INDvSA, तिसरा टी२०आय: गारेगार धर्मशाळा, हॉट टीम इंडियाचे पुनरागमन!
टी२०आयमधल्या सर्वांत कठीण पराभवांतून हे असे बाहेर पडायचे असते! 💥
सूर्यादादा आणि कंपनीने सात विकेट्सनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून धर्मशाळात एका दणदणीत विजयाची नोंद केली.
आपल्या गोलंदाजांनी पहिल्या फळीला स्वस्तात बाद करून मार्ग काढला आणि पहिल्या इनिंगमध्ये पूर्ण वेळ जोरदार शो कायम ठेवला.
त्यानंतर फलंदाजांनी पार्टीत भाग घेतला आणि खेळ पटापट आवरला. चला तर मग बघूया सगळे कसे आणि काय काय घडले!
पॉवर प्लेची दणक्यात सुरूवात
राडा कसा होता?!
पहिल्या चार ओव्हर्समध्ये तीन विकेट्स पडल्यामुळे प्रोटीआजचा संघ पहिल्यापासूनच गारद झाला.
अर्शदीप सिंगने हेंड्रिक्सला घरी पाठवले तर हर्षित राणाने डे कॉक आणि ब्रेविसला बाद केले. त्यामुळे भारतीय तंबूत आनंदाची लहर पसरली.
सहा ओव्हर्स संपल्या तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा धावफलक २५/३ वर होता. 👌
एचपीच्या ऑरा बुकमध्ये नवीन एंट्री
ट्रिस्टन स्टब्सच्या विकेटसोबत हार्दिक पांड्या १००० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला जलदगती गोलंदाज ठरला. त्याने टी२०आयमध्ये १००+ विकेट्सही घेतल्या. हार्दिक पांड्याने हे केले नसते तरच नवल…
त्यानंतर स्पिनर्सनी अत्यंत खराब फलंदाजीला उलथवून टाकले आणि दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवर दबाव कायम ठेवला.
एडेन मार्क्रमच्या लढाऊ ६१ धावांनी प्रोटीआजना थोडे बळ दिले. त्यामुळे त्याचा संघ २० ओव्हर्समध्ये ११७/१० वर पोहोचला.
शुभमन- अभिषेकची जोडी>>>
या दोन बेस्टीजनी पुन्हा एकदा पाहुण्या संघाच्या गोलंदाजीला भगदाड पाडून ६० धावांची भागीदारी केली आणि आलेल्या संधीचे सोने केले.
अभिषेक (१८ चेंडूंमध्ये ३८ धावा) आणि शुभमन (२८ चेंडूंमध्ये २८ धावा) बाद झाल्यानंतर तिलकच्या नाबाद २५ धावांनी आपल्याला विजय दाखवला.
टीम इंडियाने १६ ओव्हर्समध्ये धावांचा पाठलाग पूर्ण करून चौथ्या टी२०आयमध्ये जाताना आघाडी घेतली आहे. हा सामना लखनौमध्ये होईल.
**********
थोडक्यात धावसंख्या: दक्षिण आफ्रिकेचा ११७/१० (एडेन मार्क्रम ६१, वरूण चक्रवर्ती २/११) भारताकडून सात विकेट्सनी पराभव १२०/३ (अभिषेक शर्मा ३५, कॉर्बिन बॉश १/१८).