INDvSA, पाचवा टी२०आय: एचपीची धमाकेदार फलंदाजी, बूमची गोलंदाजी यांच्यामुळे भारताच्या नावावर आणखी एक टी२०आय मालिका
भारताने अत्यंत उत्साहात आणखी एक टी२०आय मालिका आपल्या नावावर केली असून पाचव्या आणि शेवटच्या टी२०आयमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला.
चला बघूया सामना कसा पार पडला ते 👇
सलामी फलंदाजांनी सामन्याचा नूर बदलला
सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय सलामी फलंदाजांनी जराही वेळ वाया न घालवता फटकेबाजीला सुरूवात केली. संजू सॅम्सन आणि अभिषेक शर्मा धडाधड धावा करत होते. त्यांनी ६३ धावांची भागीदारी करून सुरूवातीलाच प्रोटीआजना बॅकफूटवर टाकले.
दक्षिण आफ्रिकेने मधल्या ओव्हर्समध्ये नियमित विकेट्स घेऊन सामना ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला. त्यांनी भारताच्या वेगाला थोडा आळा घातला आणि सामन्यात आपण अजून असल्याचे स्पष्ट केले.
पण एचपीटीव्ही शोने या सर्वांना धूळ चारली
इनिंगला स्थिर करण्याची गरज असल्याचे जाणवत असतानाच सामन्यात अचानक एचपीटीव्ही शो सुरू झाला 🔥
हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी फक्त ४४ चेंडूंमध्ये देखण्या १०५ धावांची भागीदारी केली. हार्दिकने हल्ल्याचे नेतृत्व केले आणि त्याने फक्त २५ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. त्याने या दरम्यान पाच चौकार आणि पाच उत्तुंग षट्कार ठोकले. त्याने टी२०आयमध्ये कोणत्याही भारतीयाकडून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा मानही मिळवला. तिलकने त्याला मदत केली आणि ४२ चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या.
या स्फोटक फिनिशमुळे भारताला २० ओव्हर्सच्या शेवटी २३१/५ पर्यंत पोहोचता आले.
बूम बूमने पाठलागाला आळा घातला
क्विंटन डे कॉकने अत्यंत जबाबदारीने पाठलाग सुरू केला. त्याने उत्तम ६५ धावा केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ पाठलागात मागे राहणार नाही असे वाटत होते.
पण बूम बूमला आपली लय सापडली आणि सामना फटक्यात बदलला. 💥 जसप्रीत बुमराहने अत्यंत नाट्यमय पद्धतीने सामना ताब्यात ठेवला. दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या काहीच मिनिटांत १२०/१ वरून १३५/५ पर्यंत कोसळला. बुमराहने ४ ओव्हर्समध्ये २/१७ अशी कामगिरी केली.
नंतर खूप लढा दिल्यानंतरही पाहुण्या संघाला अंतर पूर्ण करता आले नाही आणि त्यांना ३० धावा कमी पडल्या. भारताने मालिका ३-१ ने खिशात टाकली. 🇮🇳 👊
थोडक्यात धावसंख्या: भारताकडून २३१/५ (तिलक वर्मा ७३, कॉर्बिन बॉश २/४४) दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव २०१/८ (क्विंटन डे कॉक ६५, वरूण चक्रवर्ती ४/५३).