स्वभावाने निर्भीड, नावाप्रमाणेच अमर्याद! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, SKY

मुंबईच्या मैदानांपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या मंचापर्यंत,

आपल्या सूर्यकुमार यादवचा खास प्रवास लिहिला गेला एकेक पान उलगडत.

आणखी एक वर्ष, आणखी एक सुंदर अध्याय लिहिण्याची वेळ,

येणारं वर्ष तुझ्यासाठी घेऊन येवो आनंदाचे असंख्य क्षण.

SKY, तू ब्लू अँड गोल्डमधला केवळ एक खेळाडू राहिला नाहीस,

तू झालास आपल्या One Family चा भाग, हे खास नातं कायमच जपलं जाईल.

आज संपूर्ण पलटन एकत्र येऊन एवढंच म्हणते,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सूर्या दादा, आनंद, यश आणि अगणित हास्य सदैव तुझ्या वाट्याला येवो!

आज आपल्याकडे आनंद साजरा करण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे गणेश चतुर्थी आणि दुसरं म्हणजे आपल्या मिस्टर ३६० माएस्ट्रो सूर्यकुमार यादवचा वाढदिवस. काही क्रिकेटपटू आपल्या खेळाने मनोरंजन करतात, तर काही खास खेळाडू प्रेरणा देतात... आणि आपला SKY या दोन्ही गोष्टी अगदी सहजपणे करतो. त्याचे फटके नेहमीच भूमितीच्या नियमांना आव्हान देतात आणि क्रिकेटच्या मैदानाला त्याच्या स्वतःच्या जादुई कॅनव्हासमध्ये बदलतात. मुंबईचा एक प्रतिभावान युवा खेळाडू म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहता ब्लू अँड गोल्ड त्याचं घर बनलं, वानखेडे त्याचं मैदान आणि पलटन... त्याचे स्वतःचे खास चाहते.

पण या सगळ्या लोकप्रियतेपलीकडे एक अत्यंत प्रेमळ माणूस आजही तसाच आहे. आपल्या जवळच्या माणसांसाठी नेहमीच धावून जाणारा... ते हास्य, ती ऊर्जा आणि काहीही झालं तरी पुढे जात राहण्याची ती भूक आजही कायम आहे. MI चा आपला हा डायनॅमिक स्टार प्रत्येक वेळी मैदानावर उतरतो, तेव्हा आपल्या खेळासोबतच ती खास चमक आणि सकारात्मक ऊर्जाही घेऊन येतो.

आपला सूर्या दादा आणि त्याची ३६० डिग्रीची जादू आता त्याची खास ओळख बनली आहे. अशक्य वाटणाऱ्या अँगल्समधूनही सहज आणि सुंदर फटके खेळणारा, दबावाचं संधीत रूपांतर करणारा आणि आपल्या दिलखुलास हास्याने आनंद पसरवणारा सूर्या. आणि शेवटी, पलटनच्या मनापासून तुझ्यासाठी एक खास शुभेच्छा... आणखी उंच भरारी घे, आणखी तेजाने चमक... कारण प्रत्येक पावलावर SKY साठी आम्ही नेहमीच पूर्णपणे जल्लोष करत राहू. हे शानदार वर्ष तुझ्यासाठी भरभरून आनंद आणि यश घेऊन येवो.