हॅप्पी स्टारबॉय डे - आमच्या टीव्हीचा बर्थडे, आमच्यासाठी खास

१३ फेब्रुवारी २०२२, साधारण दुपारचे ३.१२ वाजता.

याच दिवशी फारश्या माहितीत नसलेल्या तिलक वर्माने #OneFamily मध्ये एंट्री मारली. 😎 तो दिवस आपल्याला नक्कीच आठवत असेल, नाही का?

मूळ किंमत १० लाख रूपये असताना एसआरएच आणि आरआर यांनी ती ५५ लाखांवर नेली. त्यानंतर एमआय आणि सीएसके मैदानात उतरले. त्यानंतर या संभाव्य सुपरस्टारला मिळवण्यासाठी अटीतटीची लढाई झाली.

आपल्या लाडक्या टीव्हीला १९ वर्षांचा असतानाच १.७० कोटी रूपयांत ब्लू अँड गोल्डमध्ये आणण्यात आले. तो इथे यशस्वी होणारच होता. तिलक चांगला खेळ करणारा आणखी एक खेळाडू नव्हता तर तो मुंबईचा श्वास ठरणार होता. 🔥

त्यानंतर आतापर्यंत आपला हा लाडका पोरगा स्टारबॉय झालाय. तो संयमी आहे, त्याच्यात ताकद आहे आणि उत्साह आहे. तो ज्या ज्या वेळी स्वतःला सैल सोडतो तेव्हा तेव्हा ती वादळापूर्वीची शांतता असते. तो तणावाखाली घाबरत नाही तर त्याचा खेळ फुलतो.

डावाची सुरुवात कठीण झाली, आपण हरत असलो तरी किंवा शेवटी तो खेळत असला तरी त्याची परिपक्वता त्याच्या वयापेक्षा खूप जास्त आहे. आकडे तेच सांगतात... पदार्पणापासून ५१ सामन्यांमध्ये त्याने ३७.४७ च्या सरासरीने १,४९९ धावा केल्या आहेत. त्याने स्वतःला सातत्यपूर्ण सिद्ध केले आहे. 🤘

पण त्याची काय खास गोष्ट आहे? एमआयच्या छत्राखाली त्याच्यातला नैसर्गिक स्पार्क ओळखून त्याचे रूपांतर प्रतिभावान खेळाडूत केले गेले आहे. तो एका तरुण प्रतिभावान खेळाडूपासून एक सामना जिंकणारा खेळाडू बनला आहे - एक असा खेळाडू जो त्याच्या क्लास फलंदाजीमुळे सामने बदलू शकतो.

…त्याचे आणि टीममधल्या खेळाडूंचे नाते कसे आहे हे काय सांगावे? अतूट. त्याच्याकडे मित्र मंडळ आहे. तो मारत असलेला प्रत्येक षट्कार, त्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य हे मुंबईचे काळीज आहे. 💙

तर आमच्या तिलक वर्माला, आमच्या स्टारबॉयला, आमच्या प्रतिष्ठेळा जबरदस्त वाढदिवसाच्या तूफानी शुभेच्छा. 🥳 खूप मजा कर भावा!