तिसरा ओडीआयः कर्णधार रोहितच्या स्फोटक शतकामुळे न्यूझीलंडचा सुपडा साफ
या क्षणाची आपण मागची तीन वर्षे प्रतीक्षा केली आहे आणि शेवटी तो क्षण आलाच. रोहित शर्माने आपले ३० वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. भारताने न्यूझीलंडविरूद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद विजय मिळवला आहे.
सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने धावफलकावर पहाडासारखी धावसंख्या रचली. रोहित आणि शुभमन गिल यांच्या शतकांमुळे हे शक्य झाले. या दोघांनी आपली पहिली २०० धावांची भागीदारी एकत्र नोंदवली (अर्थातच अशा अनेकांपैकी पहिलीच).
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या किवींकडे पुरेशी संधी होती परंतु शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी यजमान संघासाठी काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. भारताने ९० धावांनी विजय मिळवला असून घरच्या खेळपट्टीवर विजय मिळवण्याचा हा पायंडा कायम राहिला आहे.
पहिल्यापासूनच चक्कीत जाळ आणि ढगात लायटिंग
आपल्या सलामीच्या फलंदाजांनी जराही वेळ न घालवता आल्याआल्याच किवी गोलंदाजांना पट्ट्यात घ्यायला सुरूवात केली. त्यांनी निर्बंधित ओव्हर्सचा पूर्णपणे फायदा उचलला. आपल्या कर्णधाराने तर एकामागून एक षटकारांचा सपाटाच लावला होता. पण शुभमन गिलसुद्धा काही कमी नव्हता. त्याने आठव्या ओव्हरमध्ये इतके तूफान फटके मारायला सुरूवात केली की त्याच्या हातात बॅट नाही तर दांडपट्टा असावा असे वाटावे. त्याने लॉकी फर्ग्युसनच्या याच आठव्या ओव्हरमध्ये २२ धावा केल्या (गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एकामागून एक तीन षटकार मारून २०० धावा केल्या होत्या हे विसरून कसे चालेल!) धावफलक फक्त हलता नव्हता तर तो चक्क घोडदौड करत होता.
अत्यंत विश्वसनीय टॅलेंटपासून ते व्हाइट बॉलच्या महान खेळाडूपर्यंत- हिटमॅनचा १० वर्षांचा प्रवास
२३ जानेवारी २०१३ रोजी रोहित शर्माने ओडीआयमध्ये नियमितपणे सलामी फलंदाज म्हणून फलंदाजी करायला सुरूवात केली. एक दशक उलटल्यानंतर हिटमॅनने आता सलामी फलंदाज म्हणून ५६.२६ सरासरीने ७७६४ धावा केल्या आहेत. (दुसऱ्या कुठल्याही ५००० धावा करणाऱ्या सलामी फलंदाजाची सरासरी ५० पेक्षा जास्त नाही.)
त्याच्या तिसाव्या एकदिवसीय शतकाची दीर्घकाळ चाललेली प्रतीक्षा इंदोरमध्ये अगदी रो-रो करत संपली. तो अक्षरश रोंरावत आला आणि बघता बघता रिकी पाँटिंगच्या पंक्तीत जाऊन बसला. त्यामुळे आता तो या स्वरूपात संयुक्त तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शतक पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. एक सलामी फलंदाज म्हणून हे त्याचे २८ वे शतकही ठरले. *कॅप्टन रे, माझा कॅप्टन*
गिलचा तोफखाना सुरूच
आपला आधीचा महान खेळाडू आपल्या महानतेचा वारसा दिमाखात पुढे नेत असताना आणखी एक तरूण खेळाडू त्याच्याच पावलांवर दमदार पावले टाकत पुढे चालला आहे. त्याने या मालिकेतले आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले आणि एकदिवसीय मालिकांमधले तिसरे अर्धशतक झळकवले आहे. या फलंदाजाने या मालिकेत एकूण ३६० धावा केल्या. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावांच्या विक्रमाची बरोबरी त्याने केली.
छोटासा झटका पण हार्दिक आणि शार्दुलच्या जोडीची कमाल
सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर किवीजनी धावांचा प्रवाह थांबवायचा प्रयत्न केला. परंतु हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी त्यांना जराही सुट्टी दिली नाही. त्यांनी शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये ६० धावा फटकावून एक जोरदाऱ शेवट करून दिला. पंड्याने आपले नववे ओडीआय अर्धशतक पूर्ण केले तर ठाकूरच्या लहानशा खेळीत १७ चेंडूंमध्ये २५ धावा झाल्या. भारताने ५० ओव्हर्समध्ये ३८५/९ धावा केल्या.
गोलंदाजीमुळे कर्णधाराचा मुत्सद्दीपणा पुन्हा सिद्ध
पलटन आपण हे आधीही पाहिलेले आहे. पण आता पुन्हा एकदा ऐकूया- कर्णधार रो खरोखरच मुत्सद्दी आहे. त्याने १५ ओव्हर्सनंतर शार्दुल ठाकूरला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि अचानक भारताचा संघ सामन्यात पुन्हा अवतरला. त्याने मिशेल आणि लॅथमच्या विकेट्स सलग चेंडूंमध्ये घेतल्या आणि त्यानंतर उमरान मलिकने कॉनवेची महत्त्वाची विकेट घेतली.
न्यूझीलंडसाठी खेळ जवळपास आटोपलाच होता. तरीही मिश संटनेर आणि मिशेल ब्रेसवेल यांनी ठिय्या मांडायचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे विकेट्स पडत असल्याने त्यांचे फारसे काही चालले नाही.
आणखी एक मोठा विजय, आणखी एक क्लीन स्वीप, आणखी एक मालिका खिशात, आणखी एक रो टन आणि आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. #JustThePerfectDay
थोडक्यात धावसंख्या
भारत ५० ओव्हर्समध्ये ३८५/९ (रोहित शर्मा १०१, शुभमन गिल ११२) कडून न्यूझीलंडचा ४१.२ ओव्हर्समध्ये २९५ धावांवर सर्व बाद करून पराभव. (डेवॉन कॉनवे १३८, शार्दुल ठाकूर ३/४५)