घोषणा – आयपीएल २०२५ प्लेऑफ्सची ठिकाणे

टाटा आयपीएल २०२५ प्लेऑफ्सच्या ठिकाणांची घोषणा लीगचा टप्पा संपत असताना करण्यात आली आहे.

अधिकृत रिलीजनुसार नवीन चंदीगढमधील नवीन पीसीए स्टेडियमवर क्वालिफायर १ (२९ मे) आणि एलिमिनेटर (३० मे) खेळवले जातील तर अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ (१ जून) आणि फायनल (३ जून) हे सामने खेळवले जातील.

आठवडाभर सामने प्रलंबित ठेवण्यापूर्वी हैदराबाद आणि कोलकाता या ठिकाणांची घोषणा शेवटच्या चार सामन्यांसाठी केली गेली होती.

सध्याच्या परिस्थितीनुसार जीटी, आरसीबी आणि पीबीकेएस या तीन टीम्स प्लेऑफ्ससाठी पात्र ठरल्या आहेत. २१ मे रोजी डीसीविरूद्ध एमआयने विजय मिळवल्यास ती चौथ्या क्रमांकावर असलेली टीम ठरेल.