वाढदिवसाच्या शुभेच्छा तिलक! पलटनच्या लाडक्या स्टारच्या दमदार प्रवासाचा आनंदोत्सव!

एकेकाळचा युवा खेळाडू, आज आमचा भरवशाचा तारा,

तिलक वर्मा, तुझ्या खेळाने जिंकला साऱ्यांचा विश्वास खरा!

उंच भरारी घेण्यासाठीच जन्मलास, चमकण्यासाठीच घडलास,

प्रत्येक नव्या खेळीसह यशाची नवी शिखरं गाठत गेलास.

प्रत्येक आव्हानात, प्रत्येक कठीण परीक्षेत,

टीव्ही, तू नेहमीच दिलंस सर्वस्व आपल्या खेळात.

फिनिशरची जिद्द आणि लढवय्याचा बाणा,

तुझ्यासारखा खेळाडू मिळणं, हा खरोखरच दुर्मीळ नजराणा!

सामना रंगतो अटीतटीचा, तेव्हा तूच उभा राहतोस खंबीर,

दबावाचं रूपांतर आनंदात करतोस, बनून विजयाचा शिल्पकार धीरगंभीर.

वाढदिवसाच्या शुभेच्छा तिलक, निळ्या-सोनेरी रंगांचा तू अभिमान,

तुझ्या या खास प्रवासात अजून अनेक जादुई क्षणांची होणार भरभरून बरसात!

मुंबई इंडियन्सची निळी-सोनेरी जर्सी पहिल्यांदा अंगावर चढवण्यापासून ते संघाला सर्वाधिक गरज असताना मैदानावर खंबीरपणे उभं राहण्यापर्यंत... आपल्या लाडक्या तिलक वर्माने पलटनला अभिमान वाटावा असा प्रवास घडवला आहे. एकेकाळचा युवा खेळाडू आज संघाचा भरवशाचा मॅचविनर बनला आहे. सामन्याचा दबाव वाढला, आव्हान कठीण झालं की त्याचा खेळ आणखी बहरतो. मैदानावर आपल्या कामगिरीने आणि ड्रेसिंग रूममध्ये आपल्या स्वभावाने तो MI च्या सहकाऱ्यांचा लाडका बनला आहे. शांत डोकं, निडर मन आणि सामना जिंकून देण्याची जिद्द... आपल्या स्टारबॉय वर्माकडे हे सगळं काही आहे!

तिलक म्हणजे संघाच्या यादीतील केवळ एक नाव नाही. आपल्या फलंदाजीने सामन्याचं चित्र पालटण्याची आणि क्षेत्ररक्षणात सुपरमॅनसारखी झेप घेत अविश्वसनीय कामगिरी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाल्यापासून प्रत्येक हंगामात तिलकच्या खेळात नवी प्रगती पाहायला मिळाली आहे. कमी वयातच त्याने विलक्षण परिपक्वता दाखवत जबाबदारी स्वीकारली आणि अनेकदा संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. तो खऱ्या अर्थाने MI च्या जिद्दीचं प्रतीक आहे... यशाची भूक कधीही न संपणारा, हार न मानणारा आणि प्रत्येक वेळी शंभर टक्क्यांपेक्षाही अधिक योगदान देण्यासाठी सज्ज असलेला खेळाडू.

दुसरीकडे, त्याचा मनमिळाऊ स्वभाव, चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू, पाय जमिनीवर ठेवून वागण्याची वृत्ती, डोळ्यांमधील ती खास चमक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पलटनला नेहमीच खास असल्याची जाणीव करून देण्याची त्याची पद्धत... या सगळ्यांतून तिलकचं व्यक्तिमत्त्व किती सुंदर आहे, हे दिसून येतं. एखाद्या खेळाडूला केवळ क्रिकेटपटू म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही घडताना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तिलकने आजवर खूप मोठा पल्ला गाठला आहे. मात्र, नवनव्या गोष्टी शिकण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्याची, स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि प्रत्येक वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी स्वतःला आणखी मेहनत घेण्यास प्रवृत्त करण्याची त्याची भूक आजही तितकीच कायम आहे.

काही खेळाडू आपल्या मैदानावरील कामगिरीने चाहत्यांची दाद मिळवतात, तर काही आपल्या स्वभावाने आणि वागण्याने त्यांची मनं जिंकतात. तिलकने या दोन्ही गोष्टी साध्य केल्या आहेत. पलटनकडून आपल्या लाडक्या टीव्हीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! असाच चमकत राहा, प्रगती करत राहा आणि क्रिकेटविश्वात यशाची नवी शिखरं गाठत राहा... कारण तुझ्या प्रवासातील सर्वोत्तम क्षण अजून यायचे आहेत!