“या टीमकडे एक एक्स फॅक्टर आहे!”: श्रेयस गोपाल

आयपीएलमध्ये चढउतार होतच असतात. पण एमआय कायम प्रगती करते, सकारात्मक बाबींचा फायदा घेते आणि त्रुटींमधून धडा घेते.

आयपीएलमध्ये या सर्वांचा साक्षीदार असलेल्या श्रेयस गोपालने बुधवारच्या (१७ एप्रिल) पंजाब किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सर्वप्रथम गोपालने मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाल्यानंतरही टीमचा आत्मविश्वास कायम असल्याचे सांगितले.

टीममधले वातावरण उत्तम आहे,” असे त्याने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

“दुर्दैवाने आम्ही मागच्या सामन्यात विजय मिळवू शकलो नाही. परंतु खरे सांगायचे तर मी मागच्या दहा वर्षांपासून आयपीएलमध्ये आहे. प्रत्येक टीमला अडीअडचणींचा सामना करावा लागतोच. तुम्ही जेव्हा एकत्रितपणे काम करता तेव्हा टीम म्हणून उत्तम कामगिरी करता येते. काही सामन्यांमध्ये आम्ही एक टीम म्हणून चांगल्या प्रकारे समोर आलो असे माझे मत आहे.

“आम्ही एका सामन्यात सातत्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डींग या सर्व गोष्टी एकत्र आणल्या पाहिजेत. मग त्याचा परिणाम नक्कीच दिसतो. याबाबतीत मी नक्कीच प्रामाणिकपणे बोलेन. या सगळ्या गोष्टी एकत्र येतील तेव्हा आरसीबीसारखे आणि त्याच्या आधीच्या सामन्यासारखे काही सामने पाहायला मिळतील.” तो म्हणाला.

सहा सामन्यात चार पराभव- एमआयसाठी ही परिस्थिती नवीन नाही. आपण यापूर्वीही अडखळती सुरूवात करून नंतर विजय मिळवलेला आहे.

“मला नाही वाटत की त्याबद्दल चर्चा झाली आहे,” श्रेयस म्हणाला.

“आपण मागे वळून पाहूया. मी असतानाही आम्ही दोन चषक जिंकले आणि मी दुसऱ्या टीममध्ये गेल्यानंतरही त्यांनी आणखी चषक जिंकले आहेत. त्यामुळे ही गोष्ट बदलत नाही. ते पहिले काही सामने सातत्याने जिंकत नाही असे दिसून आले आहे. परंतु, ग्रुप एकत्र येतो तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व विशेषतः आतासारख्या परिस्थितीत दिसून येते.”

“या टीमकडे तो एक्स-फॅक्टर आहे. सर्व टीम सदस्य एकत्र येतात आणि आपण उत्तम खेळू शकतो हे सिद्ध करतात. मग आपण ही चॅम्पियनशिप जिंकू शकतो. याच एका कारणामुळे या फ्रँचायझीने पाच किताब जिंकले आहेत. ही काही मस्करी नाहीये. सीएसके आणि हा संघ दोन्ही एकाच पातळीवर आहेत. दोघांनीही पाच सामने जिंकले आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त कुणीही जिंकलेले नाहीयेत. याच एका गोष्टीचा मी विचार करतो,” असे त्याने आत्मविश्वासाने सांगितले.

पंजाबमध्ये पंजाब किंग्सविरूद्ध खेळणे ही एक मेजवानी ठरते. विशेषतः तुम्ही हरभजन सिंगसारख्या खेळाडूला पिचवर वर्चस्व गाजवताना आणि तरीही मुंबई इंडियन्सने सामने जिंकताना पाहता तेव्हा हे सिद्ध होते. सध्याच्या परिस्थितीत आमच्याकडे पंजाबचे दोन क्रिकेटपटू आहेत- नेहल वढेरा आणि नमन धीर. ते या टीमच्या प्लॅनसाठी महत्त्वाचे आहेत का? श्रेयस गोपाल म्हणाला- हो खूपच.

“नमन आणि नेहल आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे ते टीममध्ये वर खाली जाऊ शकतात आणि हे माझ्यासह दुसरे कुणीही असू शकते. तुम्ही एक दोन सामने पाहिले तर सूर्यादेखील फील्डिंगचा भाग नव्हता.

“त्यामुळे ते महत्त्वाचे आहेतच. ते तशी तयारीदेखील करत आहेत. तुम्ही बाहेर जाऊन बघाल तर नेट्समध्ये ते तुम्हाला सर्वात आधी येऊन घाम गाळताना दिसतील. संधी कोणत्याही वेळी येऊ शकते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे मी चार सामने खेळलेले नव्हते. तरीही मी त्या सामन्यांसाठी तयारच होतो.”

“मी शक्य तितके प्रयत्न केले कारण आपल्याला संधी मिळते तेव्हा आपण हे म्हणू शकत नाही की "हे अचानक झाले आहे." त्यामुळे संधी मिळाली की घेतलीच पाहिजे आणि आमच्या सर्व खेळाडूंनी हेच केले आहे.”

गोपालने या दोन्ही खेळाडूंचे खूप कौतुक केले. त्यांचे टॅलेंट पाहता खेळणाऱ्या ११ च्या संघात येण्याची संधी त्यांना नक्कीच मिळेल असे तो म्हणाला.

“आमच्या सिलेक्शन ट्रायल्स होत्या तेव्हा मी नेहलला गोलंदाजी केली. तो एक अप्रतिम फलंदाज आहे. त्याने फारच सुंदर फलंदाजी केली. त्याला संधी न मिळण्याचे काही कारणच नाही. परंतु या स्वरूपातील परिस्थिती किंवा बाबी अशा आहेत की कधीकधी आपल्याला सामन्यात खेळायला मिळते आणि कधीकधी मिळत नाही. नमन फार चांगला खेळाडू आहे. त्याने कितीही सामने खेळलेले असले तरी ते सर्व त्याने उत्तमच खेळलेले आहेत,” असे तो म्हणाला.

हार्दिक पांड्यासोबत किंवा विरूद्ध खेळलेल्या गोपालने मीडियाला आपल्याला तो किती आवडतो हे सांगितले. त्याच्याविरूद्ध सुरू असलेल्या अनपेक्षित गोंधळाला तो आत्मविश्वासाने सामोरा जात आहे.

“खरे सांगायचे तर मी हार्दिकला माझ्या मुंबई इंडियन्ससोबतच्या १० वर्षांपूर्वीच्या काळापासून ओळखतो,” गोपाल म्हणाला.

“तेव्हापासून आमच्या दोघांमधली मैत्री बदललेली नाही. तो खूप मेहनती माणूस आहे. लोक म्हणतात की तो स्ट्राँग आहे. पण तो खरोखरच स्ट्राँग आहे.”

“मागच्या १० वर्षांचा अनुभव म्हणा किंवा १० वर्षांची मैत्री म्हणा. तो खूप स्ट्राँग आहे. मी तर त्याला जगातल्या सर्वांत स्ट्राँग व्यक्तींपैकी एक म्हणूनच ओळखतो.”