मिशन प्लेऑफ्स पुन्हा सुरू!!! आयपीएल २०२५ १७ मे पासून पुन्हा सुरू होणार - एमआयचे सामने पाहा!
साधारण आठवडाभर स्थगित राहिल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग २०२५ शनिवार दिनांक १७ मे पासून पुन्हा सुरू होतेय.
सुधारित वेळापत्रकानुसार उर्वरित १३ राऊंड रॉबिन सामने २७ मे रोजी संपतील. त्यानंतर २९ मे ते १ जून या दरम्यान प्लेऑफ्स खेळवले जातील. अंतिम सामना मंगळवार दिनांक ३ जून रोजी होईल.
याशिवाय उर्वरित लीग टप्प्यातील सामने सहा शहरांमध्ये खेळवले जातील. त्यात बंगळुरू, जयपूर, मुंबई, लखनौ, अहमदाबाद आणि दिल्ली यांचा समावेश आहे. प्लेऑफ्स आणि अंतिम सामन्यासाठी जागा अद्याप ठरलेल्या नाहीत.
सध्या १२ सामन्यांमध्ये १४ गुण मिळवून आपले ब्लू अँड गोल्डमधले बॉइज चौथ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्याविरूद्ध आपल्या उर्वरित दोन सामन्यांसाठीचे वेळापत्रक असे आहे.
आयपीएल २०२५ च्या उर्वरित कालावधीसाठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक
प्रतिस्पर्धी |
स्थान |
तारीख |
वेळ (आयएसटी) |
दिल्ली कॅपिटल्स |
मुंबई |
२१ मे |
सायं. ७.३० वाजता |
पंजाब किंग्स |
जयपूर |
२६ मे |
सायं. ७.३० वाजता |
*प्लेऑफ्स |
टीबीडी |
२९ मे ते १ जून |
सायं. ७.३० वाजता |
*अंतिम |
टीबीडी |
३ जून |
सायं. ७.३० वाजता |
*पात्रतेच्या सापेक्ष
पलटन, आपली टीम पुन्हा एकदा मैदानावर यायला तयार आहे. त्यामुळे जल्लोषात टीमचा उत्साह वाढवण्यासाठी तयार राहा.