पुढील सामने: वादळी बूम, संयमी तिलक, सुपला सूर्या
ऑस्ट्रेलिया. पाच टी२०आय. आता उत्साहात असलेली टीम इंडिया पुन्हा उसळी मारायला सज्ज आहे.
ओडीआय मालिकेत २-१ ने पराभव झाल्यानंतर मेन इन ब्लू बुधवार दिनांक २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या खेळाच्या सर्वांत लहान स्वरूपात फटकेबाजी करायला सज्ज आहे.
आपल्या आशिया कप २०२५ मधल्या विजयानंतर उत्साहात असलेल्या भारतीय संघाने या मालिकेत आत्मविश्वासाने प्रवेश केला आहे. या वेळी कोण नेतृत्व करणार? आपला लाडका सूर्यकुमार दादा. तो कर्णधार म्हणून ऑसीजच्या आकाशात तारे चमकवण्यासाठी सज्ज आहे.
जसप्रीत बुमरा आपले वादळी चेंडू टाकायला तयार आहे, तिलक वर्मा मधल्या फळीत निर्भयी फटकेबाजी करणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची पोरं ही मालिका अविस्मरणीय करतील यात शंका नाही.
या सामन्यांचा इतिहासही भारतीय संघाच्या बाजूनेच आहे! 💙 आपण ऑस्ट्रेलियाविरूद्द मागची तीन सामन्यांची टी२०आय मालिका खिशात टाकली आणि या दोन्ही टीम्स मागच्या वेळी आमनेसामने आल्या तेव्हा भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गाजवली. थोडक्यात सांगायचे तर समोर काय वाढून ठेवले आहे हे ऑस्ट्रेलियाला माहीत आहे… 😉
कॅनबेरा, मेलबर्न, होबार्ट, गोल्ड कोस्ट, ब्रिस्बेन. या शहरांमध्ये दोन दिग्गज एकमेकांसमोर येणार आहेत. चला तर मग.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत- टी२०आय मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी२०आय – कॅनबेरा, दुपारी १.४५ वाजता.
दुसरा टी२०आय - मेलबर्न, दुपारी १.४५ वाजता.
तिसरा टी२०आय - होबार्ट, दुपारी १.४५ वाजता.
चौथा टी२०आय - गोल्ड कोस्ट, दुपारी १.४५ वाजता.
पाचवा टी२०आय - ब्रिस्बेन, दुपारी १.४५ वाजता.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत- टी२०आय आकडेवारी
|
टी२०आयमध्ये एकास एक आकडेवारी |
||
|
ऑस्ट्रेलिया |
संघ |
भारत |
|
११ |
विजयी |
२० |
|
२० |
पराभूत |
११ |
|
१ |
अनिर्णित |
१ |
|
ग्लेन मॅक्सवेल (५७४) |
सर्वाधिक धावा |
विराट कोहली (७९४) |
|
जेसन बेहरेनडॉर्फ (१) |
सर्वाधिक विकेट्स |
जसप्रीत बुमरा (१७) |
पाच टी२०आयसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
**********
#OneFamily बाबत तिलक वर्माचे प्रेम
ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सच्या मुलाखतीत आपल्या स्टारबॉयने आपण त्याला आणले त्या लिलावाबाबत आणि कठीण परिस्थिती व्यवस्थापनाने त्याला कशा प्रकारे सावरले याबद्दल आणि कौटुंबिक वातावरणाबाबत सांगितले… ⤵️