आयपीएल सामना १३ वा | MIvDC ग्राफिकल पूर्वालोकन: क्वालिफायरपासून एक डब्ल्यू मागे... हे पार पाडायलाच हवे!
पलटन, गणित फारच सोपे आहे. प्लेऑफ्ससाठी डब्ल्यूइन (विन)= क्यू (क्वालिफिकेशन). 🔒
…आणि आपल्या पोरांना इतर कोणाहीपेक्षा याचे महत्त्व जास्त माहीत आहे. आता ही गोष्ट लक्षात घेऊन टीम २१ मे रोजी वानखेडेवर दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध लढण्यासाठी सज्ज झाली आहे.
दोन्ही संघांना प्लेऑफ्सपासून दूर ठेवणारा फक्त एकच गुण आहे आणि ही स्पर्धा टाटा आयपीएल २०२५ च्या लीग टप्प्याच्या शेवटी व्हर्चुअल पात्रता फेरी ठरेल. 🔥
आता नमनाला घडाभर तेल न ओतता आकडेवारी आपल्यासाठी कशी आहे ते पाहूया.
आयपीएलमध्ये एकास एक रेकॉर्ड
आपले पारडे २०-१६ ने जड आहे. आपल्याला चांगलाच मानसिक आधार आहे हा, नाही का? 😌
**********
सूर्या आणि केएल राहुल– आयपीएल २०२५ मध्ये आपले खंदे वीर
हे दोन्ही फलंदाज चांगल्याच मूडमध्ये आहेत! 👊
मागच्या सामन्यात केएल राहुलने एक जबरदस्त शतक फटकावले तर स्कायने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात 25+ runs केल्या आहेत. त्याने आपले काम किती सातत्यपूर्ण आहे हे स्पष्ट केले आहे. आता या सामन्यासाठी आम्ही तयार आहोत.
• सूर्यकुमार यादव
• के एल राहुल
**********
MI vs DC – या सीझनमध्ये ही स्पर्धा कशी पार पडली
याच प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध एमआयचा सलग सहा सामने जिंकण्याचा विक्रम record-equalling six-match winning streak सुरू झाला होता.
टीव्हीचा जबरदस्त खेळ आणि नमन धीरच्या १७ चेंडूंमधल्या ३८ धावांमुळे एमआयला २० ओव्हर्सच्या कोट्यात २०५/५ अशी तगडी धावसंख्या उभारणे शक्य झाले होते.
आपल्या एकत्रित प्रयत्नांमुळे, त्या १९ व्या ओव्हरसह सर्वच ओव्हर्समध्ये एकूण धावसंख्येचा बचाव करणे शक्य झाले. त्यामुळे आपल्याला आपला सीझन परत ट्रॅकवर आणताना १२ धावांनी विजय मिळवता आला. २०० पेक्षा अधिक धावा केलेल्या असताना एकही सामना न हरण्याचा आपला रेकॉर्ड कायम राहिला! 😎
**********
आयपीएल २०२५ साठी दा केएल कोड डिकोड करूया
चांगल्या लांबीचे चेंडू, त्यासोबत पूर्ण लांबीच्या डिलिव्हरीज या मोहिमेत केएल राहुलची हुकमी अस्त्रे ठरली आहेत. त्यामुळे सर्वाधिक डॉट चेंडू आणि ४/७ विकेट्स घेतल्या गेल्या.
आपल्या जेसीबी त्रिदेवांनी याची नोंद घेतलीय! 📝
**********
MI𝕩DC – आयपीएल २०२५ मध्ये विजयाचा प्रवास
• मुंबई इंडियन्स
• दिल्ली कॅपिटल्स
**********
ठीकेय मग. आकडेवारी करून झाली. आता एक्शनला सुरूवात!
वानखेडे तुमच्या प्रतीक्षेत आहे, पलटन! 💙