एमआय दुसऱ्या क्रमांकावर कशी येईल? आपली सगळी गणितं इथे आहेत…

पलटन, आम्हाला तुमच्या शंका आणि प्रश्न कळलेले आहेत.

…आणि त्याचं एक सोपं सरळ उत्तर आहे... होSSS! 😎

आपल्या पोरांनी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध दणदणीत ५९ धावांनी विजय मिळवून 59-run over Delhi Capitals आयपीएल २०२५ प्लेऑफ्समध्ये एंट्री केलीय. सूर्यादादाने या सीझनमधला पहिला सामनापटू पुरस्कारही मिळवला.

आता पहिल्या चारांमध्ये जागा पटकावल्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीमला क्वालिफायर १ मध्ये जाण्यासाठी टॉप २ मध्ये लीग टप्पा संपवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे टीमला अंतिम सामन्यात जाण्यासाठी दोन वेळा खेळावे लागेल.

**********

आयपीएल २०२५ गुणतक्ता – GTvLSG नंतर (२२ मे)

टीम

सामने

जिंकले

हरले

अनिर्णित

गुण

एनआरआर

जीटी

१३

१८

०.६०२

आरसीबी

१२

१७

०.४८२

पीबीकेएस

१२

१७

०.३८९

एमआय

१३

१६

१.२९२

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या दोनमध्ये येण्यासाठी मुंबई इंडियन्सला उरलेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करावा लागेल. त्यामुळे आपल्याला १८ गुण मिळतील.

RCBvSRH (२३ मे) आणि PBKSvDC (२४ मे) हे दोन्ही सामने आरसीबी आणि पीबीकेएसच्या बाजूने गेले तर आपण टॉप टू स्पर्धेतून बाहेर गेलो.

याशिवाय जीटीसोबत १८ गुणांवर टाय ब्रेकर झाल्यास नेट रन रेट एमआयसाठी समस्या ठरणार नाही कारण आपला एनआरआर खूप जास्त आहे.

त्यामुळे लीग टप्प्याच्या शेवटच्या सामन्यात आरसीबी किंवा पीबीकेएसनी सामने हरावे लागतील आणि सीएसकेविरूद्ध जीटीलाही सामना हरावा लागेल.

हुश्स… खूप जास्त गणित आहे, नाही का? 🔢 अर्थात आपल्या हातात जे काही आहे ते आपण करूया आणि २६ मे रोजी जयपूरला पीबीकेएसला हरवण्यासाठी प्रयत्न करूया.

तोपर्यंत, पलटन प्लेऑफ्सची तयारी सुरू करा! 😎