आयपीएल सामना क्र. ११ | RRvMI ग्राफिकल पूर्वावलोकन: पिंक सिटीला ब्लू अँड गोल्डमध्ये रंगवून टाकूया!
खम्मा घणी, पलटन! 👋
तुमचा लाडका ब्लू अँड गोल्डमधला अश्वमेध स्टाइल आणि जिंकण्याच्या हेतूने प्रेरित होऊन वेगाने पुढे चाललाय. सलग पाच सामने जिंकल्यानंतर आपली पोरं सीझनच्या ११ व्या सामन्यात जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध उभी राहणार आहेत. 🤝
आपल्या टीमने अत्यंत संथ सुरूवात केल्यानंतर मिशनला जोरदार सुरूवात केली आहे आणि आता आपली विजयी एक्स्प्रेस प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत पुढे जाणार आहे. गोलंदाज तर सूर्याला वाईट वाटेल इतकी आग ओतत आहेत आणि फलंदाज फटकेबाजीत मागे हटत नाहीयेत. आपल्या कॅम्पमध्ये नुसती धमाल सुरू आहे.
आपण हाच सीन आधीही पाहिला आहे, नाही का? सीझनमध्ये उशिराने उदय आणि प्लेऑफ्समध्ये धडक. अक्षरशः सिनेमासारखं सुरू आहे. पण आपलं काम अजून संपलेलं नाहीये.
…आपल्या सलग सहाव्या विजयासाठी टीमच्या तयारीत भर टाकायला काही आकडेवारी पाहूया.
RR vs MI – आयपीएलमध्ये एकास एक रेकॉर्ड
गुजरात टायटन्सविरूद्ध मागच्या सामन्यात त्यांनी घातलेला धुडगूस बघता एकास एक आकडेवारी आपल्याकडे झुकवणे हे कठीण काम असेल. पण आपल्याला चॅलेंजेस आवडतात, नाही का?! 💪
**********
आयपीएलमध्ये एमआयसाठी SKYची धावांच्या पाठलागाची यशस्वी सरासरी
थोडक्यात सांगायचे तर सूर्या सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे! 🌞 तो सध्याच्या सीझनमध्ये आपला आघाडीचा फलंदाज आहे आणि त्याने तब्बल १६१ सरासरीने धावा केल्या आहेत... त्याही यशस्वीपणे.
याही सामन्यात तेच करावं अशी अपेक्षा आहे दादा! 🤓 पिंक सिटीमध्ये तापमान चांगलंच वाढणार आहे.
**********
सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलमध्ये टीम्सची सरासरी धावसंख्या
या सीझनमध्ये या ठिकाणी खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांमध्ये प्रत्येक इनिंगमध्ये १७०+ धावसंख्या झाली आहे. याशिवाय धावफलक दोनदा २०० धावांवर गेला आहे. 💥
काहीही असले तरी हे आयपीएल आहे. कोणत्याही फ्रँचायझीसाठी कितीही धावा केल्या तरी त्या सुरक्षित नाहीत आणि त्या दिवशी स्पर्धा कशी पार पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
*२०२५ मध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत.
**********
डावखुऱ्या खेळाडूंविरूद्ध बूम आणि चहरच्या विकेट घेण्याच्या क्षमता
आपण ही गोष्ट स्पष्टपणे मान्य केली पाहिजे की दोन्ही गोलंदाजांच्या पूर्ण लांबीच्या चेंडूंमुळे डावखुऱ्या फलंदाजांवर मोठे संकट येऊ शकते.
आरआरच्या फलंदाजी विभागात बऱ्यापैकी डावखुरे खेळाडू असल्यामुळे पुढे काय होणार हे तुम्हाला माहीत आहेच! 😉
**********
जयपूरमध्ये बाद होण्याच्या सुंदर पद्धती
तुम्ही आऊटफील्ड फील्डरकडे चेंडू टाकला की पॅव्हिलियनला वन वे तिकीटने परतण्याची खात्री होते. 👀 कळलं ना!
**********
ठीकेय मग, आकडेवारीचे काम पूर्ण झाले आहे! 💻 सगळी माहिती आपल्या टीमला दिलेली आहे आणि ते धमाल करायला तयार आहेत … 🏏
तर भेटूया सवाई मानसिंग स्टेडियमवर! 🙌