आयर्लंडविरूद्ध टी२०आय मालिकेत हार्दिक पंड्याच्या भारताची १-० ने आघाडी
भारताने टी२०आय मालिकेतील मलाहिदे क्रिकेट क्लब ग्राऊंडवर आर्यलंडविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पहिला विजय नोंदवून १-० अशी आघाडी घेतली आहे.
दीपक हूडाची धमाकेदार खेळी (२९ चेंडूंमध्ये ४७ धावा) मुळे भारताला अत्यंत सहजपणे १०९ धावांचे लक्ष्य साध्य करता आले. त्याच्या तिसऱ्या विकेटसाठीच्या ६४ धावांची भागीदारी आणि कर्णधार हार्दिक पंड्या याने हॅरी टेक्टरच्या ३३ चेंडूंमधील ६४ धावांच्या इनिंगला झाकोळले.
भारताने टॉस जिंकल्यावर सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या मेन इन ब्लू संघाने टाटा आयपीएल २०२२ सीझनमध्ये गोलंदाजीने धुव्वा उडवणाऱ्या उमरान मलिकला संधी दिली आणि प्रथमच खेळणाऱ्या कोनोर ओल्फर्टलाही संधी मिळाली.
पावसामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाल्यानंतर सामना प्रत्येक बाजूने १२ ओव्हर्स खेळण्याचे निश्चित होऊन सुरू झाला.
भुवनेश्वर कुमार याने भारतासाठी बॉलिंगची सुरूवात केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक विकेट घेतली. त्याने आयर्लंडचा कर्णधार अँडी बारबर्नीची विकेट घेतली. त्याचा चेंडू स्टंपवर थेट जाऊन आदळला.
आयर्लंडचा स्टार ओपनर पॉल स्टर्लिंग पुढच्याच ओव्हरमध्ये बाद झाला. हार्दिक पंड्याच्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर हा ३१ वर्षीय खेळाडू मिड ऑफवर चेंडू टोलवायच्या नादात दीपक हूडाकडे अत्यंत सोपा कॅच देऊन बाद झाला. यामुळे हार्दिक पंड्या टी२०आय इंटरनॅशनल्समध्ये विकेट घेणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
सामन्याचा पहिला पॉवरप्ले टप्पा आयर्लंडसाठी २२/३ वर संपला. अवेश खानने आपली पहिली ओव्हर पाच धावा देऊन आणि गॅरेथ डेलानीची विकेट घेऊन पूर्ण केली. अवेशच्या लेंथमध्ये टाकलेल्या चेंडूवर डेलनीने फुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या चुकलेल्या अंदाजामुळे बॉल आतल्या बाजूला वळला आणि विकेट कीपर दिनेश कार्तिकच्या हातात गेला.
उमरान मलिकच्या टी२०आय मधील पहिल्याच सामन्यात आयर्लंडला आधार मिळाला. त्यांनी त्याच्या ओव्हरमध्ये १८ धावा काढल्या. हॅरी टॅक्टरने प्रथमच खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या चेंडूंवर जोरदार फटकेबाजी केली आणि सहाव्या ओव्हरच्या शेवटी यजमान संघाला ५२/३ वर नेले.
युजवेंद्र चहलने हॅरी टेक्टर आणि लॉर्कन टकर यांच्यातील ५० धावांची चांगली भागीदारी मोडून काढली. टकरने एक स्लॉग स्वीप शॉट डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या अक्सर पटेलकडे पाठवला.
हॅरी टेक्टरने आयर्लंडसाठी ५० धावा काढल्या. त्याने अवघ्या २९ चेंडूंमध्ये आपला तिसरा टी२०आय अर्धशतकाचा कोटा पूर्ण केला. त्याने आपली इनिंग ३३ चेंडूंवर ६४ धावा काढून पूर्ण केली आणि त्याने यजमान संघाला १०८/४ वर नेले.
भारताने आपला १०९ धावांचा पाठलाग धडाक्यात सुरू केला. त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये १५/० चा स्कोअर उभा केला. मेन इन ब्लूसाठी २०२२ मध्ये सध्याच्या आघाडीच्या टी२०आय फलंदाज असलेल्या ईशान किशनने जोशुआ लिटिलच्या चेंडूंवर १४ धावा कुटून भारताचा पाया भक्कम केला.
या डावखुऱ्या फलंदाजाला २६ धावांवर बाद व्हावे लागले. क्रेग यंगने किशनला पार करून मधल्या आणि लेग स्टंपला धडकणारा चेंडू टाकून त्याला बाद केले.
नंतर आलेला फलंदाज सूर्यकुमार यादव शून्य धावांवर बाद झाला. त्याला एलबीडब्ल्यूमुळे बाद व्हावे लागेल. यादवचे रिव्ह्यूचे अपील त्याच्या विरूद्ध गेले आणि भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या पाहुण्या संघासाठी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून मैदानात उतरला.
भारताने आपला चार ओव्हर्सचा पॉवर प्ले ४५/२ वर संपवला आणि हार्दिक पंड्याने सहाव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून संघाच्या पन्नास धावा पूर्ण केल्या.
दीपक हूडा आणि हार्दिक पंड्या यांच्यामधील सामना विजयी करू शकणारी भागीदारी जोशुआ लिटिलने पंड्याला एलबीडब्ल्यूने बाद केल्यामुळे संपुष्टात आली. भारतीय कर्णधाराने निर्णयाच्या रिव्ह्यूचा पर्याय निवडला. पण चेंडू विकेट्सला आदळल्यामुळे तो नाकारला गेला.
शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये सहा धावा आवश्यक असताना दीपक हूडाने जोशुआ लिटिलच्या चेंडूंना एकामागून एक सीमापार टोलवले आणि आयर्लंडविरूद्ध टी२०आयमधील दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.
हे संघ मंगळवार दिनांक २८ जून रोजी मलाहिदे क्रिकेट क्लब मैदानात मालिकेच्या शेवटच्या सामन्यासाठी पुन्हा एकत्र येतील.