हॅपी स्काय डे: सूर्यकुमार यादवचा वाढदिवस साजरा करताना

देवाने सगळं काही दिलेलं आहे; 360° ऑरा आहे, पलटनचं प्रेम आहे, सन्मान आहे…” 😎

वाढदिवस प्रत्येकासाठीच खास असतो पण सूर्यादादाचा वाढदिवस येतो तेव्हा तो आणखीच खास असतो भावांनो. कारण स्काय म्हणजे साधासुधा क्रिकेटर नाही तर तो आपल्या लाडक्या #OneFamily च्या आँखों का तारा आहे. 💫

सूर्या चाहत्यांचा इतका लाडका का आहे? याचं उत्तर अगदी साधं आहे. अगदी त्याच्या नैसर्गिक साधेपणाच्या स्वभावगुणासारखंच. तणावाखाली तो शांत असतो, प्रतिस्पर्ध्यांना वाटतं की ते सुरक्षित आहेत तेव्हा तो स्फोटक ठरतो. कायम मैं हूं ना" असं सांगतो <IYKYK 😉> आणि गोलंदाजांना माझ्या उरात होतंय धकधक रं...” अशी भावना देतो.

सूर्या आपल्या मनात येईल तेव्हा कुठलाही सामना फिरवू शकतो. एका क्षणात तो बर्फासारखा शांत असतो तर दुसऱ्या क्षणात तो असे काही 360° शॉट्स उडवतो की गोलंदाजही डोकं खाजवत उभे राहतात. अरे बाबा, हा कुठून आला मैदानात खेळायला. याचं आता काय करू मी?!” 😂 हाच सूर्याचा तळपता अवतार आहे. अविश्वनसीय, मनोरंजक आणि ब्लॉकबस्टर.

हे झालं पिचवर. पिचच्या बाहेर? तिथे तर तो मुंबईचा छोकरा आहे! ✔️ प्रचंड खादाड, त्याला चीट मील म्हणून रस्त्यावरचं ट्रिपल शेजवान खायला आवडतं आणि एका हातात कटिंग चहा घेऊन स्वप्न रंगवणारा खरा मुंबईकर आहे तो. त्यामुळेच पलटनचा तो इतका लाडका आहे. तो आपलाच आहे यार!

…आणि त्याच्या ब्लू अँड गोल्डमधल्या आठवणी तर विचारूच नका. त्याच्या कपाटातल्या त्या दोन ट्रॉफी आणि कुठल्याही शहरात गेला तरी निस्ता राडा घालणारा त्याचा प्रवास ऐंशीच्या स्पीडने झकास चाललाय. त्याने टीमला दिलेलं प्रेम आणि त्याला मिळालेलं प्रेम म्हणजे अख्खी एमआयची गोष्ट आहे! 💙

आपला हा टोटल चिल पोरगा एका वेळी एक सुपला शॉट मारून मुंबईचा लाडका बनलाय. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा रे भावा. सूर्या असाच तळपत राहा! 🥳