भारत विरूद्ध आयर्लंड, दुसऱ्या टी२०आय सामन्याचे पूर्वावलोकनः हार्दिक पंड्याच्या संघाला विजयाची आस

पहिल्या टी२० आयमध्ये अत्यंत दिमाखदार पद्धतीने सात विकेट्सनी विजय प्राप्त केल्यानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ मलाहिदे क्रिकेट क्लब स्टेडियमवर दुसऱ्या आणि शेवटच्या टी२०आय मध्ये आयर्लंडच्या संघाशी सामना करणार आहे.

पंड्याने नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सातत्याने पाऊस पडत असल्याने खेळ सुरू होण्यास विलंब झाला आणि पहिला टी२०आय सामना दोन्ही संघांना १२ ओव्हर्समध्ये खेळावा लागला.

भारतीय जलदगती फलंदात भुवनेश्वर कुमार, अवेश कुमार आणि पंड्या यांनी उपयुक्त परिस्थितीचा फायदा घेतला. त्यांनी आयर्लंडला पहिल्या ३.५ ओव्हर्समध्ये २२/३ इतक्या कमी धावसंख्येवर आणून ठेवले. परंतु आयर्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाज हॅरी टेक्टरने नाबाद राहून ३३ चेंडूंवर ६४ धावा फटकावल्या आणि यजमान सघाला त्यांच्या १२ ओव्हर्समध्ये १०८/४ या एकूण धावसंख्येवर पोहोचवले.

धावांचा पाठलाग करताना दीपक हूडा (४७ नाबाद), ईशान किशन (२६) आणि पंड्या (२४) यांनी भारताला लक्ष्य अवघ्या ९.२ ओव्हर्समध्ये साध्य करता आले आणि दोन सामन्यांच्या टी२०आय मालिकेत १-० ची आघाडी घेतली.

आणखी एका दिमाखदार विजयानंतर भारताने टी२०आय स्वरूपात आयर्लंडविरूद्ध विजयाचे रेकॉर्ड आणखी सुधारले आहे आणि ते आता ४-० वर आहे.

भारताचा टी२०आय कर्णधार म्हणून आपला पहिला विजय नोंदवल्यानंतर हार्दिक आणि त्याच्या खेळाडूंना आता आयर्लंडमध्ये सलग दुसऱ्या टी२०आय मालिकेतील विजयाची आशा आहे. २०१८ साली भारताचे माजी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या संघाने टी२०आय मालिकेत आयर्लंडमध्ये २-० असा विजय प्राप्त केला होता.

भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या टी२०आयपूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयाः

दीपक हूडाला संधी मिळाली आहे

भारताचा नियमित सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडला अपयश आल्यानंतर पाहुण्या संघाने दीपक हूडा याला ईशान किशनसोबत इनिंग सुरू करण्यासाठी पाठवले. १२ ओव्हर्समध्ये १०९ धावांचे लक्ष्य साध्य करताना हूडाने या संधीचे सोने केले. त्याने २९ चेंडूंमध्ये ४९ धावा काढून रविवारी भारताला महत्त्वाचा विजय प्राप्त करून दिला. त्याच्या प्रभावशाली इनिंग्समध्ये चार चौकार आणि दोन षटकार फटकावले. हूडा भारताच्या टी२० वर्ल्ड कप संघात जागा मिळवण्यासाठी प्रयत्नात असताना तो दुसऱ्या टी२०आय सामन्यातही चांगला फॉर्म दाखवेल.

हॅरी टेक्टरने आयर्लंडसाठी उत्तम कामगिरी केली

आयर्लंड १.२ ओव्हर्समध्ये ६/२ या परिस्थितीत पिछाडीवर जात असताना हॅरी टेक्टर गेरेथ डेलनीसोबत क्रीझवर आला. या २२ वर्षीय खेळाडूने तणावपूर्ण परिस्थिती सुंदर कामगिरी केली आणि त्याने ३३ चेंडूंवर ६४ धावा फटकावल्या व आयर्लंडला १०८/४ च्या धावसंख्येवर आणून ठेवले. टेक्टरने दोन तृतीयांशपेक्षा जास्त धावा काढताना चेंडू सीमापार टोलवला. त्यात सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. टेक्टरच्या या सुंदर इनिंगने भारतीय कर्णधार हार्दिक पंड्यादेखील त्याच्या खेळाने प्रभावित झाला. त्याने नंतर टेक्टरला बॅट भेट दिली आणि या आयरिश फलंदाजाला लवकरच आयपीएलमध्ये संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली.

युजवेंद्र चहलचा उत्तम फॉर्म

लेग स्पिनर युजवेंद्र चहल हा भारतासाठी एक उत्तम खेळाडू ठरला. त्याने आपल्या तीन ओव्हर्समध्ये एक विकेट घेऊन फक्त ११ धावा दिल्या. या हरयाणाचा खेळाडू १२ ओव्हर सामन्यात तीन ओव्हरचा कोटा पूर्ण करणारा दोनपैकी एक खेळाडू होता. त्यानंतर त्याला पहिल्या टी२०आयमध्ये सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. चहलचा फॉर्म अलीकडच्या काळात उत्तम आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अलीकडेच झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत सहा विकेट्स घेतल्या. त्याने आयपीएल २०२२ च्या १७ सामन्यांमधील २७ विकेट्स घेऊन पर्पल कपही जिंकला.

त्याचा अलीकडचा फॉर्म पाहता आणि हेड टू हेड रेकॉर्ड पाहता भारताला मंगळवारी डब्लिनमध्ये टी२०आय मालिकेत आयर्लंडवर मात करता येईल अशी आशा आहे.