळणार असल्यामुळे मला खूप अभिमान वाटला. एखाद्या दिवशी तो भारतासाठी खेळेल तेव्हा माझा आनंद आकाशात मावणार नाही!,” त्यांनी माध्यमांना सांगितले.

प्रचंड मेहतन करणाऱ्या आणि परिस्थितीसमोर कधीही न झुकणाऱ्या या खेळाडूसाठी हे एका पुरस्कारापेक्षा कमी नव्हते.

उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूर येथे जन्मलेल्या कार्तिकेयने तिथे क्रिकेट खेळायला सुरूवात केली. परंतु त्याला खेळण्याच्या खूप काही सधी मिळाल्या नाहीत.

त्याला कुणीतरी दिल्लीला जायला सांगितले. तिथे त्याने प्रशिक्षक संजय भारद्वाज यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. परंतु त्याचे नशीब बदलले नाही. देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या संधीच्या शोधात त्याला मध्य प्रदेशात जाण्याचा सल्ला त्याच्या मार्गदर्शकांनी दिला.

इथे आल्यानंतर कार्तिकेयला संधी मिळाली. त्याने मध्यप्रदेशसाठी लिस्ट ए स्वरूपात पहिले देशांतर्गत क्रिकेट खेळले आणि त्याने १० ओव्हर्समध्ये 1/28 अशी कामगिरी केली.

त्यानंतर तो मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफी खेळला. अवघ्या तिसऱ्या सामन्यात त्याने 9/86 आकडेवारी गाठली. त्यात त्याने हिमाचल प्रदेशविरूद्धच्या सामन्यात 6/28 अशी कामगिरीही केली. त्यामुळे त्याच्या टीमला १४० धावांनी विजय मिळवता आला.

कार्तिकेयने २०१९ मध्ये सिक्कीमविरूद्ध टी२० चा पहिला सामना खेळला. त्याने चार ओव्हर्समध्ये 3/10 अशी कामगिरी केली आणि आपल्याकडे लक्ष वेधून घेतले.

एमपीसाठीच्या आपल्या नऊ टी२० सामन्यांमध्ये कार्तिकेयने ५.२९ या दराने १० विकेट्स घेतल्या आहेत आणि हे या स्वरूपासाठी अमूल्य योगदान आहे.

२८ एप्रिल रोजी एमआयच्या संघात अधिकृतरित्या घेण्यात आल्यानंतर या स्पिनरसाठी आणखी एक सरप्राइज होते.

३० एप्रिल रोजी कर्णधार रोहित शर्मा आपला वाढदिवस साजरा करत होता आणि उर्वरित संबंधितांनी कार्तिकेयला राजस्थान रॉयल्सविरूद्ध आपला टाटा आयपीएलचा पहिला सामना खेळण्याची संधी देण्याचे ठरवले.

त्याने या विश्वासाला आपण पात्र असल्याचे सिद्ध केले. त्याला नवव्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आणण्यात आल्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्याच बॉलवर विरोधी कर्णधार आणि धोकादायक संजू सॅम्सनला डीप पॉइंटवर बाद केले.

त्याने फक्त एकच विकेट घेतली असली तरी त्याच्या गोलंदाजीमधील वैविध्य हा त्याच्या कामगिरीचा एक महत्त्वाचा घटक होता.

कार्तिकेयने आपला नेहमीचा डावखुरा ऑफ स्पिन टाकला, त्याने आपल्या हाताच्या मागच्या बाजूने बॉल सोडत त्याला लांब फिरू दिले आणि बॉलला आपल्या बोटांमधून पुढे ढकलत तो घसरू दिला. त्यामुळे आरआरच्या फलंदाजांना त्याने सतत गोंधळात पाडले.

त्याने चार ओव्हरमध्ये 1/19 अशी देखणी कामगिरी केली आणि ड्रेसिंग रूम सामनावीर पुरस्कार जिंकला आणि त्याचबरोबर मुख्य मार्गदर्शक महेला जयवर्धने यांच्याकडून कौतुकाचे बोलही ऐकले.

आम्हाला खात्री आहे की त्याच्या आईवडिलांना आपल्या मुलाने स्टाइलमध्ये मोठ्या स्टेजवर आपल्या आगमनाची घोषणा केल्यामुळे खूप अभिमान वाटत असेल.