हॅप्पी बर्थ डे, मुंबईचा राजा!
रोहित शर्मा आमचा राजा,
षटकार टोलवतो लांबच लांब
मुंबईचा राजा फलंदाजीला उतरतो तेव्हा
मैदानात येते वादळ, गोलंदाज म्हणतात थांब थांब.
पुल शॉट्सपासून कव्हर ड्राइव्हपर्यंत,
तो पलटनला खूश करतो आणि मेजवानी देतो
त्याच्या ब्लू अँड गोल्डमधल्या ऐतिहासिक गोष्टी रोज ऐकतो.
तो बॅट उचलतो तेव्हा खरी जादू होते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रिय रो
तु आमचा अभिमान आहेस, तू आमचं काळीज! 💙
शालेय क्रिकेटमधून मोठा झालेला हा खेळाडू नंतर मुंबईचे प्रतिनिधित्व करू लागला. त्यानंतर टीम इंडियासाठी त्याने गौरव मिळवला. आपला लाडका रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक प्रिय फ्रँचायझीचे काळीज झाला. चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करतो तेव्हा एखादी कला उलगडल्यासारखे वाटते. त्या क्षणांमध्ये स्टेडियममधले फक्त त्याचे चाहतेच नाहीत तर संपूर्ण जग जल्लोष करते आणि त्याच्यासाठी प्रार्थना करते.
पुढील पिढीच्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर त्याने दिलेली कौतुकाची थाप ही आपल्याच पाठीवर दिली आहे असे पलटनला वाटते. आपला हिटमॅन फक्त क्रिकेटपटू नाही तर तो आमची भावना आहे. त्याचे खडूस कल्चर त्याच्या टीममधील खेळाडूंनाही आपलेसे वाटू लागले आहे. तो भणाणलेल्या वादळातला एक दीपस्तंभ आहे. ड्रेसिंग रूममधून बाहेर येऊन ब्लू अँड गोल्डध्ये वानखेडेवर खेळताना त्याचा अद्भुत ऑरा सर्वांनाच आपलासा वाटतो. एक खेळाडू म्हणून तो स्पॉटलाइटचा पाठलाग करत नाही तर तो स्वतः स्पॉटलाइट आहे.
आणखी एक वर्षाने मोठा होणाऱ्या रोला आनंद आणि भरभराटीसाठी खूप शुभेच्छा. हॅप्पी बर्थ डे मुंबईचा राजा!
तो फक्त क्रिकेट खेळत नाही तर त्याने एका युगाला आकार दिला आहे. वानखेडेवरच्या प्रत्येक गर्जनेत रोहित शर्माचे नाव गुंजणार आहे.