आयपीएल सामना क्र. १२ | MIvGT ग्राफिकल पूर्वावलोकन: मिशन "प्लेऑफ्सच्या एक पाऊल जवळ" सुरू होते आहे!
आपला संघ एका छोट्या आणि आवश्यक चार दिवसांच्या आरामानंतर परत सज्ज आहे आणि आता आपल्यासमोर टाटा आयपीएल २०२५ च्या पुढच्या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या गुजरात टायटन्सचे आव्हान आहे. 💪
आता फॉर्मबद्दलच बोलायचे झाले तर आपली पोरं अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. त्यांनी आपल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले आहे. मागच्या वेळी राजस्थान रॉयल्सविरूद्ध १०० धावांच्या विजयामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग विजयांच्या (६ विजय) आपल्याच विक्रमाची बरोबरी झालीय आणि आता सलग सातवा विजय मिळवण्यासाठी आम्ही आतूर आहोत! 🔥
त्याचवेळी गुजरातमधले आपले शेजारीही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर ३८ धावांनी विजय मिळवलाय आणि आता ते मुंबईला येत आहेत.
आता प्लेऑफ्सच्या पात्रतेसाठी जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आहे. 👊 प्लेऑफ्ससाठीची स्पर्धा जोरात सुरू असताना दोन्ही फ्रँचायझींना विजय मिळवण्याची उत्सुकता असेल. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार हे नक्की.
आता नमनाला घडाभर तेल न ओतता आपण या सामन्यासाठीची महत्त्वाची आकडेवारी पाहूया!
MI vs GT – आयपीएलमध्ये एकास एक रेकॉर्ड
सध्या आपल्या डोक्यात हा विचारच नाहीये. आपला सध्याचा जबरदस्त फॉर्म विचारात घेता आपण मागच्या एकास एक रेकॉर्ड्सचा विचार न करता त्यांच्याशी लढण्यास तयार आहोत. ✨
**********
आयपीएल २०२५ मध्ये वानखेडेवर धावा काढण्यासाठी प्राधान्याच्या जागा
खरे सांगायचे तर मैदानाचा कोणताही भाग आपण सोडलेला नाहीये. अर्थात मिडविकेटवर २२ टक्के म्हणजे सर्वाधिक धावा फटकावल्या गेल्यात. मधल्या फळीत फलंदाजांना फटकेवाजी करताना मजा येईल आणि ते चेंडू सीमारेषेपलीकडे टोलवत राहतील! ✌️
**********
गिल, सुदर्शन आणि बटलरचे कमकुवत धागे
या गुजरात टायटन्सच्या त्रिकुटाने संपूर्ण स्पर्धेत उत्तम फॉर्म दाखवला आहे आणि गोलंदाजांना त्यांना बाद करताना नाकी नऊ आलेले आहेत.
परंतु या मैदानाची लांबी त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते आणि आपले गोलंदाज शक्य तितका लवकर यांचा धोका दूर करण्यासाठी प्रयत्न करतील.
**********
JCB = पॉवरप्लेमध्ये संपला विषय!
बोल्टी आणि चहर यांनी पहिल्या सहा ओव्हर्समध्ये चांगलाच कहर केला होता. पण बुमराह परतल्यामुळे आपले त्रिदेव आणखी मजबूत झालेत.
आपल्या या पहिल्या तिघांची महत्त्वाची आकडेवारी पाहूया. त्यांनी आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये १६ विकेट्स घेतल्यात. ⚽
**********
हार्दिक, सूर्या आणि तिलक यांचा डेथ ओव्हर्समधला स्ट्राइक रेट
इनिंगच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची फटकेबाजीची क्षमता त्यांना विश्वासार्ह खेळाडू बनवते.
**********
आकडेवारी संपली! ✅ आता करूया हल्लाबोल 🔜
या सीझनमध्ये जीटीविरूद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि +2 साठी टीम उत्सुक आहे. 🏏 येताय ना वानखेडेला मग... यायलाच लागतंय.