भारत, दक्षिण आफ्रिका आणि पर्थ
खरे सांगायचे तर या ठिकाणी सामना आयोजित केलेला असणे ही भारतासाठी कायमच काळजीचा विषय ठरलेली बाब आहे. जगातली सर्वात वेगवान खेळपट्टी, बॉल सतत बाऊन्स होणे आणि अशाच परिस्थितीत मोठा झालेला प्रोटीआजचा संघ, हे एक अत्यंत कठीण कॉम्बिनेशन आहे. त्यांच्याकडे जगातला सर्वाधिक जलदगती गोलंदाजही आहे आणि तोही उत्तम फॉर्ममध्ये आहे.
पण आता परिस्थिती अशी नाही. न्यू इंडियाबाबत तर नक्कीच नाही. आणि या जगज्जेत्या मूडमध्ये असलेल्या न्यू इंडियासाठी तर बिलकुलच नाही. आम्ही तर म्हणतो, येऊद्यात!
भारतीय संघ आत्ता प्रचंड आत्मविश्वासात आहे. त्यांच्या धडाकेबाज फलंदाजांनी आपल्या आगमनाची वर्दी आधीच दिली आहे. आता या ग्रुपच्या टप्प्यातील सर्वाधिक कठीण आव्हान असलेल्या संघाचा सामना त्यांना करायचा आहेः दक्षिण आफ्रिकेचा. दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत टी२० वर्ल्ड कपमध्ये कधीच आवडीचा ठरला नव्हता आणि अनेकदा तर त्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा कमी कामगिरी केली आहे. परंतु या वेळी त्यांनी बरीच तयारी केली आहे. त्यांच्या खेळात सातत्यपूर्णता आहे आणि ते महत्त्वाचे म्हणजे ते क्रिकेटचा शक्तिशाली, आक्रमक ब्रँड खेळत आहेत. त्यांच्याकडे अत्यंत प्रभावशाली एनआरआरदेखील आहे.
पाकिस्तान झिम्बाब्वेकडून हरल्यामुळे भारताला या सामन्यात विजय मिळाल्यास भारताला थेट उपांत्य फेरीत खेळता येईल. अर्थातच दक्षिण आफ्रिकेलाही हा एक सामना जिंकण्याची आतुरता असेल. पावसामुळे त्यांना झिम्बाब्वेविरूद्ध विजय मिळवता आला नाही आणि हा सामनादेखील ते हरल्यास त्यांची परिस्थिती कठीण होईल.
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकास एक आकडेवारी:
आकडेवारी |
भारत |
दक्षिण आफ्रिका |
टी२०आयमध्ये |
१३ विजय |
९ विजय |
टी२० वर्ल्डकपमध्ये |
४ विजय |
१ विजय |
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज |
रोहित शर्मा (४०५ धावा) |
डेव्हिड मिलर (३२० धावा) |
सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू |
भुवनेश्वर कुमार (१४ विकेट्स) |
केशव महाराज (८ विकेट्स) |
काय: भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, सुपर १२ ग्रुप २
कधी: रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२
कुठे: पर्थ स्टेडियम, चेंडूला सर्वांत जास्त उसळी देणाऱ्या २२ यार्डच्या मैदानात.
काय अपेक्षा आहे: पाऊस नको. हो. बरोबर. आश्चर्याची बाब म्हणजे त्या दिवशी दिवसभर पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे.
तुम्ही काय करायला हवे: तुम्ही आठवडाभर जे करताय तेच. इतर टीम्स पावसामुळे मागे पडल्या, नाराज झाल्या, हरल्या. पण आपण मात्र संपूर्ण शक्तीनिशी पुढे जात आहोत.