आपण “सर्वच जिंकायचे” या मूडमध्ये आल्यानंतर टिम डेव्हिडने रणशिंग फुंकले

एक नवीन शहर, नवीन प्रतिस्पर्धी आणि परत जिंकण्याची एक संधी मुंबई इंडियन्ससाठी येत्या शनिवार (२७ एप्रिल) रोजी अरूण जेटली स्टेडियम, दिल्लीमध्ये वाट पाहते आहे. 

तोड-फोड टिम डेव्हिडने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना पुढच्या सहा लीग सामन्यांसाठी मार्गक्रमणा आणि मिशन यांच्याबाबत चर्चा केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा हार्ड हिटिंग ऑल राऊंडर एमआयच्या प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याच्या शक्यतांबाबत सकारात्मक होता.

“हो, नक्कीच,” असे हा सिंगापूरमध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियन स्टार स्पर्धा आता शेवटच्या टप्प्याकडे जात असताना म्हणाला.

“पण आपण ही स्पर्धा जिंकण्याबाबत गंभीर असू तर आपल्याला स्पर्धेतल्या सर्वोत्तम टीम्सना हरवावे लागेल, अशा टीम्स ज्या सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहेत. अर्थातच, हे सामने हरलो तर आम्हाला पोहोचता येणार नाही. परंतु, आम्ही त्यांना हरवले तर आम्ही प्लेऑफ्समध्ये असू आणि स्पर्धेत सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या टीम्सचा पराभव करू. तर हे असे सगळे आहे.”

तर मागच्या सामन्यानंतर टीममधले वातावरण कसे होते? राजस्थान रॉयल्सने यशस्वी जैस्वालच्या शतकामुळे १८० धावांचे लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे हा पराभव पचवायला कठीण गेला. त्यावर टिम सकारात्मक होता.

“ड्रेसिंग रूममधला मूड चांगला होता. पण आम्ही मागच्या सामन्यानंतर निराश नक्कीच झालो होतो. आम्ही स्वतः सामन्यात उत्तम खेळू शकलो नाही. त्यामुळे ही एक नैसर्गिक भावना आहे. आता भविष्यात पुन्हा पुढे येण्याची संधी आम्हाला नक्कीच मिळेल,” तो म्हणाला.

जसप्रीत ‘बूम बूम’ बुमरा हा मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजीत आघाडीवर आहे. टिमने ब्लू अँड गोल्डमध्ये त्याच्या रूपाने एक चांगले पॅकेज आल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

“तो (बुमरा) सातत्यपूर्ण आहे. तो स्वतःच्या कौशल्यांवर विकास ठेवतो आणि चांगल्या कामगिरीचा त्याचा इतिहास आहे. पण अर्थातच बूम चांगली गोलंदाजी करतो. त्यामुळे फलंदाजांना त्याला फटके मारणे कठीण जाते. तो खूप वेगवान गोलंदाजी करतो,” टिम म्हणाला.

“चेंडू नवीन असताना तो स्विंग करतो. मग यॉर्कर्स टाकून अत्यंत संथ चेंडू टाकतो. त्यामुळे त्याला खेळणे कठीण होते. हे खूपच आकर्षक पॅकेज आहे. तो तिन्ही फॉर्मेट्समध्ये खेळतो. त्यामुळे आमच्या टीममध्ये त्याने असणे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच कधीकधी तुमच्याकडे असे खेळाडू असतात जे जगातले सर्वोत्तम असतात, आपल्या कामात कौशल्यपूर्ण असतात आणि तुम्ही त्यांना त्यांचे काम करू देता. टीमला त्या टप्प्यावर आवश्यक असलेले कोणतेही काम ते करू शकतात. त्यामुळे या सीझनमध्ये आम्ही बूमवर खूप अवलंबून आहोत. आम्ही त्याच्यावर अवलंबून राहणारदेखील आहोत.

“आणि आता आमच्यासाठी काही चांगले परफॉर्मन्स तो घेऊन येईल अशी आशा करूया.”

पलटन, टीम्समधल्या मागच्या भेटी कशा प्रोत्साहक ठरल्या आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यांनी आपल्याला या सीझनचा पहिला विजय दिला आहे आणि टिम डेव्हिड (४५ नाबाद) आणि जसप्रीत बुमरा (२/२२) यांनी या निकालात महत्त्वाची भूमिका बजावली. आता स्पर्धा संपत आली आहे आणि आता मुलांना आधीपेक्षा जास्त तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे. तर चला अरूण जेटली स्टेडियमला एमआयच्या ब्लू अँड गोल्ड रंगात रंगवण्यासाठी तयार व्हा.